मुका दांगळो-varhadi katha
मुका दांगळो-varhadi katha

मुका दांगळो-varhadi katha

माय,,,,,, कशी साजरी दिसुन रायली व सोन्या तु ..
लक्शमीच जसी ……
कवा आली?
…….कालच आली आत्या .
.तुही माय त मने अगूदर याले नाही मनुन रायले पावनेब्वा ……”
हव न नाईच मने ,,,मीन जिद्द केली…. आदय आपट केली लडफड केली,, मंग येनच पडल त्याईले
येळेवर कस आली असती आत्या …मंग हयद गियद हुन गेली असती न मनुन ,,,जराक सा आव आना लागला….
तवा हे ध्यान सुद आल ….आन कालि घेउन आले मले …आपच लग्ना लोक संग रायतेत …मंग जाउ संगमंग….
बरोबर का नाई वो आत्या .. जोळच लगीन हाय न ….
हो वो ..तु लय गुऩाची .व..सरक आनल नवर्या ले ……
चाल पिरते. …..येतो…व सोनिया …. कर साजरी मजा,,,फटु गिटु कायजो
कोन व्हय हो हे मैना . ……
नवर्या ले सरक आननारिन ..निरा मैने वानीच बोलते….

अव ,,,,वयखल नाई तुया…
ध्रुपदा ची पोरगी व्हय ना लायनी…लहानपनी निर कयकेल हिंडे माय चा मांग मांग ..आता पाय न कशी चयकली …भल्या बाता करते ……
हो बैना जमानाच बदलला …आपल्या वक्ती होत का अस …बोलो का आपुन… धन्या पुढ…
..तुहे ,,भाऊजी हुं त ना सईन करे…
फुगेलच राये थो ब्वा सदानकदा.इतका तापळ सौभाव ,,,,बापाबापाबापा…..
लखु चा लग्नात ..
दादा च मोठ पोरग व …लखन ,,तेचा लग्नाची गोठ…
काय रुसला बैना .माह्या घरचा ब्वा……. टम्म फुगेल … हुंहुंहुंहुं ….निर हुंहुंच…
जेवन नाही,,
का नाश्ता नाही ..इय भर उपाशी ..निरे कडकड .
का,,,,, त मने ,,,मले साल्या न नाष्टा कराले पुसल नाही … सोता मुटु मुटु नास्ता केला …. काई पथ ,,पद्धत हाय का नाई मने तुमचा ईकये….
सांग ,,,माये त दहा गेले न पाचच रायले ,,,,मले वाटे च का हा ब्वा दांगडो घालतेच आता,,
अव … पिरती ,
दादा ले साकर ची बिमारी लागली कानाई ,,तवा पासुन त्याले टाईमावर न्यारी आन गोई द्या लागते …. मुन सन्या वईनीन दादा ले देल वाढुन …आन गोई बी देली… याईन थेस पायल ..बाई ….
कायकाय सोंग करे माय …काई केल्या ऐके न …अक दाना त खाल्ला नाई बाई या बुआ न …..
ऊन मने मी ….आन जे मंग नवरी काढाचे टाईमाले चक्कर येउन पडल हे ब्वा …..रायली नवरी निंघाची…सरा धिंगाना मांडवात …. सरा मांडव ह्या ब्वा च्या हिकमती ले ….पुदिना आन ….उसाचा रस आन ….कुनी मने ऊन लागल ..कुनी मने मांडव लागल …..काई ईचारु नको …खरी गोठ मले माईत होती …डा. येई लोक या ब्वा ले ..उल्टीन संडास सुरु झाली ……काय ईचारत ..दांगडो…. मंग धावत कोन हु त… त….
माहा भाऊ ….माये मानस,,,,
थो दिस काडला बाई आन ..कसेबसे घरी पोचलो ….
मुके चा मुके तुहे भाऊजी माया ईके त पायेच नाई …..मंग भलतिसा सरम लागे त्याहिले ….का आपुन गऴ्या ..चादळ््ल्या गोष्टी साठी धिंगाना केला …….
तवा पासुन जेवना वर राग काढतस नाही बुवा,,,, पन वागतेता तसेच…. … तरी तोरा कमी होते का धन्याचा ….. नाई बापा
मी बी मनतो. त्याईची हयात गाजवुगाजवु गेली आता कायचे मुरतेत . ते …आपन आपले चालुले चालु रहाव …. काय करत…
……पदरी पयल ध्यान……
……त्याचा च कराव मान …
त्याहिचासी च राखाव इमान …….
अशी गत हाय बैना …..
आता जमाना बदलला पिरती .
..पोरी आपल्यालेच सांगतेता ..सरका च आनला नवरा….हाय का नाई मज्जा ,,,,जाऊ द्याव ,,,आपन बी नव्या च नव हासुन च पुढ न्याव …काय करा लागते

मुका दांगळो ऐकण्यासाठी  खालील  लिंक बघा

 

https://youtu.be/N-kXESAUb80

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!