दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती

 

काल सहजच काही net browsing करत होते, त्यावेळेस हे चित्र समोर आले. मी वेगवेगळ्या फोटोग्राफीच्या, तसेच चित्र कारांसाठीच्या sites, blogs बघत असते, त्यामुळेच असे फोटो, चित्र upload झाली की माझ्या browser वर ती pop-up होउ लागतात. त्यातलेच हे एक….
चित्र तसे काल्पनिकच आहे.
चित्रकाराने क्षितीजावरच्या सूर्याची रंगांची उधळण अचूकपणे टिपली आहे.
पण काहीही म्हणा माणसाने एखादी गोष्ट कितीही कौशल्याने रंगीबेरंगी केली, तरी निसर्गाची जी रंगसंगती असते ना त्याला तोड नसते. विविध फुलांचे रंग, पक्षांच्या पिसांचे ,पंखांचे रंग अगदी अप्रतिम असतात. आणि त्या विविधतेला ही मर्यादा नाहीत. हेच पहा ना उगवतीचे रंग वेगळे , मावळतीचे रंग वेगळे, काळा पाषाण, आणि फरशीचा काळा कडप्पा यांच्या रंगात फरक आहेच. मी असे ऐकून आहे की कापड, आणि वेगवेगळ्या वस्तू, जसे मोबाईल, tv, गाड्या यांचे जे रंग असतात त्याची प्रमाण मानके आहेत.आणि प्रत्येक रंगाला, शेड ला त्या मानकानुसार एक नंबर दिलेला आहे. मग फुललेल्या टपोऱ्य गुलाबाच्या फुलाच्या रंगाचा शेड नंबर खरच कुठला हे मला जाणून घ्यायला आवडेल…..असो…
आता विचार करा तके मोठे हिमनग, स्वच्छ अवकाश, हे किनार्‍यालगत असू शकत नाही, दूर समूचित्रात ह्या रंगसंगती बरोबरच बर्फाचे एक प्रचंड मोठे शिल्प ही दिसते, तसेच आजूबाजूला छोटे मोठे तरंगणारे हिमनग दिसत आहेत. एकूणच निसर्गाचे एक मनमोहक रूप चित्रकाराने चितारले आहे.अथांग निळेशार पाणी, त्यातला हिमनगात तयार झालेला बोगद्यासारखा रस्ता, आणी त्यातून जाणारे एक छोटेसे गलबत!!!ईथेच थोडे वेगळे वळण हे चित्र घेते.

द्रात माणसाचा वावर नसलेल्या अतीशय थंड अशा टापूतील हे चित्र आहे. मग अशा ठिकाणी हे छोटे गलबत, कसे, आणि ते ही काळे….जरा त्या गलबतावर बोट ठेवून त्याशिवाय चित्र पहाण्याचा प्रयत्न करा, काय जाणवते? आणि आता बोट काढून पूर्ण चित्र पहा…काळे गलबत एकदम नजरेत येते…
मी जे ‘वेगळे वळण ‘ म्हटले ते ईथेच आहे.
मूळ निसर्ग अतिशय मनमोहक, स्वच्छ, मनाला भावणारा आहे. पण मानवाच्या अमर्याद हस्तक्षेपाने त्याला गालबोट लागते…..हे त्या गलबताचे रूपक घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणूनच त्याचा रंग काळा ठेवला आहे. आणि दुसरे असे की किनार्‍यापासून ईतके दूर ते येणे हे मानवाचा अमर्याद हस्तक्षेप अधोरेखित करतो
एकूणच चित्रकाराने ही एक छोटीशीच पण महत्त्वपूर्ण theme  मनात ठेवून हे चित्र रेखाटले असावे.

बाकी चित्रकलेच्या angle ने पाहिले तर, रंगसंगती, ईतर effects जसे पाण्याची खोली, हिमनगाची भव्यता, वातावरणातील कमालीचा गारवा..हे सगळेच योग्य रीतीने रेखाटले आहेत.
चित्र कलेच्या दर्जाबरोबरच एक महत्त्वपूर्ण them ही हे चित्र अधोरेखित करते. एकूणच निसर्गाची भव्यता, अनाकलनीयता, आपल्या कुंचल्यात सामावण्याचा प्रयत्न चित्रकार करतो………त्या दोघांसाठी….त्या बर्फाच्या शिल्पासारखे माझे कर आपोआपच जुळतात

वैशाली जोशी खोडवे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचेसाहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!