मराठीचारोळी

मराठी चारोळी

ओठांच्या आठवणी तुझ्या ओठावर
गोंदल्या नकळत अलगद काळजावर
जाशील तर जा खुशाल डाव सोडून
वेळच असेल बहुधा औषध त्या घावावर

…मंदार बापट

मखमाली वाळुवर कशी
सोबतीचा पावलांची नक्षी
प्रणय मिलना आपुल्या
संपूर्ण दर्या किनारच साक्षी……@$

 

साक्षी तुझ्या माझ्या प्रेमाची ..

सर पहिल्या पावसाची…

सर्वांना हवीहवीशी वाटणारी..

मनसोक्त बरसणारी..

 

 

तुझ्या मिलनास ही..

अवघी सृष्टी अधीरली..

चातकासारखी पावसा तुझी..

वाट बघून आता तीही थकली..

 

 

चिंब पावसात भिजून..

तू होती ओंजळीत चेहरा लपवून..

पाहिले मी तुला चोरून …

गेलो मी मला विसरून..

 

 

घालून तुझ्या हातात हात..

दूर क्षितिजापर्यंत चालत रहावे…

ओल्याचिंब पावसात..

अगदी मनसोक्त भिजत रहावे…

 

दर्शना भुरे जैन..

रिमझिम रिमझिम.. बरसती धारा…
चिंब चिंब….निसर्ग सारा..
जलद गरजला…. खरा
शालु हिरवा नेसुन नटली… धरा

 

 

पावसात पाऊस भिजला…. जरा
हसली जोरात वसुंधरा…
चिंब भिजवीन…. मी तुला
लाजली मग गालात धरा…

 

 

शुभ्र …वस्त्रे परिधान करून नी
कटी घेतला जल कुंभ.
आतुरले… मन तुझ्या मिलनास
तु बिलग… मला पाऊस होऊन

मनी जीवनच वाटे
मखमली स्वर्ग नवा
मिळे जणू स्वप्नातील
मज स्वछंद गारवा ।।

*पद्मजा जोशी*

सुने सुने वळण अबोल वृक्षांसवे
घालती जणू आर्त साद अंतर श्वासातून,,,,,,🌴
असे निर्मनुष्य रस्ते पाहुनी वाटे
यावे भटकत कुुणी या मार्गावरूून

सौ.पद्मजा जोशी

ऐनवेळी रिमझिम पावसाची
मन वेल्हाळून गेली
साठवणीतल्या आठवणींना
परत ओल देऊन गेली

अस्मिता मार्डीकर

चारोळी

सांज झाली भेटशील ना सांग रे
वाट तुझी तरुतळी मी पाहिन रे
नको करू उशीर येण्यास तू
हूरहूर दाटते माझ्या हृदयात रे

अस्मिता मार्डीकर

 

तुझे शब्द

मी निवांत असते तेव्हा,
माझं मन तोलायला येतो
अक्षरांचा गोड हासरा,
थवा मला बोलायला येतो

अक्षरांचे शब्द बांधून
शब्दांच्या ओळी बांधत जाते
ओळी मागून ओळ लिहीता,
सुंदर कविता जन्मास येते

अस्मिता मार्डीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!