Marathi short story-झाले मोकळे आकाश
Marathi short story-झाले मोकळे आकाश

Marathi short story-झाले मोकळे आकाश

Marathi short story-झाले मोकळे आकाश

ज्योती रामटेके

 

अमृता आज सकाळपासून घाईघाईने कामे आटोपून घेत होती. बरेच दिवसांनी माहेरला जायचा योग जुळून आला.
सकाळी आईचा फोन आला.. अग अमृता आज बाबा घरी नाहीत.. तुम्ही या दोघे जेवायला.अग बाबा तसे काही बोलत नाही पण जावयाला बघून चेहरा पडतो त्यांचा.
ते जाऊ दे‌ सर्व..ये लवकर .
आईने फोन ठेवला. काय गुन्हा केला मी? आवडीच्या मुलासोबत लग्न केले.बाबा सारखा श्रीमंत नाही आंनद
पण
किती समजूतदार आहे तो.त्याचा मनाचा मोठेपणा.. त्याचा आंनदी.. खेळकर स्वभाव माझ्यावर असणारे निरपेक्ष प्रेम..
आणखी काय हवे मला?

आंनद.. आटोप लवकर, आईने जेवायला बोलावले आहे.

अग पण बाबा असतील.. आपले जाणे त्यांना नाही आवडणार.मी त्यांचा नावडता जावई आंनद हसला.आईचा तर आवडता जावई आहे नं . आटोप लवकर.

दोघेही सोबत शिकले. अमृता श्रीमंत घरातील. तिच्या दोन्ही बहिणींच्या घरी अमाप श्रीमंती. बाबांनी किती विरोध केला होता लग्नाला पण तिचा निर्णय ठाम होता.

आई मात्र खूश होती.मुलगी आनंदात संसार करेल हे तिला माहित होते. आनंदचा स्वभाव तिने ओळखला होता.
उत्साहाच्या भरात माहेरचे घर कधी आले अमृताला कळलेच नाही. आत्या दारात उभी होती.तापट स्वभावामुळे संसार काही टिकला नाही.माहेरी पण तेच, कुणालाही घालून.. पाडून बोलणे.आई कसे जमवून घेते कळत नाही, अमृता मनात बोलत होती.घर कसे उदास वाटत होते..

बाबा असते तर? किती मजा आली असती.गुलाबाची
बाग सुकलेली दिसत होती..

 

अग आई.. गुलाब का सुकले ग? हल्ली काळजी घेत नाही का तू झाडांची?ते जाऊ दे ग. माझा गुलाब तर किती टवटवीत दिसत आहे.

अमृता..तुझा आंनदी.. प्रसन्न चेहरा मला खूप काही सांगत आहे.काय विचारु तुला? अग पैसा सर्वस्व नाही आयुष्यात.
तुझ्या बहिणींना काय कमी आहे? मोठा बंगला.घरात नोकर चाकर पण त्यांचे सुतकी चेहरे बघितले कि धस्स होते.काय करणार? बाबा घरी नसताना येत जा. खूप आठवण येते तुझी.

आई येते ग आता, आभाळ बघ भरुन आले. मध्ये नदी
कधी पुर येईल सांगता येत नाही.

वहिनी अमृता निघाली का? आत्याने आवाज दिला.

निघतांना अमृताला दाटून आले. बाबा असते तर ? तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

येते ग आत्या.. अमृताने आवाज दिला..

हे काय अमृता.. अग अंगावर सोन्याचा फुटका मनी नाही.
दादांचे ऐकले नाही. पंचवीस तोळे सोने देणार होता तो जावयाला.तुझ्या आईला बघ दादांनी कसे सोन्याने मढवले.

हो.. हो.. आई जोरात ओरडली. हुंड्यासाठी माझ्या बाबांनी शेती विकली. त्याच पैशाचे ओझे दिमाखात घालून चार लोकांत मिरवायचे.सारे काही बेगडी.. फक्त दिखावा.अरे, स्वतःच्या मनगटात जोर असेल तर करा बायकोला दाग.. दागिने.मनात साचलेले आज तिने बाहेर काढले होते.

कशाला हवे सोने.. सोन्यासारखा नवरा मिळाला तिला.बेबी आत्या शांत होती.

खरे आहे वहिनी तुझे.कळत ग मला पण वळत नाही. मी तरी काय केले. सुख कशात आहे,कधी कळलेच नाही मला.

आभाळ काळेकुट्ट दिसत होते.सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. विजा चमकत होत्या. त्याचे रौद्ररुप बघून थरकाप होत होता

बापरे.. हा तर अवकाळी पाऊस, अमृता आज थांबून जा. नदीला पुर आला तर.. काय कराल तुम्ही दोघे. तसेही बाबा उद्या संध्याकाळी येणार आहेत.अशा काळोख़्या रात्री काही झाले तर? आईचा चेहरा रडवेला झाला होता.

अहो बाईसाहेब .. आपला जावई पट्टीचा पोहणारा आहे. अमृताला खांद्यावर बसवून नेतील ते.

बाबा तुम्ही? अमृता ओरडली.

अग तुझी खूप आठवण येत होती.बरेचदा तुझ्या घराकडे आलो पण मनातला अहंकार आडकाठी घालायचा. काय करु कळत नव्हते.तुझ्या आईचा व्याकूळ चेहरा डोळ्यासमोर दिसायचा. आज सकाळपासून बाहेरगावी जातो म्हणून शेतावर गेलो.जोरात पाऊस सुरु झाला.

त्या पाण्यात तुझे प्रतिबिंब दिसत होते.. मी केलेली कागदाची नाव पाण्यात हळूवार कशी सोडायची..तू
चल आपण आज पुन्हा नाव बनवून पाण्यात सोडू..

पाऊस आपल्याच नादात कोसळत होता..विजा कडकडाट करीत होत्या. सारे गाव जलमय झाले. नदीला मोठा पुर आला, कुणीतरी सांगत आले..

अमृताला आता कशाचीही पर्वा नव्हती.. ही वादळी रात्र तिच्यासाठी सुखकर होती.

प्रिय वाचक,कथा आवडल्यास नक्की  like,comment,share करा.तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध  साहित्य  वाचण्यासाठी खालील लिंक

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!