४अपराधी कोण?-कथामालिका
४अपराधी कोण?-कथामालिका

४अपराधी कोण?-कथामालिका

४अपराधी कोण?
अपराधी कोण?-कथामालिका
आज चवथा खून ज्याचा झाला त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे सर.
हो चारही रिपोर्टस् बघितले मी. चोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने मारले. त्यामुळे खून करणारे वेगवेगळे असतील असे वाटत आहे.
मध्ये काही दिवस जातात……पुढे वाचा
रोजच्यासारखी पिहू पहाटे  वर्तमानपत्र वाचत होती. वाचता वाचता  ओरडली
बाबा काय हे? काल पाचवा खून झाला.
बाबा तुमचे एवढे प्रसिद्ध खाते शोध नाही लावू शकत आहे.
बेटा,आम्ही प्रयत्न करुन राहलो.
जादू थोडी आहे
छूमंतर म्हंटले कि खूनी समोर यायला?
पण माझे बाबा जादूगर आहेत.ते हा तिढा सोडवणारच.
Proud of you बाबा.
पिहू तू एकटी बाहेर नको जात जाऊस.
सुधा-अहो परवाच तर तुम्ही मला आणि आईला आम्ही जास्त काळजी करतो असे सांगत होतात आणि  आता तुम्हीच.
सुधा काही कळत नाही ग.कधी कधी खूप भीती वाटते.पिहूसोबत काही ……विचार करुनही थरकाप होतो माझा.
माझी लेक कशी सुरक्षित राहील हाच विचार असतो डोक्यात.
अहो एवढे टेंशन नका घेऊ. अजून तेवढी वाईट परिस्थिती नाही आली.
नाही सुधा,तुला माहित नाही बाहेरची परिस्थिती.
मध्ये काही दिवस जातात.खूनी कोण असेल…हाच प्रश्न सर्वत्र चर्चिल्या जातो.
नगराळेला वाटते खूनी एकच असेल पण भोसलेसरांना तसे वाटत नाही.
नगराळे-सर,तुमच्या एक  गोष्ट लक्षात येत आहे का?
कोणती?
सगळे खून सुट्टीच्याच दिवशी होत आहेत.
हो.तुमचे observation बरोबर आहे.
सर,आपण तपासाची दिशा बदलवू का?
मला वाटते खूनी एकच व्यक्ती आहे.
पाचही खून एकाच व्यक्तीने केले असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
हो सर,
मला नाही तसे वाटत.
तेच तर.सर,तुम्ही मला गुरुस्थानी आहात.तपासातले सर्व  बारकावे मी तुमच्याचकडून शिकलो.पण यावेळी काहीतरी चूक होत आहे आपल्याकडून.
तुम्ही म्हणताय तर करु तसा तपास.मी दोन दिवस सुट्टीवर जात आहे.गरज पडली तर फोन करा.
हो सर.
सर,तपासाची मुदत संपत येत आहे.तपासाची दिशा बदलवू सर.
बघू मी आल्यावर.
नगराळेंना  तपास बरोबर होत नाही हे कळत होते.पण अधिकार सगळे भोसलेसरांजवळ होते.
मध्ये चारपाच  दिवस गेले.भोसलेसर दोन दिवस सुट्टी संपवून आले.
भोसले सर आॕफिसमध्ये कामात व्यग्र होते.आॕफिसची वेळ संपली तरी भोसले सर आॕफिसमध्येच बसून होते.
सर,गेले नाही अजून घरी.
नाही नगराळे.
आज घरची मंडळी सगळी लग्नाला गेली.
उद्या येत आहेत. 
घरी एकट्याला रिकामे घर खायला उठते.  म्हणून आज उशिरा चाललो.तुम्ही जाऊ शकता नगराळे.
थाबतो सर मीही जरावेळ असे म्हणत नगराळे भोसलेसरांसोबत बसले.
क्रमशः
प्रिय वाचक,कथामामालिका आवडत असल्यास  comment करुन सांगा.
कोण असेल खुनी?
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!