४सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
४सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

४सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या- By- ज्योती रामटेके

तुम्ही तिघेही मोठे झाले.काळ कसा सरला कळले नाही.
आता हळूहळू जबाबदारी कमी करायची. सध्या तरी चंदनाच्या लग्नाचे बघू या….

 

भाग-४

चंदनाचे काॕलेज संपले. आता समोर बी एड.. करायचे होते. आदर्श शिक्षिका बनायचे होते. तिला सध्या लग्न करायचे नव्हते.
आई.. बाबा किती घाई करत आहेत माझ्या लग्नाची. माझ्यानंतर अपर्णाचे लग्न, म्हणून त्यांना काळजी वाटत असेल. तरी पण एकदा आईसोबत बोलते.

चंदना-आई.. मी काय म्हणते, माझ्या लग्नाची का घाई करत आहे. मला समोर शिकायचे आहे. लग्नानंतर माझे शिक्षण थांबेल. त्या लोकांना मी पुढे शिकलेली आवडेल का?

आई- चंदना .. तुझे बरोबर आहे सर्व..पण आता तुम्ही दोघीही सारख्या दिसता. तुला वेळ झाला तर.. अपर्णाला वेळ होईल. तू लग्नानंतर बी एड करु शकते. आजकाल लोकांना आहे महत्त्व शिक्षणाचे. आपण तसाच मुलगा शोधू. मुलेही आजकाल बायकोला प्रोत्साहन देतात.
बघू काय होते तर.. आणि बघितल्यावर जुळेलच असे नाही.
शेवटी मुला.. मुलींची पसंती.

आई.. मुलींना कोणी विचारत का? अपर्णा बोलली.
सर्वात महत्वाचा असतो तो मुलगा, त्याची पसंती महत्वाची.
मुलीचे काय.. तिला समजावून सांगणारे भरपूर असतात. तिने जरा आपले मत व्यक्त केले कि झाले. मग तिला उपदेश दिला जातो.
अग बाई मुलांचे रुप नाही बघायचे,त्याचे गुण बघायचे. मुलीसाठी हा मापदंड नसतो. तिने फक्त सुंदरच दिसायचे का? मग ज्या मुली सुंदर नाहीत त्यांनी काय करायचे? आई.. वडिल बिचारे कर्ज काढून भरपूर हुंडा देऊन लग्न करून देतात. समोर त्याची भूक वाढत जाते.
मग सतत पैशाची मागणी केली जाते.
आई- अपर्णा.. खरे आहे तुझे.. पण आता काळ बदलत आहे. वेळ लागेल थोडा. आता मुलींना पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आता आपल्या घरीच बघ नं.. आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखे जगू देतोच नं.. तू तर तुझ्या मनासारखे करुनच घेते. चंदना आहे शांत.. विचारल्या शिवाय काही करणार नाही. आपले मत सुध्दा व्यक्त करत नाही.
तिचे नेहमीप्रमाणे एकच वाक्य..आई.. बाबा.. तुम्ही सांगाल ते ठीक.

अपर्णा-आई.. ती लग्नानंतर बदलायला हवी. अशाने तिला कठपुतली बनून राहावे लागेल. तुला माहित आहे नं..
एकदा शांत राहिले कि समोर ते त्याचा फायदा घेतात..
आम्हाला सुनबाई खूपच समजदार मिळाली असे सगळ्यांना सांगतात. आता आपल्या बाजूचेच बघ.. दीपा वहिनी त्यांच्या मर्जीनुसार वागली तो पर्यंत चांगली होती. ज्या दिवशी तिने तिचे तोंड उघडले त्या दिवसापासून ती वाईट झाली.

आई-अग या जगात चांगली लोक आहेत. सर्व एकाच मापदंडात नाही बसत. बघू समोर.
तसे लोक सुमनताई आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चांगले बोलतात. काल त्यांच्या घराजवळील एकजण भेटली होती. तिला मुलाच्या शिक्षणाच़े माहिती नाही,पण मुलगा साधा.. सरळ.. प्रेमळ आहे असे सांगत होती. एकदा बघण्याचा कार्यक्रम करावा असे मला वाटते.

अहो.. विमलताई.. काय सुरु आहे.‌ शोभा काकुने आवाज दिला.काही नाही ग.. मावशी पाणी घे.. चंदनाने आवाज दिला.बचत गटाची मिंटींग होती इकडे.. म्हणून येणे झाले.
नाहीतर आपले रहाटगाडगे सुरू असते.
अग तू सुमनताईला ओळखते का?
हो.. ताई.. आमच्या बचतगटाच्या मुख्य आहेत त्या. तुम्ही तर ओळखता त्यांना. तसेही त्यांना कोण नाही ओळखत.
बाई दिवसभर घरात कमी, दारात जास्त असते.
म्हणजे.. काय ग मावशी?
आई-अग अपर्णा म्हणजे फिरत असते. काय शोभा तू पण.. कामानिमित्ताने फिरत असतात त्या.
शोभाताई- ताई कामे मलाही असतात भरपूर, तारेवरची कसरत असते माझी, वेळेचे योग्य नियोजन असेल तर वेळेत होतात कामे. या बाईचे माहित नाही तुला, सकाळी घरातून निघून घरी परतायची घाई नसते त्यांना.

आई-अग शोभा.. काय बोलते,चार मुले सांभाळून.. साहेबांची मर्जी सांभाळावी लागते त्यांना. या वयात किती उत्साहात असतात त्या, शिवाय त्यांची कामे करतात. मला तर आश्चर्य वाटते त्यांचे. माझ्या कडून नसते झाले. मला तर हल्ली थकायला होते. चंदनाची खूप मदत होते म्हणून बरे आहे.
अपर्णा तर अल्लड आहे. तिला मदत करणे माहीत नाही.
तिचा स्वभाव कधी बदलेल कळत नाही. खूप फटकळ आहे बोलायला. दोघी बहिणी विरुद्ध स्वभावाच्या आहेत.

शोभाताई-अग ताई.. आजकाल फटकळच हवे, वातावरण बदलले आहे. लग्नानंतर मुलींना येते समज. आता माझेच बघ..
कशी होती आधी? आता किती बदल झाला माझ्यात.
ते अल्लड वय केव्हाच निघून गेले. आता फक्त जबाबदारीने वागायचे. सगळे होते बरोबर.

क्रमशः

पुढील भागाची लिंक

कथामालिका आवडत असल्यास नक्की like,share करा.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!