रात्रीचा प्रहर डुले होडके पाण्यात
निघाले पैलतीरी वल्हवत नाव
मौन भावनांचा खेळ चाले मनात
दिसू लागेल आता जवळी तयांचा गावं
दोघेही रमराण स्वप्नात झाले मग्न
शीतल चंद्रप्रकाश, पाण्यावरी तरंग
तार छेडून मनाची रंगले सुरेल गीत
गाण्यात जाहले तयांचे भावविश्व दंग
शुभ्र वस्र लेवून भासे जणु अप्सरा
मुखकमल भासे पुनवेचा चंद्र खास
ओठांवरी खुले हास्याची लकेर
प्रिती सुमनांचा दरवळला सुवास
भावनांचा कल्लोळ उभयता मनात
घ्यावे का वचन सात जन्माचे आज
धडधडते हृदय बिचारे क्षणाक्षणात
विचारवे येशील का असाच रोज?
विरह दाटला मृगनयनी लोचनात
अनामिक ओढीने मनी घेतला ध्यास
कधी नां संपावी मंतरलेली रात
छळतो प्रितीचा सुगंधीत आभास
©®शीला रंगारी
आधार वड
बाबा सरणावर जसा जसा जळत होता
तसा मला आज तू कळत होता
त्या धुराचे लोट माझ्याकडे वळत होते
नकळत मला बालपण सांगत होते
त्याचा प्रत्येक श्वास माझ्या वडील कविता
पावलागणिक अडखळत होता
माझ्या धडपडण्याचा आधी तो मला सावरत होता
त्याचा प्रत्येक अश्रू माझ्यासाठी गळत होता
माझ्या स्वप्नांच्या मागे तो रोज पळत होता
आज तो एकटाच जळत होता
बघणाऱ्यांच्या गर्दीला टाळत होता
शेवटच्या सुटकेचा निश्वास सोडत होता
आयुष्यभराच्या ओझ्यातून सुटका करून घेत होता
बाबा मला आज तू थोडा थोडा कळत होता
शीला रंगारी
nice one
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
Beautiful…🥰🥰🥰🥰
Thanks a lot
Thanku so much
Thanks