तृप्त प्रेमात मी-भूतकथा मराठी
ज्योती रामटेके
भूतकथा मराठी
वीरु आणि राधाची मराठी भूतकथा
वीरूची पहिल्यांदाच खेड्यात बदली झाली.शहरातला वीरू प्रथमच खेड्यात जाणार म्हणून आईला काळजी वाटत होती.तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या गावची बस पकडावी लागत असे.मोजक्या दोन….तीन बस होत्या. शेवटची बस रात्री अकरा वाजता राहायची.वीरु मध्ये लागला होता.उद्या निघायचे म्हणून त्याची गडबड सुरू होती. आधी गाडीने जायचा विचार सुरू झाला पण रस्ते माहीत नाही.कसे जाणार ?शेवटी बसने जायचे ठरले.
उद्याचा दिवस उजाडला खेडेगाव तो प्रथमच बघणार होता.
तालुक्याच्या ठिकाणी तो पोहचला. तेवढयात जोराचा पाऊस सुरू झाला.पाऊस थांबतही नव्हता.मुसळधार पाऊस होता.त्याला तर काय करावे हेच सुचत नव्हते.या पावसाच्या धामधुमीत बस निघून गेली आता शेवटची बस होती.पाऊस सुरूच होता. तेवढयात एकच गोंधळ झाला
…शेवटची बस आली…चला..चला..लोक धाऊ लागली.वीरू धावायला लागला. कसातरी बसमध्ये चढला.आज बाजाराचा दिस होता म्हणून एवढी गर्दी आहे बाबा असे कोणीतरी कुजबूज करत होते.
वीरू जागा शोधत होता.पार वैतागला होता तो.तेवढयात मागे त्याची नजर गेली.एका सीटवर एक मुलगी बसून होती.तो तिथे जाऊन बसला.मुलगी खूपच सुंदर होती.चेहऱ्यावर वेगळेच तेज होते.शहरामध्ये किती तरी सुंदर मुली बघितल्या पण हे सौंदर्य काही वेगळेच होते.
खर सौंदर्य यालाच म्हणत असावे असे वीरूला वाटत होते
ती काहीतरी वाचत होती .पाऊस तसाच बेधूंद सुरू होता.वर्ष भराचा पाऊस आजच पडणार कि काय असे विरूला वाटत होते.
ती वाचण्यात गुंग होती.मध्येच एखादी वीज चमकायची.त्या प्रकाशात तर तिचे सौंदर्य अजूनच उजळून जायचे.तिच्या सोबत बोलण्याची वीरूला घाई झाली होती .कोण असेल ही?अशा पावसाच्या वातावरणात कुठे जात असेल.सोबतही कुणीच नाही ..त्यात ही पावसाळी रात्र .त्याला आता तिची उगीचच काळजी वाटू लागली
लग्न झाले असेल का?आता तो तिच्या गळ्याकडे बघू लागला.मंगळसुत्र शोधू लागला.खरेच विवाहित असेल का ?नसेलच..देवा प्रथमच मला ही मुलगी खूप आवडली.तिला आता विचारतोच सर्व …कुठे राहते?…कुठे चालली.?हा प्रवास संपूच नये असे त्याला वाटायला लागले
तेवढयात बस थांबली. आणि ती मुलगी घाईघाईने उतरली.वीरू बघतच राहिला.बाहेर अंधाराच साम्राज्य पसरले होते.तिला घ्यायला कोणीतरी नक्कीच आले असेल.असे वाटून वीरू विचार करू लागला
.तिचे नाव पत्ता मिळायला पाहिजे होता.एक अनामिक नात…जिवाला अगदीच व्याकूळ करुन गेले.काही नाते नाही….ओळख नाही तरीही ती किती जवळची वाटू लागली होती.का असे वाटत असेल…या आधीही किती मुली भेटल्या पण ही हुरहूर कधी जाणवली नाही.यालाच पहिले प्रेम म्हणत असावे.
वीरूचे गाव आले. आॕफिसचे लोक घ्यायला आले होते. घर छान होते.कसेबसे जेवण करून तो उद्याच्या प्रतिक्षेत झोपी गेला.स्वप्नात तो तिलाच बघत होता.दिवस उजाडला.गावातील वातावरण किती सुंदर वाटत होते.प्रसन्न आणि आंनदी.तो बँक मध्ये गेला. पण पुन्हा तेच… त्याला काही सूचत नव्हते.तो बँक बंद होताच तालुक्याच्या ठिकाणी आला.शेवटच्या अकराच्या बसमध्ये बसला.नजर तिला शोधत होती.आणि ती दिसली त्याच जागेवर.
आज बसमध्ये गर्दी नव्हती .तो तिच्या जवळ जाऊन बसला. .आज तिला विचारायचेच असे त्याने ठरविले होतेच.ती वाचण्यात गुंग होती.तेवढयात बस थांबली.ती उतरली तिच्या मागेच विरु उतरला.ती चालत होती.विरूनी तिला आवाज दिला.ती थांबली.
अग कोण तू ?तुझे नाव काय?….राधा तिने हसतच सांगितले
कूठे निघाली ? किती अंधार आहे.ती हसली.तिने बोट दाखविले ते बघ माझे घर..मला सवय आहे.जाते मी.मी येतो नं…वीरू मागे लागला …नाही बांबाना आवडणार नाही.
उद्या पुन्हा भेटायचे तुला विरूने विचारले.हो म्हणून ती निघून गेली.दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भेटले.आता ते नेहमीच भेटू लागले.पण नेहमी तिच रात्रीची वेळ.ती खूप हळवी…साधी भोळी….निरागस वाटायची.खूपदा स्वतःमध्ये गुंग राहायची फारच कमी बोलायची .
तिच्या मनात खूप काही साचलेल आहे…काहीतरी वादळ सुरू आहे याची जाणीव वीरूला होती पण ती कधीच काही सांगायला तयार नसायची.विचारू नंतर असे म्हणत तो शांत राहायचा.साहेब रोज तालुक्याच्या ठिकाणी जातात याची गावात चर्चा सुरू झाली होती.वीरू तिच्या प्रेमात अगदीच वेडा झाला होता.
तो आता लग्नासाठी तिच्या मागे लागला.लग्नाचा विषय निघताच ती शून्यात बघू लागली.आणि चालायला लागली.वीरू मला विसरून जा.आपले लग्न , मी ,सर्व मृगजळ आहे.आपली सोबत फक्त आज…उद्यापासून मी तूला भेटणार नाही.वीरू फक्त बघत होता अचानक झालेला बदल त्याला कळत नव्हता ..
अग पण अचानक काय झाले तूला?मी पुरता तूझ्या प्रेमात वेडा झालो आणि तू मला सोडून जाते म्हणतेस.का अशी वागत आहेस ?सांग ना …वीरू विचारू लागला.वीरु मी तुला जास्त नाही फसवू शकत.तुझे समोर सुंदर आयुष्य आहे.तुला बघितले आणि मनातील सुप्त इच्छा जागृत झाली.मनाला आवर घातला पण मनच ते नाही मानले.
मी खऱ्या प्रेमाची भूकेली होती ते प्रेम मला मिळाले .मला आता काहीच नको मी तूझ्या प्रेमाने तृप्त झाली … माझी खूप मोठी चूक झाली. माफ कर मला.आणि वेगानं ती निघून गेली .वीरू अजूनच अस्वस्थ झाला.
सकाळ झाली.वीरू सकाळीच त्या जागेवर गेला.दुरून दिसणारे ते घर तो शोधू लागला.जंगलामध्ये होते ते घर वीरु आतमध्ये गेला.समोरच भिंतीवर फोटो लावून होता
खाली राधा लिहून होते….राधा…राधा…वीरु ओरडू लागला.आता ती कधीच वापस येणार नाही बाळा…वीरूनी वळून बघितले.एक वृद्ध स्त्री उभी होती.हे घर राधाचेच आहे नं.कुठे आहे ती ?मी राधाची आई…राधा जाऊन दोन वर्षे झाली.आत्महत्या केली होती तिने.
काय ?कसे शक्य आहे.ती तर मला भेटली.वीरू खूप घाबरला होता.दुःखी झाला होता …राधा म्हणजे फक्त भास होता …एक अतृप्त आत्मा ….म्हणजे आपण त्या आत्म्यावर जिवापाड प्रेम केले.आई काय झाले होते.राधाने असे का केले?वीरू ओरडून विचारत होता.
काॕलेज मध्ये राधाचे प्रेम होते.सुजय त्याचे नाव.काॕलेज तालुक्याच्या ठिकाणी होते.दोघेही एकाच बसने सोबत जायचे.सुजय खूप श्रीमंत घरातील होता. लग्नाचा विषय निघाला आम्ही तयार होतो.पण अचानक घरच्या दबावामूळे सुजयने नकार दिला.
राधा अगदी वेडी झाली होती..रोज त्या बसची वाट बघायची. कधी रडायची तर कधी हसायची.आणि एक दिवस त्याच बसखाली जीव दिला.तिचे प्रेम अपूर्ण राहिले.कदाचित ती खऱ्या प्रेमाच्या शोधात असेल आणि त्याच बसमध्ये तू तिला भेटला.प्रेमाच्या सागरात अतृप्त होती ती.
वीरू दुःखाने व्याकुळ झाला.दुसऱ्या दिवशी ते गाव सोडून घरी आला.राधाच्या आठवणी कायम सोबत घेऊन …..
ज्योती रामटेके
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










सुरेख मांडणी
छान कथा
👌छान