मराठी प्रेमकथा- नवे आयुष्य
अनुपमा खिन्न मनाने हाँल मध्ये बसून होती .किती उदास आणि एकाकी वाटत होत तिला सगळीकडे निरव शांतता पसरली होती .रातकीडे अजूनच वातावरण भयानक करत होते .सगळीकडे अंधाराच साम्राज्य पसरल होत .हे अस आजच घडल नव्हते . कितीतरी दिवसापासून हे असेच सुरू होते.अनुपमा विचार करत पलंगावर झोपून होती .
अशाप्रकारे किती तरी रात्री तिच्या चालल्या होत्या .निनादच्या आठवणी अस्वस्थ करायच्या.मी माझ्या मुलाला समजुन घेतले असते तर…..
तेव्हा मी किती कृर बनली होती .या विचारातच ती राहायची .घरी खूप श्रीमंती होती .काही कमी नव्हते नावाजलेले घराणे होते त्यामुळे स्वभावात थोडा शिष्टपणा होता पण या उलट निनाद होता.
साधा सरळ अभ्यासात हुशार , आईवर खूपच जीव होता त्याचा.आईच्या शब्दाबाहेर तो कधीच जायचा नाही.
वडिलांच्या पश्चात आईने आपल्याला किती जबाबदारीने सांभाळले याची जाणीव होती निनादला.
‘वहिनी’ ,
असा आवाज देत शाम आला.शाम तिचा दिर
आवाज येताच ती दचकून पाहू लागली .
” शाम मी उद्या हे घर , गाव सोडून जाणार आहे.मी माझी सारी संपत्ती वृध्दाश्रमाला दान दिली आहे.मी सकाळीच निघून जाणार आहे.”
शाम तिची समजूत काढू लागला. अनुपमाला आता हे सारे असह्य झाले होते .काय चुक होती निनादची इच्छा नव्हती तरी त्याला शहरात पाठविले.सतत काळजी वाटायची पण तो खूपच समजदार होता.
अभ्यास करून मेडिकलला गेला तिथेच त्याला केतकी भेटली. नावासारखीच सुंदर आणि गोड होती ती
घरात फक्त आई होती. घरची परिस्थिती बेताची होती
निनादला केतकी खूप आवडत होती .तिचा शांत आणि सालस स्वभाव होता. ती निनादच्या दूर राहायची पण ती कधी त्याच्या जवळ आली तिलाही कळले नाही
दिवस जात होते . निनादची आई आपल्याला सून म्हणून स्वीकारेल का?याची भीती तिला वाटायची .निनाद खूपच श्रीमंत आणि आपण तर सामान्य घरातील तिला खूपअस्वस्थ व्हायचे .निनाद तिला समजावून सांगायचा
‘आईच आपल्यावर किती प्रेम आहे , तिने मला कधीच
दुःख दिले नाही , माझी प्रत्येक इच्छा ती पूर्ण करते
आपल्या लग्नाला ती लगेचच होकार देऊन टाकेल याची खात्री आहे मला.’
असे सांगत राहायचा.अनुपमा निनादसाठी मुली बघत होती .निनाद आल्यावर आपण त्याला सांगू असे तिने ठरविले होते.परीक्षा झाल्या .घरी गेल्यावर केतकी विषयी आईला सांगू असे त्याने ठरविले होते .केतकी खूप खूष होती तिने आईला सर्व सांगितले होते .आईचा होकार होता .निनाद घरी जायला निघाला.
केतकी नाराज होती .आईला घेऊन लवकरच तुझ्या घरी येतो असे सांगून निनाद निघून गेला.
अनुपमा खूपच आंनदात होती .निनादला मात्र सारखी केतकी दिसायची .कधी आईला सांगतो असे त्याला झाले होते
आई मध्येच लग्नाचा विषय काढायची .समाजातील
उच्च घरातील मुली तिने बघून ठेवल्या होत्या .
रावसाहेबांची राधा अनुपमाला खूप आवडली होती
दोन्ही घराणे श्रीमंत होती .रावसाहेबांना पण निनाद आवडायचा.शेवटी केतकीचा विषय निघाला
घरातील सर्व स्तब्ध झाली .सर्वांना अनुपमाचा स्वभाव
माहिती होता .तिची जिद्द माहिती होती .निनाद केतकीचा प्रेमळ , साधा स्वभाव आईला पटवून सांगत होता .
मी तिच्या शिवाय जगू शकणार नाही , काय कमी आहे केतकीत ?
अनुपमाच्या जगात प्रेमाला कुठेही स्थान नव्हते.तिला तिची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटायची .आपला प्रत्येक निर्णय हा बरोबरच असतो अशी तिची ठाम समजूत होती .निनाद आपल्या शब्दाबाहेर जाणारच नाही असे तिला वाटायचे.
खूप प्रयत्न करूनही आई आपले ऐकत नाही याचे निनादला खूप दुःख होत होते .आईला कसे समजावून सांगायचे हेच त्याला कळत नव्हते .
आईला पैसा ,प्रतिष्ठा आपल्यापेक्षा का प्रिय आहे याच उत्तर तो शोधत होता .केतकी सुंदर होती , डाॕक्टर होती आपल्यावर कितीजीव आहे तिचा काहीही झाल तरी तिला सोडायचे नाही असे त्याने ठरविले होते.
ऐके दिवशी जरा अतिरेक झाला. आई राधाशीच लग्न कर, म्हणून हट्टाला पेटली.निनादने विरोध केला. आईशी त्याचा वाद झाला आणि नेहमीच शांत असणारा निनाद घर सोडून निघून गेला.आनुपमाला निनाद घर सोडून जाईल असे वाटले नव्हते.त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता हा. हळूहळू निनाद घर सोडून गेल्याची बातमी सगळीकडे पसरली. केतकीच्याही कानावर गेले.काहीच दोष नसतांनाही केतकीला ही शिक्षा मिळाली होती
तिला तर काहीच कळत नव्हते .माझ्याच मुळे हे सर्व घडले याचेच फार दुःख होते तिला .
कुठे असेल निनाद?
कुठे शोधू त्याला ?
कसा असेल?
परीक्षेचा निकाल आला होता.दोघेही पास झाली होती
केतकी सतत निनादच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती .आई तिला सारखी समजावून सांगायची
आपल्या आततायीपणामुळे निनाद घर सोडून गेला याची सल अनुपमाला सतत बोचत होती.
आपल्या अहंकारी स्वभावाने तिने मुलाला कायमचे दूर केले होते .केतकीला हो म्हटले असते तर…आज निनाद सुखात असता , दोंघाचा छान संसार राहला असता.माझ्या हातून किती मोठे पाप घडले.कुठे शोधू त्याला?कसा असेल माझा निनाद?
याच विचारात अनुपमा राहायची .हे गाव सोडून शांत ठिकाणी राहायचे होते .
रिझर्वेशन नसून सुध्दा ती निघाली होती.तब्येत पण बरी नव्हती .घरातील गाडीने जायची इच्छा नाही झाली.
आता त्या गोष्टींचा कंटाळा आला होता .स्टेशनवर खूपच गर्दी होती.कशीबशी ती गाडीत चढली .बसायला जागा नव्हती
गाडीने प्रवास करण्याची पहिलीच वेळ होती
बरे वाटले तिला गर्दी बघून .आतापर्यंत अशी गर्दी पाहिली नव्हती . ती उभीच होती .
” आई , बसा इथे माझ्या जागेवर.
अनुपमाने आवाजाच्या दिशेने बघितले. कित्येक दिवसांनी आई हा शब्द कानी पडला होता .आवाज देणारी मुलगी किती गोड होती .
‘तुम्हाला बर नाही का , पाणी पाहिजे का ‘
असे विचारत बसायला जागा दिली .बसल्यावर बरे वाटले तिला.ती ऐकसारखी केतकीकडे बघत होती
अनोळखी असूनही किती जीव लावला.केतकी आपल्याच विचारात बसून होती .खिडकीतून बाहेर बघत होती .
गाडीच्या वेगासोबत झाडे ,टेकड्या वेगाने मागे पडत होत्या .आपल्या आयुष्याचे पण असेच झाले.
निनादसोबतचे सुखद दिवस मागे पडले. तिच्या डोळ्यात अश्रु तरळले.निनादच्या आठवणीत ती रमून गेली
अनुपमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला .तो स्पर्श तिला तिच्या आईसारखाच वाटला. तिच्या मनातले वादळ त्यांना माहित करून घ्यावयाचे होते .तिचा उदास चेहरा
बघवत नव्हता ,
कुठे चालली बेटा ?
असे म्हणत बोलणे सुरू केले ,ऐका आश्रमात नौकरी करायला चालली असे केतकी सांगू लागली .लग्नाचा विषय निघताच केतकी शांत झाली .तिला निनादची खूप आठवण आली. भावनेच्या आवेगात तिने अनुपमाला तिचे दुःख सांगितले .
” आई आमचे लग्न होणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते.निनादच्या आईचा अहंकार आड आला.’
केतकी रडत होती .अनुपमाच्या पायाखालील जमीन सरकायला लागली .आपण किती मोठा गुन्हा केला
जवळ असली हिरा असतांना आपण दुसरेच काहीतरी शोधत होतो .केतकीला सर्व सांगावे असे वाटत होते
सांगायचे ठरविले पण नाही सांगू शकले.
रात्र झाली होती .केतकीचा डोळा लागला होता
थोड्या वेळातच अनुपमाला उतरायचे होते .केतकीकडे बघायची तिची हिम्मत नाही झाली .उतरायची वेळ आली
उतरतांना हळुवार
” मला माफ कर बेटा”
असे पुटपुटल्या
केतकी जागी झाली .अनुपमा उतरली होती .केतकी पण उतरली .केतकीच्या हातात सोन्याचा हार होता .
हा हार आईने आपल्या पर्स मध्ये का टाकला ?
ती उत्तर विचारत होती .तेवढयात आई..केतकी ..असा आवाज आला .दोघी इकडे तिकडे बघू लागल्या
आवाज तर निनादचा होता .निनाद आणि गुरुजी समोर
उभे होते.दोन वर्षांनी निनादला बघत होत्या त्याला
पकडून रडत होत्या .
” आई तुला नाराज करून मला
लग्न करायचे नव्हते ” …मग मीच ठरवले आणि आश्रमात आलो.तु गुरुजीला फोन करायची , रडायची
सर्व माहिती होती मला.तुझ्यात झालेला बदल मला कळत होता .केतकी माझी वाट बघत आहे याची जाणीव होती मला.मला तुम्ही दोघी हव्या होत्या.
तिघेही खूप खूष होते ,आता नवीन आयुष्य सुरू होणार या आंनदात
तिघेही आश्रमात जायला निघाले….
ज्योती रामटेके








सुरेख
सुंदर लिहिले
उत्तम लिखाण
Uttam likhan 🌹🌹🌹
Waaha