गंगु बुढी वावरातून आली…
अव सारजा एक गीलास पाणी आन व माय
नयडा नीरा सोकुन आला .जीव कवाचा पाणी पाणी
करून रायला.
बीन दुधाचा च्या बी मांडजो जरासा
बापा मी तवाची बोंबलुन रायली..अण ही हेंबाळतोंडी काय
करून रायली बापा.
नीरा दिस भर त्या टी..वी च्या डब्यात डोक्स खुपसुन रायते.
हे मायवाल पोरग हाये बायकोचा बैल
नीरा तीच्याम्होर शींग हालवत रायते.
माया पोराले भाड्याचा बैल करून ठेवला तीन
सकायपासुन पोरग वावरात गेल.
घरी हे म्हसाळ पाय पसरून त्या डबड्यात मुंडक खुपसुन आहे.
काय जमाना आला माय.मले त बोलाची सोय नाई
वसकन आंगावर येते.
अव सारजा…
काय व आत्याबाई.काय मनता
बापा सारजा येवढा साज करून कुठ चालली
ओठाले लाली काय साजरी दिसते काव.
गावातले लोक काय मनतीन.माया तोंडात शेन
घालतीन ते.साडी बी नवीन दिसून रायली.
माया पोराचा कष्टाची कमाई असी उडवत व्हय.
अव आत्याबाई किती वटावटा करून रायल्या व.
तवा ची मुकाटयान आहो मी.
मले शहरात बचत गटाच्या मिंटीगले जा च आहे.
अव पण एवडा नट्टा..फट्टा करून जा लागते का.
अन माय पोरग वावरातुन थकुन भागुन येईन त्याच काय
त्याले भाकर तुकडा केला कि नाय
सबन केल.तुमच्या भाकरी बी बदडुन ठेवल्या
गीळा अन झोपून जा.
हे पाय सारजे मले काय कराच ते शिकवू नगस
अण त्या थैल्यात काय निउन रायली.
काई नाई …कागद हायेत बचतगटाचे.
आत्याबाई आज मालकाले घरी याले उशीर होईन
त्यायचा फोन आला हुता
तो बैल तुलेच फोन करते.मले सांगता खेपीस
त्याची दादखळी बसते.
तुमच्या धाकापायी सबद निंगत नाई ना.
जाय माय..शहरातुन ते पीजा कि ढीजा काय व्हय त ये गिळुन..तटीसा गेली का पानीपुरी…भेळ काय..काय खादाळुन येते.आमी खातो शिळे कुटके
दिस सरला…सारजा व धनी…सोबत घरी आले
आत्याबाई..झोपल्या ..काव
घरात वास त लय साजरा येऊन रायला घमघम.
या घरात तुमची आरती करतो..
बाप्पा..काय केल आमी
कोनता सिनेमा पाले गेले हुते
खोट बोलुन गेले.
अव सारजा थैल्यात तु याचे कपडे भरत होती ते म्या चोरून पायल हुत. अन दुपारी सदा सांगत आला.
तुम्ही दोघ टाकीजात दिसले म्हुन.
अव आत्याबाई आज वलनटाईन दिस होता
मनल आपण बी जरासी मजा करू
पण तुमच पोरग तुमच्या धाकापायी तयार होईना मंग म्याच युक्ती केली.
अव सारजा.. मी बी आई आहो तुमच्या खुशीत मले चांगल वाटते.अव पन हे अस केल्याने पीरेम वाढत नाई.ते आतुनच पाईजे. आमच्या वक्ताले होत का हे.आमचा किती जीव हुता एकमेकावर. आजकाल तुमी..पोर..पोरी नीरा दिखावा करता म्हणून भेव वाटते.
आयत भेटल कि मानसाले किंमत नाई राहत
आमी काडी..काडी करून जमा केल
तस तुमी बी कराव अस वाटते.
पण हौस मौज बी पायजे.
हा खा शीरा..अन झोपा.
उद्या सकाईच वावरात जा च आहे.
त्या वलनटाईन..कि फलनटाईनन पोट नाई भरत
कष्टाने पोट भरते.
शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.
https://marathi.shabdaparna.
.ज्योती रामटेके








