चोर पकडला पोपटांनी
आज विराजने आत्याकडे चोराची गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.
आत्या -आज मी तुला विराजचीच गोष्ट सांगते. आत्याचे बोलणे एकूण विराज खूष झाला. आत्या सानुताईला पण गोष्टीत घे विराज म्हणतो. बरं.. असे म्हणत आत्या गोष्ट सांगायला सुरुवात करते.
विराजचे मोठे घर असते. घरी विराज, आई, बाबा आणि दोन पोपट मिठू आणि मिठी राहत असतात. सानुताई विराजकडे शाळेला सुट्ट्या लागल्या की नेहमी येत असते.
एकदा विराज आणि त्याची सानुताई दोघेच घरी असतात.सोबत मिठू आणि मिठी पण असतात. मिठू-मिठी गोष्टी सांगण्यात पटाईत असतात.
एकदिवस आई बाबा दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर जातात.
विराज आणि ताई साठी फटाके, कपडे आणायला जातात.
खरेदी करता करता त्यांना उशीर होतो.
संध्याकाळ होते. अंधार पडायला लागतो.
मिठू-मिठी बरोबर दोघे खेळत असतात.
तेवढ्यात ताईsssssसानूताई ssssमिठू खिडकीकडे बघून ओरडतो.
ताई खिडकी कडे बघते. तिथून एक माणूस आत येतांना दिसतो.
ताई घाबरून रडायला लागते.
लहानगा विराज ताई कडे बघतो. तो लगेच उठून खिडकी लावायला जातो.
पण तोपर्यंत तो आत येतो.त्याच्या मागून दुसरा माणूस पण येतो.
दोघेही रडणाऱ्या ताईला धमकावतात. ताई घाबरून चूप बसते.विराज पण घाबरून चूप बसतो.पण ताईला समजावतो ताई घाबरू नको. मी आहोनं. मी वाचवतो तुला.
ताई चूप बसून आता कसे वाचायचे याचा विचार करते.
बाबाला फोन करायचा विचार करते पण चोरं घराचा अंदाज घेत तिथेच उभे असतात.
एक चोर आत जातो. आणि दुसरा चोर ताईचे, विराजचे हात खुर्चीला बांधतो. विराजची खुर्ची मिठू च्या पिंजऱ्याजवळ असते. आत गेलेला चोर ओरडतो.
बहादूर जल्दी आ बहोत माल पडा है इधर.
दोघांचे हात पाय बांधून आता दुसरा चोर मोठी पिशवी घेऊन बिनधास्त
खोलीत जातो.
विराज आणि ताई चुपचाप बसून असतात. ताई चोरांना कसे पळवायचे हा विचार करते.
ताई विराजला पिंजरा उघडण्याचा इशारा करते. विराज हात बांधून असले तरी खूप प्रयत्न करून मिठीचा पिंजरा उघडतो. मिठी पटकन बाहेर येऊन चोचीने मिठूचा पिंजरा उघडतो.
दोघेही चोर असलेल्या खोलीत जातात. चोरांना चोचीने टोचून बेजार करतात.
दोघेही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. पण मिठू-मिठी त्यांना घरभर फिरवतात. एक चोर मिठूला पकडतो तो ओरडतो. मिठी चोराला चोचीने टोचते. तो मिठूला सोडून देतो.
तेवढ्यात दाराची घटी वाजते. घाबरून चोर खिडकीतून पळून जातात.
आईबाबा किल्लीने दार उघडून आत येतात. झाला प्रकार त्यांच्या लक्षात येतो.
सानुताई आणि विराजला सोडवतात.
दोघेही काय काय झाले ते सांगतात.
आईबाबांना ताई, विराज, मिठू, मिठी यांच्या प्रसंगावधानतेचे कौतुक वाटते.
आई बाबा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतात. दोन दिवसांनी पोलीस सगळ्यांना पोलीस स्टेशन ला बोलवतात.
आईबाबा, सानुताई, विराज जातात.
तिथे आठ, दहा माणसे होती. सानुताई, विराजला चोराला ओळखायला सांगितले. चोर त्या दिवशी मास्क लावून होते म्हणून ते दोघेही ओळखू शकले नाही.
चौघेही घरी वापस आले.
दुसऱ्या दिवशी मिठू-मिठीला घेऊन गेले.
दोघांचाही पिंजरा त्या पकडलेल्या माणसांजवळ नेला. मिठू-मिठीने लगेच चोरांना ओळखले.
सर्वांचे लाडके असणारे मिठू-मिठी आता जास्तच आवडते बनले.
आवडली का विराज गोष्ट?
हो. मिठू-मिठी खूप हुशार आहे नं आत्या. त्यांनी चोराला पकडले…. असे म्हणत विराज झोपी जातो.
प्रिती










छान बालकथा
खूप छान .. बालकथा