श्यामच्या घरा बाहेर गर्दी हळूहळू वाढतच होती.
“अरेरे !असं.. कसं ..घडलं? किती वाईट…?
शेजारी पाजारी लोक …आपसात कुजबुजू लागली.
“फारच भयानक असं कधी घडेल आपल्याला स्वप्नात देखील वाटत नव्हत” शेजारीच राहणारा राम म्हणाला.
“हो ..ना सकाळी तर सर्व शांत होतं मग एकदम च अचानक असे काय दोघांमध्ये बिनसलं ..,की श्याम आणि गीता वहिनीं नी एकाएकी असं एवढं टोकाच पाऊल उचललं…?”
“किती शांत,समंजस होते दोघेही अगदी सुखी संसार होता दोघांचा ..
रामच्या पत्नी वीणाने त्याला दुजोरा दिला. राम श्यामचा शेजारी …
राम आणि श्याम च्या कुटुंबाचे आपसात अगदीच जिव्हाळ्याचे
संबंध होते…
निखिल श्यामचा लहान भाऊ तर अगदी भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात अलिप्त उभा राहून गर्दीकडे एकटक बघत होता. साधना निखिलची पत्नी मोठ्या जावेच्या प्रेताजवळ बसून आसव गाळीत होती. इतक्यात पोलिसांची गाडी गर्दीतून वाट काढत दारात येऊन उभी राहिली .पोलीस इन्स्पेक्टर साळुंखे, इन्स्पेक्टर दिवाण सोबतीला दोन हवालदार असे चौघेजण गाडीतून उतरून गर्दीतून वाट काढीत घरात शिरले. घरातील दृश्य बघून ते एकदम चक्रावले ..घराच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीत पन्नाशीच्या आसपास वय असलेल्या पुरुषाचे प्रेत पाण्यावर तरंगत होते. आणि त्याच्या जवळच काही अंतरावर एका स्त्रीचे प्रेत पडलं होतं. तिचे डोके दगडाने ठेचलेले होते.
सभोवताली जमलेल्या गर्दीला पांगवत इन्स्पेक्टर साहेबांनी पंचनामा केला. जिथे जिथे प्रेत पडले होते त्या त्या ठिकाणी निशाणी करून त्या सर्व जागेला सील केले. हौदातील मयताला बाहेर काढून ती दोन्ही प्रेत पोस्टमार्टम साठी पाठवून दिली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षी नोंदवून घेतल्या ..
साळुंखे साहेबांनी रामला आवाज दिला..
“मिस्टर राम प्रधान ”
” साहेब मी.. राम प्रधान मीच फोन लावला होता”
“अच्छा तर तुम्ही राम प्रधान”
इन्स्पेक्टर दिवाण म्हणाले.
“हो साहेब…”
“बरं राम प्रधान मला सांगा तुम्हाला ही घटना केंव्हा आणि कशी कळली आणि तुमचा मृतकाशी काय संबंध ..”
“साहेब मृतक शाम माझा मित्र
आणि आमचा शेजारी.”
“तुम्ही त्यांना शेवटचं केव्हा भेटला होतात?”
” आज सकाळी च साहेब आम्ही रोज माॅर्निंग वाॅकला एकत्र च जात होतो त्याप्रमाणे आजही एकत्र च गेलो होतो सकाळी नेहमीप्रमाणे आमची भेट झाली होती ”
“काही टेन्शन मध्ये वाटले का?
तुम्हाला कोणाबद्दल काही बोलले घरी काही कुरबुरी’
” नाही साहेब नेहमी सारखा नार्मल होता”
“त्या दोघांव्यतिरिक्त त्यांच्या परिवारात आणखी कोण.. कोण सदस्य आहेत?”
” त्याचा छोटा भाऊ निखिल त्याची पत्नी साधना , श्यामचा मुलगा आनंद
” बरं मग त्यांच्या घरचे बाकी लोक कुठे आहेत ? दिसत नाही आहे त..
तो श्यामचा लहान भाऊ निखिल…
अरे !निखिल येनां इकडे ” रामने दूर उभ्या असलेल्या निखिल ला आवाज दिला.. दिवाण साहेब निखिल कडे रोखून बघत म्हणाले तुम्ही मृतकाचा लहान भाऊ ना …
हो साहेब मग तुमच्या भावाचा आणि वहिनी चा खून झाला पण तुम्ही एवढ्या दूर वर का उभं आहात ? भावाच्या नात्याने तुमचंच कर्तव्य नाही का पोलीसांना कळवण्याचं”
साहेबांनी असा एकदम थेट प्रश्र्न विचार ल्याने
निखिलला एकदम काय बोलावे सूचेना तो पार गोंधळून गेला. आणि म्हणाला ,
“साहेब मी खूप घाबरलो होतो मला कळलेच नाही. ”
इन्स्पेक्टर साळुंखे नी रामकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले..
“हो साहेब” राम म्हणाला..
मी दुपारी घराकडे परतत असताना निखिल ला दरवाज्यासमोर चिंताजनक अवस्थेत असल्याचे बघून काही अडचण आहे का म्हणून विचारलं.. तेव्हा तो म्हणाला होता की
,”हो ना मी केव्हापासून दार वाजवतो य पण कोणीही आतून दार नाही उघडत आहे बघ नं?” निखिल ला अशा घाबरलेल्या अवस्थेत बघून मी पण दरवाजा
उघडण्याचा प्रयत्न केला परंतु.. आतून काही च प्रतिसाद मिळत नव्हता हे पाहून आम्हीच एक दोघांना बोलावलं आणि जास्त वेळ न लावता दार तोडून घरात शिरलो.. आम्हाला श्याम आणि वहीणी दोघेही मृतावस्थेत सापडले .. ते दृष्य बघून क्षणभर ही न थांबता ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये फोन लावून तक्रार नोंदवली.नंतर पुढील तपासा करिता
साळुंखे साहेबांनी सर्वांना घराबाहेर काढत घर रिकामं करून घेतले.
” घरात एकाचवेळी दोन खून झाले यापैकी महीलेचे डोक दगडाने ठेचल तर पुरुषाला पाण्याच्या टाकीत बुडवले. यावरून हेच सिद्ध होते की घरात या दोघांव्यतिरीक्त तिसरं कोणी तरी नक्कीच हजर असावं .. दोन्ही खूनांशी त्याचा संबंध असावा… ते आपसात चर्चा करू लागले.
“एक गोष्ट ..तुमच्या लक्षात आली का? मृतकाचा लहान भाऊ पण दारू च्या नशेत आहे.. ”
बोलत..बोलत ते घरात कुठे काही संशयास्पद मिळते का याचा शोध घेत होते. बेडरुममध्ये संशयास्पद असे काही च आढळले नाही .किचन मध्ये पण नेहमीप्रमाणे रोजच्या सकाळ च्या स्वयंपाकाची तयारी केलेली दिसत होती .बाकी सर्व सामान पण जागच्या जागी नीटनेटकं होतं.
“साहेब ..साहेब जरा इकडे या” त्यातील एक हवालदार त्यांना आवाज देत म्हणाला .
“काय रे काय झालं ?”
“साहेब मागच्या बाजूला या” हवालदारांनी आवाज देताच सर्वजण तिकडे वळले.
” साहेब हे बघा इथे मागच्या बाजूला एक दरवाजा आहे ”
” बघू ..”असे म्हणत
साळुंखे यांनी दरवाजा हाताने ढकलला ..
मागच्या बाजूस दार तर उघडच आहे..
मग निखिल ने .. बाकी कोणी ही या दरवाजाचा उल्लेख नाही केला… मागचं दार उघड असूनही पुढचं दार कापले ..जो कोणी खूनी असेल त्याने खून करण्यासाठी मागच्या दाराचा वापर केलेला दिसतो…
इन्स्पेक्टर साळुंखे म्हणाले.
“मागच्या बाजूला कपडे -भांडी पण केलेली दिसत आहेत कोणी कामवाली बाई आहे का तुमच्याकडे कामाला..
” हो साहेब ती घर कामासाठी मागच्या दाराने जाणे-येणे करते ”
निखिलची पत्नी म्हणाली,
मृतक शाम चा मुलगा दिसत नाही आहे कुठे आहे तो बाहेर गेला का?”
साळुंखे साहेबांनी विचारले, निखिलची पत्नी म्हणाली ,
“तो ..ना .. तो कालच त्याच्या मोठ्या बहिणीला काव्याला दिवाळी साठी आणायला गेला आहे .तिचे लग्न होऊन नेमकेच पंधरा दिवस झालेत.. तिचा हा पहिलाच दिवाळसण.. ”
“केव्हा येणार आहेत ?ती दोघं” साहेबांनी विचारले,
“फोन लावला त्यांना येतीलच आज रात्रीपर्यंत”
” ठीक आहे आम्ही निघतो त्यांचा मुलगा आला की आम्हाला कळवा आम्ही परत चौकशी करता येवू त ”
आणि राम ला म्हणाले, ” राम आम्हाला काही गरज पडली तर तुम्हाला फोन लावू”
राम म्हणाला ,
“हो केव्हा ही …
इन्स्पेक्टर साळुंखे आणि त्यांचे सहकारी पोलीस स्टेशनला परत गेले…
घटनेचा दुसऱा दिवस उजाडला.. साळुंखे पोलीस स्टेशनमध्ये बसून काही महत्त्वाचे कागदपत्र पाहत होते . आणि एकदम…. काहीतरी आठवून त्यांनी हवालदार सदाशिव ला हाक दिली ,
“अरे सदाशिव कालच्या शाम दीक्षितच्या पोस्टमार्टम विषयी काही कळले का ?”
“नाही… साहेब दोन दिवस लागतील म्हणाले आताच चौकशी केली” “बर ठीक आहे .”
“साहेब त्या घरकाम करणाऱ्या बाईंची शेजारी-पाजारी चौकशी केली तर ते लोक म्हणाले ,बाई एकदम विश्वासू आणि प्रामाणिक आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या कडे कामाला आहे..
“त्यांचा मुलगा आनंद.. याचीच साक्ष बाकी आहे एकदा त्याला पोलीस स्टेशनला बोलावून घ्या म्हणजे आपल्याला पुढील हालचाल करता येईल”
“हो ..साहेब बोलावणे पाठवले त्याला पोहोचेल एवढ्यात तो”
“साहेब मी ..आनंद शाम दीक्षित तुम्ही मला बोलावले होते ”
“आनंद .. ये मी तुझीच वाट पाहत होतो ”
साळुंखे नी त्याला हातानेच समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला .
“हा ..तर मग आनंद तू केव्हा आला गावावरून…?”
“त्याच रात्री उशिराने आलो मी..”
“तुला बातमी कळली होती का…?”
“हो साहेब मला काकूंचा फोन आला होता….”
“बरं मला एक सांग आई-बाबा मध्ये कधी भांडण होत होती का…”
“नाही साहेब कधीच नाही..”
“तू गावाला जाताना त्यांच्या स्वभावात काही फरक जाणवला….”
“नाही साहेब…”
“बाबाला काही व्यसन दारूचे वगैरे….?”
“बिलकुल नाही….”
“काका-काकू चा स्वभाव कसा आहे …?”
“दोघेही आम्हाला खूप जीव लावतात साहेब….”
“त्यांची आपसात काही कुरबुरी..?”
“नाही…पण..”
“पण काय …?”
“काका कधी कधी दारू पिऊन येतात त्यामुळे घरात नेहमी वाद होतात…”
“ओ..हो ..तर तुला कोणावर काही संशय आहे का..?”
नाही साहेब मला कोणावर काहीच संशय “नाही कारण बाबांचे सर्वांसोबत चांगले संबंध होते …
तु जाऊ शकतो.. ..
नि..खि..ल
साळुंखे पुटपुटले
“सदाशिव…”
“या निखिल वर थोडी नजर ठेव”..
हो साहेब..
घटनेच्या दोन तीन दिवसानंतर सदाशिवने साळुंखे साहेबांच्या पुढ्यातील टेबलवर पोस्टमार्टमचे रिपोर्ट ठेवले.
” साहेब.. हे शाम दीक्षितांची रिपोर्ट…”
“बघू.…”
इन्स्पेक्टर साळुंखे यांना पोस्टमार्टम चे रिपोर्ट वाचून एवढे लक्षात आले की गीताचा मृत्यू डोक्यातून अति रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि श्यामचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झालाय.
“साहेब ..पोस्टमार्टम च्या वेळी मृतक श्यामच्या शर्टा मध्ये एक लॉकेट अडकलेल आढळलं ”
“हो ..का ..बघू ”
साळुंखे ने लॉकेट हातात घेऊन त्याला सर्व कडून बघितलं. बदामच्या आकाराचं लॉकेट होतं. त्यांनी ते निरखून बघितलं त्या लॉकेट वर काही अक्षरे कोरलेली दिसली.
“रा…म… साळुंखे विचारात पडले .
“राम …म्हणजे मृतक श्यामचा मित्र पण …त्याचे लॉकेट मयताच्या शर्टात कसे अडकले…रामचा तर हात नाही या गुन्ह्यात…? राम….निखिल का… याशिवाय अजून तिसरा कोणी…? कोण असेल खरा गुन्हेगार… संशयाचा गुंता तर अजून.. अजून वाढतच होता..”
साळुंखे साहेब …विचारात पडले… जास्त वेळ न दवडता त्यांनी सदाशिवला हाक मारून गाडी काढायला लावली आणि तडक रामच्या घरासमोर उभी केली.
“मिस्टर राम आहेत का घरात…?”
“हो आहेत….”
त्यांच्या पत्नीने सांगितले
“त्यांना बोलवा…” आवाज ऐकून राम बाहेर आला.
साळुंखे रामला म्हणाले…
” मि. राम.. तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला नेतोय …”
“का…काय झालं…”
” तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल…”
असं म्हणून त्यांनी रामला पोलीस स्टेशनला आणले. साळुंखे साहेब रामला म्हणाले,
” राम प्रधान तुम्ही संशयाच्या घेर्यात आहात…?
रामला एकदम धक्का बसला, “नाही साहेब अस कस श्याम तर माझा बालपणीचा अगदीच जिवलग मित्र होता… आम्ही एकत्रच वाढलो, खेळलो… सुख दुःखात पण आम्ही कधीच एकमेकांची साथ नाही सोडली… मी माझ्याच मित्राचा खून का करू हे सर्व खोटं आहे…”
“मग हे लॉकेट मृतक श्यामच्या शर्टात अडकलेले कसे मिळाले…. हे तुमचेच आहे ना…?”
साळुंखे साहेबांनी रामला लॉकेट दाखवत विचारले,
“हो साहेब यांच्यावर राम असे नाव कोरलेले आहे पण हे माझे लॉकेट नाही… हे तर त्यांच्या म्हणजेच शामच्या नोकराचे लॉकेट आहे त्याचेही नाव ‘राम’च आहे…”राम ..मृतक श्यामचा चा नोकर त्यादिवशी तुम्ही याचा काहीच उल्लेख केला नव्हता .
नाही साहेब खरच सांगतो.. त्यादिवशी तो समोर नव्हता ..म्हणून त्याचे नाव मी गडबडीत सांगायलाच विसरलो ..म्हणजे त्या दिवशी तो कामावर आला नव्हता का ?
मला काहीच माहित नाही पण त्या दिवशी तो मला काही दिसला नाही तेव्हा पासून तो पण गायब आहे घराकडे फिरकला नाही .
असं आहे तर कुठे राहतो हा राम …
किती वर्षापासून त्यांच्याकडे कामाला आहे .
गेले पाच-सात वर्षांपासून तरी
कसा आहे स्वभाव .. कधी भेट होत होती त्याच्याशी ..
हो ,.त्याच्या शी नेहमी च बोलणं होत होते कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस आहे.
कुठे राहतो ..
आपल्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावर नरसी ला राहतो ..
पूर्ण नाव ..रामा गणेश पाटील….
ठीक आहे तुम्ही आता जाऊ शकता… पण तुमच्यावरचा संशय अजूनही पूर्णपणे गेलेला नाही खरा खुनी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला गाव सोडून कुठेही जाण्याची परवानगी नाही..
अशी ताकीद देऊन रामला घरी सोडले..
दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर साळुंखे हवालदार सदानंद आणि सदाशिव ला सोबत घेऊन नरसी ला निघाले.. गाव छोटे असल्यामुळे त्यांना रामचा पत्ता शोधायला जास्त वेळ लागला नाही . राम बाहेर च बसला होता . पोलिसांची गाडी दारासमोर दिसता च तो घाबरून पळण्याचा प्रयत्नात होता..
इन्स्पेक्टर साळुंखे च्या लक्षात आले त्यांनी त्याला पळू न देता चालाकी ने ताब्यात घेतले…मी काही केले नाही साहेब मला पकडू नका ..राम दोन्ही हात जोडून गयावया करीत म्हणाला
नाव काय तुझं .. इन्स्पेक्टर साळुंखे नी त्याला विचारले ..
र..र..रामा गणेश पाटील
श्याम दिक्षित ना ओळखतो का?
हो साहेब त्यांच्या कडे कामाला होतो ..पण ..मी काही केले नाही ..
तू काय केलं आणि काय नाही तुला हे तुला पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल ..
साळुंखे साहेबांनी त्याला दरडावले ..
पण साहेब..
चल बस गाडीत ..
असे म्हणून त्याला जबरदस्ती गाडीत बसवले …
पोलीस स्टेशनला आल्यावर नोकर राम म्हणाला ..
मी काहीच केले नाही…
तू काही केले नाही.
तर.. तुझे लॉकेट मृतक श्यामच्या शर्टात अडकले कसे.. हे तुझे च लॉकेट आहे ना ..
हो साहेब हे माझे च आहे .
पण मला नाही माहित हे शाम दादाच्या शर्टात कसे अडकले मला जाऊ द्या ..
जायचे तुला खरं खरं सांग..
असं म्हणून इन्स्पेक्टर साळुंखे नी त्याच्या कानाखाली एक सणसणीत चपराक दिली.. कानाखाली चपराक बसताच. रामा एकदम गडबडला आणि रडकुंडीला येत गयावया करीत म्हणाला ,
साहेब मी खरंच खून नाही केला मला जाऊ द्या..
तूं .. नाही तर मग कोणी केला खरं खरं सांग.. की देवू अजून एक कानाखाली ठेवून …
नाही नाही सांगतो साहेब..
काव्या ताईचा पहिला दिवाळसण असल्यामुळे ती माहेरी येणार म्हणून गीता वहिनी खूप खुशीत होत्या आणि नेहमीप्रमाणेच त्या सकाळी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या मी त्यांची मदत करीत होतो.. आणि साधना वहिनी त्यांच्या गावातल्या मैत्रिणीकडे लग्न होतं.. म्हणून तिकडे गेल्या होत्या.. गीता वहिनी आणि मी बोलत बोलत स्वयंपाक घरात काम करीत होतो ..
श्याम दादा बाहेर अंगणात बसून पेपर वाचत होते ..
तेवढ्यात निखील दादा नेहमीप्रमाणे दारू पिऊन माझी संपत्ती ची वाटणी मला दे म्हणून वाद घालू लागला .. मी स्वयंपाक घरातून पाहिले.. तर निखिल दादा श्याम दादाच्या अंगावर धावून जात त्यांना मारत होता ..मी श्याम दादाला वाचवायला गेलो तर …निखिल दादाने मला च दारूच्या नशेत जोराने ढकलून दिले.. मी घाबरुन तसाच मागच्या दाराने धावत सुटलो ..
आणि साधना वहिनीला बोलावण्यासाठी गेलो ..साधारण एक दीड तासानंतर आम्ही दोघ घराकडे परतलो ..तर मला घराबाहेर लोकांची गर्दी दिसली… साधना वहिनी घरात धावत गेल्या.. आणि मी बाहेरच्या बाहेर धाकाने पळून गेलो ..त्याच्या नंतर पुढे काय घडले मला काहीच माहित नाही ..
म्हणजे …निखिल आणि शाम चे भांडण सोडवण्यासाठी झालेल्या झटापटीत ..रामाचे लॉकेट श्यामच्या शर्टात अडकल असावे.. श्याम सोबत शेवटी निखिल च होता.. रामाच्या एकंदरीत बोलण्यावरून श्याम चा खूनी म्हणून संशयाची सुई निखिल कडेच वळत होती..
आता निखिल वर खरी कारवाई करण्याची वेळ आली आहे .असे म्हणत ..साळुंखे साहेबांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले.त्यानुसार निखिल ला अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले .पोलिसांना असे अचानक समोर पाहताच ..निखिल ला घाम फुटला .साहेब.. तुम्ही इकडे कसे सापडला का? दादा ,वहीनी चा खूनी असे कापऱ्या आवाजात विचारू लागला..
हो ..सापडला ना आम्ही त्याला अटक करायला आलो. हात पुढे करा ..
कोण ?मी ..
हो ..तुम्हीच ..तुमच्या भावाचा खरा गुन्हेगार तुम्हीच आहात..
आणि त्याच्या हातात सर्वांसमोर बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला नेले..
चौकशीत तो सुरवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला..
नाही साहेब हे सर्व खोट आहे.. मग खरं काय आहे ते तू सांग ..
मी तुम्हाला आधीच सांगितले मी माझ्या भावाचा खून का करीन.. आता बऱ्या बोला न खरे सांगतोस की नाही ..नाहीतर दाखवू का आमचा हिसका ..असे म्हणून इन्स्पेक्टर साळुंखे ने निखिलच्या पायांवर सपासप लाठीचे फटके मारायला सुरुवात केली..निखिल दुखण्याने कळवळून म्हणाला.. सांगतो साहेब ..खरं सांगतो मला मारू नका हो मीच ..त्या दोघांना मारलं…
का ?मारलं त्यांना तू .?मला दारू आणि पत्ते खेळण्याच व्यसन आहे ..म्हणून माझ्या आईने सर्व इस्टेट श्याम दादाच्या च्या नावाने केली …. तेव्हापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी राग होता.. पण.. त्यांना मारायचं हा उद्देश माझ्या मनात केव्हाच नव्हता …
त्याचा माझ्या वर खूप जीव होता..
पण..त्या दिवशी मी दारू पिऊन आलो… त्यावरुन श्याम दादांनी नेहमी प्रमाणेच मला हटकले .. तेव्हा माझा राग उफाळून वर आला मी त्याला दारुच्या नशेतच मारायला सुरुवात केली …रामा मध्ये पडला तर ..मी त्याला जोरात ढकलून दिले …तसा तो घाबरून पळून गेला ..मग मी रागाच्या भरात दादाला तेथे च असलेल्या पाण्याच्या हौदात बुडवले.. वहिनी हे सर्व बघून घाबरल्या. आणि मोठ्यामोठ्याने ओरडू लागल्या ..शेजारी-पाजारी लोकांना आवाज ऐकू जाईल म्हणून मी त्यांना पण ढकलून दिले ..आणि त्यांचे डोके दगडाने फोडले .. हे सर्व कृत्य केल्यावर मी घाबरलो .. आणि
मागच्या दाराने पळत सुटलो .. आणि समोर च्या दारात येऊन दार वाजवू लागलो.. आतून कोणीही दार उघडत नाही आहे.. असं खोटं खोटं सांगून सर्व लोकांना गोळा केले.चुकले..माझे..
साहेब मला माफ करा ..
निखिल तुला आम्ही माफ करणारे कोण?
आता कोर्टातूनच तुझा न्यायनिवाडा होईल तयार राहा.









वाह छानग
बापरे बाप, भयंकर कथा