बसा बे पोट्टेहो.. काढा पुस्तक ..
आज कोन गैरहजर हाये.. गन्या परशा आले काय?
गुरजी आलो मी गन्या… बोबंल्ला..परशा बी आला.
गुरूजी म्या सबन डोक्शातुन काढल.. तुमी मले लय समज देली.. आर्चीच भुतच उतरल मनगुटीवरून. आता लय जिद्दीन अभ्यास करतो गुरूजी .. आजी बी लय खूश हाये..बर बर…परशा
नीलु काल नोती आली तु.. काऊन काय झाल हुत…
गुरूजी .. तीच्या भावाचा साखरपुडा तुटला.
गन्या.. तुले मंदात भादरल्याबीना होतच नाई काय.
बस मुक्याटान.. अन कायरे गन्या तुले सबन बातम्या माईत असत्यात तुले..
गुरूजी नीलुच्या घराकड दोन..तीन चकरा मारते तो.. मले रोज दिसते.. परशा भादरला…
नीलु तुया भावाचा साखरपुडा त लय दनक्यात झाला हुता..करोना असुन बी लय लोक जमले हुते .. पोलीसान दंड केला तो बी भरला..पोरगी त्याच्या पंसदीची..मंग काय झाल बापा.तुया भाऊ लय खूश होता..पोरगी साजरी हाये गोरी..गोमटी.
गुरूजी.. ते पोरगी नीरा… मले पा अन फुल वा अशी हाये.. गोर कातड माया भावाले लयच आवडल..तीचे गुन पाहाचे सोडुन वान पायत बसला.. माया मामाची पोरगी हुती पन आमाशी रंगान कमी उजय हुती ..याले नीरा पांढरीपठ दुधासारखी पायजे हुती..बाबान त्याच्या मनान केल. लगन जुळल तवा सबन चांगल हुत.. दोघाच फोनवर बोलन चालु राये नीरा.. पील्लु.. जानु.. बेबी काय काय चालू राये .. आमी त पिसावुन गेलो हुतो.साखरपुडा कराच्या वक्ताले तीन लय तरास दिला.आजकाल लगनाआंदी फुटो काढाची फॕशन हाये शुटींग बी करत्यात.भावाले घेऊन नीरा जंगलात फिरत जाये बम फुटु काढले.. नवीन कपडे घेतले बापा.. त्या फुटुत एक लाख गमावले.भावाले आंदी लय साजर वाटल सबन..होले हो..लावत जाये..एक दिवस त्या लोकान कहरच केला.. पुन्यात सोताचा फ्लॅट घ्या म्हने. आमी त हपचप झालो. भावाले पगार पायला पंचवीस हजार ..नवीन लागेल हाये तो..अरामान वाढते पगार.. लागुन जास्त दिस नाई झाले त्यात पुन्याची महागाई.. सबन लोक त्या पुन्यात घुसले ज्याले ईचाराल तो पुन्यात रायते… सबन लोकायन लय सांगितलं..पोरीचा बाप म्हने कसा.. दोन एकर वावर विका.. बाबा त लय चिडले हुते..
लगनच तोडतो म्हने बाबा …वावर त्यायचा जीव हाये. आईन दमान घेतल. कसबस बाबाले तयार केल.
बापा… बापा लयच बाजींदे हायेत ते लोक..
बर हे समद झाल्यावर लगन काऊन तोडल व नीलु.
ते बी लय गजबच गोष्ट हाये.. समद झाल हुत
एक दिवस तीचा फोन आला.. भावाले त धडकी भरली हुती..त्यान फोन उच्चला त म्हनते कशी …
जानु.. आपल्याले हनीमुन साठी स्विझरलॕडले जा लागते .. त्याले घाम सुटला..त्यान समजावला तीले.. तेवढे पैसे नाई .अरामान जाऊ.. तो महाबळेश्वरले जायले तयार हुता.
आता आजकाल लगन झाल्यावर कुठसातरी जाच लागते म्हनते.. नाई त समदे हसत्यात म्हनते बापा.. माया भावानच लगन तोडल गुरूजी…
पहा रे पोट्टेहो.. लगन कराच्या येळेला वानापरीस गुन पाहाचे..गुनावर संसार चालते…
बाबा… बाबा आई.. सेलमदी गेली.. तुमच्या खिशातुन हजार रूपये काढले तीन.
बापा रे लय काव आनला तुया मायन.. वर्षातले सहा मईने सेल मंदी रायते ते..
बापा ..त्या दिवशी साड्या घेऊन आली.
गुरूजी आता चपलाचा सेल सुरू हाये.. गन्या पचकला.
कालच नीलु गेली होती…
गन्या तुले आता चपलीन झोडपतो.. गुरूजी कातावले.
ऊद्या या बे पोट्टेहो …
शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा
https://marathi.shabdaparna.
ज्योती रामटेके..










