स्पर्श सुखाचा- मराठी लघुकथा
सोंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं….
तिनं स्वतःला आरशात पाहिलं,चेहऱ्यावर भरगच्च मुरूम आले होते…टवटवी सारी निघून गेली होती…डोळ्याच्या खाली काळी वलय तयार झाली होती…मन ही उदास होते….एकूणच सारं काही अलबेल नव्हतंच मुळी…वय वाढत चालले होते तिचे…कित्येक चांगली स्थळ सांगून आली होती,पण हिच्या अटी आणि अपेक्षांची यादी संपताच नव्हती…बालपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला मग आता एवढा मोठा निर्णय घेताना आपण मोडता घालायला नको म्हणून आई-बाबा तिच्याच कलाने घेत होते….तिला इंजिनिअर किंवा बँकेतील मुलगा हवा होता ..विनया सुद्धा एम.कॉम.झाली होती…आणि एक छोटी नोकरी करत होती…घराला हातभार म्हणून..
दिसायलाही तशी फार सुंदर नव्हती,अगदीच चार चोघीसरखी…परिस्थिती सुद्धा बेताचीच त्यामुळे पार्लर,शान शौक या गोष्टीपासून पण दूरच होती…रंग सावळा असला तरी नाकी डोळी मात्र ठसठशीत आणि सुडोल बांध्याची होती…आपल्या पेक्षा सरस आपला स्वप्नातला राजकुमार असावा ही तिची माफक अपेक्षा होती….पण नोकरी,घर याबाबत पण ती चिकित्सक होती…या साऱ्यात तिला आता 30 वर्ष पूर्ण झाली….आणि 31 सुरू झाले…आता मात्र आई बाबाची काळजी अधिक वाढली….आणि तिनेही हार मानली.जवळपास 42 ठिकाणांची यादी पाहून झाली होती…कधी मुलांकडून नकार तर तर कधी मुलीकडून…आता मात्र तिला या साऱ्याचा वीट आला होता…आता जे स्थळ येईल त्याच्यासाठी बोहल्यावर चढण्यास ती तयार होती,नव्हे तिने तशी मनाची तयारीच केली होती….कारण हा झालेला चर्चेचा विषय तिला थांबवायचा होता….
आणि एक स्थळ तिला चालून आले ते म्हणजे रघुवीरचे..वय वर्ष 33 ,मध्यम बांध्याचा,रंगाने सावळा च आणि नोकरीही बँकेतच,शिवाय घरी सधन शेतकरी…आणि मुलगा एकटाच….पण ….पण मागच्या वर्षी एक अपघातात त्याचा एक हात पूर्णतः खांद्यापासून गेलेला होता…एवढी एक बाजू सोडली तर माणसं सुद्धा लाखमोलाची होती…
साऱ्या बाजूनी विचार करता आता तडजोड करण्याचा विनया ने शहाणपणा दाखवला होता,तिने मनातून स्वीकारले होते आता…त्याला मजबुरी म्हणावे की तडजोड होती माणुसकी म्हणून हे एक प्रश्नचिन्ह च होते….!
गोष्टी इतक्या पटकन घडत गेल्या की,देवा ब्राम्हणाच्या साक्षीने 50 माणसात घरच्या घरी वैदिक पद्धतीने हे लग्न पार पडले…!
विनया, तशी संस्कारात वाढलेली,म्हणून तिला ना नवीन घरात माणसे लगेच आपलीशी करता आली…..पण एक दुःख शेवटी मनात होतंच…
दोघांकडेही दिसण्यातलं सोंदर्य नव्हतं,पण मनाने ते दोघेही सुंदर होते…लग्नानंतर चे तिचे दिवस खूप सुंदर होते…तिची प्रत्येक हौस मौज अगदी बारकाईने पूर्ण होत होती…एक सकाळीच तो तिच्या जवळ आला,तिने अलगद अंग चोरून घेतलं….आणि मनोमन लाजली…त्याचा हवाहवासा स्पर्श,खूप आत्मविश्वासाचा वाटू लागला…..आणि अवचित तिला कुठूनतरी मोगऱ्याचा सुगंध मनाला स्पर्शून गेला….त्याने एका हातानेच खिशातला तो मोगऱ्याचा गजरा तिच्या अलवार केसात माळला,हे पाहताच तिने त्याला मदत केली….इथेच खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू झाला….ती आनंदली,विसावली त्याच्या कुशीत सारं जग विसरून….हरखून गेली त्याच्या मिठीत…आणि हा सुगंध आपल्या आयुष्यात कायम बहरू दे,असे बोलून गेली…
“तुझं मन खूप मोठ्ठ आहे विनया ..माझ्यासारख्या व्यंग असलेल्या माणसाला तू स्वीकारल्यास…का?केलंस तू हे?”
तिनं सुंदर उत्तर दिलं,”म्हणाली,अपेक्षाच ओझं माझं होतं, त्यात वेळ निघून गेली…पण मला तुमच्यासारखी लाखमोलाची माणसं गमवायची नव्हती…सोंदर्य हे क्षणिक असतं, मी पूर्वी जशी दिसत होते,तशी आज नाही आणि आज आहे तशीच उद्या दिसणार नाही….पण मन मात्र कायम तेच राहील….राहिलं पाहिजे,म्हणून मी होकार दिला….तुझ्यावरचे संस्कार,वागणे,बोलणे,सर्वा%8










सुंदर
Wah
खुप छान कथा
दृष्टी नुसार सृष्टी
👌👌🙏
खुप छान लिहिलंय
Very nice
खूपच मस्त👌
खूपच छान 👌