सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या -By-ज्योती रामटेके
भाग-५
शोभा, त्या विमलताईचा पियूष नावाचा मुलगा आहे, तिसऱ्या नंबरचा कसा आहे ग तो? आईने विचारले.
किती शिकला आहे? तुला काही माहिती आहे का?
मुलगा साधा, सरळ आहे. त्याच्या शिक्षणाचे नाही माहीत. चौघे भाऊ आहेत ते. सर्व मुले वळणदार आहेत.
बाईचे घरात फार कमी लक्ष असते. दिवसभर बाहेर.
मला तर आश्चर्य वाटते त्यांचे,घरी जायची कधी घाई नसते. कामे कमी.. गोंधळ जास्त असतो. म्हणून सगळी मुले लवकर स्वावलंबी बनली.
त्यांनी मुलांना कामे वाटून दिली आहेत.
ताई.. त्यांचे घर बघून तुम्हाला बसायची इच्छा होणार नाही.मुले त्यांच्या परीने आवरत असतात.
आवळा देऊन कोहळा काढणारी बाई आहे ती. पियूषला लहानपणापासून ओळखते मी.. आईचा एकही अवगुण नाही त्याच्यात. तसेही आपल्या साठी मुलगा महत्वाचा आहे.
नौकरी लागल्यावर तो दुसरीकडे जाईल. मग जास्त सहवास येणार नाही. सर्वात लहान मुलगी आहे त्यांना. ती पण भावांसारखीच समजदार आहे.
पियूषकडे बघून विचार करायला हरकत नाही.
ओळखीतला आहे. आजकाल वातावरण दुषित झालेले आहे. अनोळखी घरात मुलगी देणे नको वाटते.
आई-हो ना.आणि सगळ्यांमध्ये काही कमी.. जास्त राहणारच ग शोभा. सर्व मनासारखे कसे मिळणार? कुठेतरी तडजोड करावी लागते. मुलगा चांगला आहे,भरलेले कुटुंब आहे. ते साहेब चांगल्या पदावर आहेत.
घरी शेती आहे.घर आहे साधेसे, म्हणजे जुनेच. आता बांधणार आहेत नवीन, असे सुमनताई सांगत होत्या. मला तर वाटते बघण्याचा कार्यक्रम करुन टाकावा. अपुर्वला बोलवावे लागेल.त्याची लाडाची ताई आहे चंदना.
मुलगा B.. com.. आहे असे सुमनताई म्हणत होत्या.
लवकरच बॕकमध्ये लागणार आहे.
दुपारी सुमनताई आल्या. जेवण झाल्यावर विषय काढला.
काय म्हणतात प्रभाकरराव? चंदनाचा विचार घेतला का?
हो.. हो.. विचारले तिला. एकदा बघण्याचा कार्यक्रम करु या. सर्वप्रथम चंदना.. पियूषची पसंती महत्वाची आहे. नंतर बघू काय होते ते. त्याची मने जुळायला हवी. हे ऑफिस मधून आले कि आम्ही सांगतो. तसा रविवार ठीक राहिलं.
रविवार उजाडला. अपर्णा जरा नाराज होती. अपूर्व आला होता. चंदना नेहमीप्रमाणे जास्त वेळ स्वयंपाकाच्या तयारीत होती.
चंदना तयारी कर.पाहुणे यायची वेळ झाली. बाबांनी आवाज दिला.
सुमनताई आल्या,सोबत पियूष आणि त्याचे बाबा होते.
पियूषला बघितल्यावर तो सर्वांना आवडला. त्याच्या चेहऱ्यावर शांत, सालस भाव दिसत होते. बोलण्यावरून समजदार वाटत होता. अपर्णा सर्वांचे हावभाव बघत होती.
ताई.. मान वर करून बघ जरा.. हळूच चंदनाला सांगत होती. पियूषने तिथेच चंदना आवडल्याचे सांगितले.
चंदनाला पियूष आवडला, त्याच्या दिसण्यापेक्षा त्याचा सालसपणा भावला तिला. तिला समजून घेणारा जोडीदार तिला हवा होता.
पियूष जास्त बोलत नव्हता.. तसाही तो कमी बोलायचा.
त्याला काही विचारले तर सुमनताई बोलायच्या. सर्व गोष्टी ठीक वाटत होत्या.
ताईला बोलायचे आहे मुलासोबत अपुर्वा सांगत आली. आईला हा कारभार अपुर्वाचा आहे हे कळले. पियूष आत गेला. चंदनाला काय बोलावे सुचत नव्हते. मुळातच ती लाजरी.
बाबांनी शिक्षणाचा विषय काढला. सुमनताई मध्येच बोलल्या, तुम्ही पण करा हो चौकशी.
नाराज नका होऊ ताई. हे तर विचारायलाच पाहिजे. बाबा बोलले.
अहो,आपण एका शहरात राहणारे. तुम्हाला आमची माहिती कळणारच.तसेही तुम्ही चौकशी केली असणार.
आम्हाला चंदना पसंत आहे. बाकी तुम्ही ठरवा.चंदनाला पियूष आवडला कि नाही, तिला विचारा. काय ठरेल ते कळवा आम्हाला. पियूषचे बाबा मौनव्रत धारण करून बसले होते. जे बोलायचे ते सुमनताई बोलत होत्या.
त्यांनी पियूषला आवाज दिला. तो निघाला. चंदनाचे आणि त्याचे बोलणे झालेच नाही. तिला बोलायचे होते.
प्रत्येक वेळेस चंदनाचा लाजाळू स्वभाव मध्ये येत होता.
अपर्णाला आईने जास्त बोलायचे नाही म्हणून दम दिला होता. पाहुणे गेल्यानंतर अरे आपण तर हे विचारलेच नाही
यावर चर्चा सुरू होती. ताई तू फोन नंबर का नाही घेतला? अपर्णाने विचारले.
आई तू विचार नंबर सुमनताईला.
आई-अपर्णा या रविवारी त्यांच्या घरी जायचे आहे. तेव्हा मागेल त्यांना.
क्रमशः
पुढील भाग खालील लिंकवर
कथामालिका आवडत असल्यास नक्की like,share करा.








Khup chhan katha
छान कथा
छान कथा