हवेलीची सुंदर सजावट सुरू होती.चारही बाजूने फुलांचे हार लावले होते .सगळीकडे फुलांचा सुवासिक सुंगध पसरला होता.एखाद्या नवरीसारखी सजली होती हवेली.
सगळीकडे सुंदर रोशनाई केली होती .गावातील लोक हवेलीची रोशनाई बघायला येऊ लागले.कौतुक करायला लागले.
सुंदर छोटस गाव होत ते , पण सर्व सोयी होत्या.
शाळा,काँलेज सर्व होते तिथे .’
गावाच्या बाजूला खळखळ नदी वाहत राहायची
चारही बाजूला सुंदर टेकड्या होत्या .सगळीकडे
निसर्गरम्य वातावरण होते .गाव सुंदर आणि संपन्न होते
गावाच्या ऐका बाजूस हवेली होती .कधीतरी तिथे
भलमोठ कुटुंब राहत होत .आजही गावातील लोक त्यांना जमिनदार म्हणून ओळखायचे.गावात त्यांच्या शब्दाला मान होता .काळाच्या ओघात खुप काही बदल झाला होता.
घरातील बरीचशी लोक कामासाठी बाहेर गावी गेले होते आज हवेलीत विक्रमच्या लग्नाची तयारी सुरू होती.
हवेलीची गावामध्ये शान होती .तिथल्या गोष्टी सहसा बाहेर येत नव्हत्या .लोकांना खूपच उत्सुकता वाटायची तिथल्या गोष्टी ऐकण्यात.
रागिनी,विक्रमची होणारी बायको .सुंदर ..सुशिक्षित
सालस दिसायला खूपच देखणी , शहरात राहणारी.
विक्रमला अशीच मुलगी बायको म्हणून पाहिजे होती
रागीनीला नौकरी करायची होती पण आई बाबांचे सारखे
सुरू राहायचे , आधी लग्नाच बघू , नंतर नोकरीचे बघता येईल
तसे विक्रमकडे काहीच कमी नव्हते.
अशा वेळी तिला तिच्या आत्याची आठवन यायची
तिची सरु आत्या किती छान होती .चांगले शिक्षण होते
पण चांगला मुलगा मिळाला आणि लग्न झाले
लग्नानंतर काही दिवस छान गेले. लग्नाला दोन वर्षे
झाली होती. सरुआत्याच्या नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. सरुआत्याला हे कळल्यानंतर ती किती रडली,विनंती करु लागली . पण काहीच उपयोग झाला नाही. सासरच्यांनीही सरुआत्याला साथ दिली नाही. आत्या माहेरी आली तिकडे नवरा लग्न करून मोकळा झाला होता .
सरु आत्या खूप दुःखी राहायची .तिच्या दुसऱ्या लग्नाचा कधीच कोणी विचार केला नाही
रागिनी आईला नेहमीच विचारायची,
” आई आपल्या सरु आत्याच दुसरे लग्न का नाही केले ग,आपल्या बाजूच्या काकानी तर केले नं”.
आई जवळ काहीच उत्तर नसायचे
” अग बाई दुसरे लग्न करणे बाई जातीला कठीण असते .लोक काय म्हणतील …समाज नाव ठेवेल.”
समाजाच्या भीतीने आत्या निर्णय घेत नाही
आणि मग तिच्याकडे आपोआपच दुर्लक्ष होऊ लागले
राहते आहे नं मग राहु द्या असेच सर्व ठरवून टाकतात.
सरू आत्या शेवटी आश्रमात निघून गेली.
जातांना सरु आत्या किती रडत होती तिचा काहीच दोष नव्हता तरी तिला खूप मोठी शिक्षा मिळाली होती.
खूप प्रश्न मनात राहायचे त्याचे उत्तर कोणालाही देता येत नव्हते .सगळं काही अनुत्तरीत मनामध्ये साचलेले.
रागिनीला सरु आत्याच्या नवऱ्याचा खूप राग यायचा
काय मिळाले त्याला?
विक्रम तसा शिकायला शहरातच होता . चांगला शिकलेला होता .रागिनीचे वडिल विक्रमच्या वडिलांना ओळखायचे.तसा शहरात त्यांचा मोठा बंगला होता
पण विक्रमला हवेलीतच करमायचे.
शेवटी रागिनी लग्नाला तयार झाली.सर्व तिच्या मनाप्रमाणे झाले होते .सरु आत्या आशीर्वाद देऊन निघून गेली होती
हवेली बघून रागिनी आश्चर्यचकित झाली.इतकी सुंदर हवेली तिने प्रथमच बघितली होती .भरपूर लोक राहायचे हवेलीत.हळुहळु सर्वांशी छान मैत्री होईल असे तिला वाटू लागले …या विचारातच ती आत आली.विक्रमचे आई , वडिल कधी हवेलीत तर कधी शहरात राहायची .रागीनीला हवेलीतले वातावरण खूपच बंदिस्त वाटायचे पण तिला तेथील नदी टेकडया खूपच आवडत होत्या रोज संध्याकाळी ती तिथे फिरायला जायची.विक्रमला तिचे रोज घराबाहेर पडणे आवडत नव्हते .विक्रमचा स्वभाव खूपच हेकेखोर होता
अगदीच रागिनीच्या विरूध्द .रागिनीला त्याचा स्वभाव
अजिबात आवडत नव्हता पण हळुहळु होईल बदल अशी आशा होती.
आता हवेलीत छान ओळख झाली होती. तिला नंदाकाकी खूप आवडायची .काकी नेहमी उदास दिसायची.
तिचे मन कुठेतरी हरवून गेले असे वाटायचे , सतत
कोणत्यातरी विचारात असायची .रागिनी विक्रमला विचारायची पण तो उत्तर देन्याचा कंटाळा करायचा
रागीनी काकीला घेऊन नदीकाठी फिरायला जायची.रागिनीला काकीला बोलते करायचे होते .शेवटी तिने काकीला विचारले
काकीचा उदास चेहरा अजूनच उदास झाला .त्या नदीच्या पाण्याकडे ऐकसारख्या बघत होत्या.
रागिनी हे पाणी किती नितळ..सुंदर दिसत आहे न पण हेच पाणी कधी रौद्ररुपधारण करेल सांगता नाही येत तसच आयुष्याच पण आहे
माझा छान सुखी संसार होता .तुझे काका पण स्वभावाने खूप छान होते .कामाच्या निमित्तानं परदेशात जायचे.
ते गेले कि मी वाट बघत बसायची ते कधीतरी घरी येत होते
हळूहळू त्यांच्यात झालेला बदल जाणवायला लागला होता
आणि अचानक ऐका दिवशी त्यांनी दुसरे लग्न केले
मला खूप धक्का बसला होता .मी सारखी रडत होती
असे का केले?याचा जाब विचारत होती.मला कोणीच समजून घेतल नाही .ही हवेली बाहेरून खूपच सुंदर
दिसते ग , पण आतून …तु बघते न
सारी लोक , मुखवटा लावून वावरत असतात.आपण त्यांना कधीच ओळखू शकत नाही.मी तुझ्या कांकाना नाही ओळखू शकली .हवेली सोडून माहेरी जाण्याचा विचार केला.पण इथे येऊन काय करणार ? असा मलाच प्रश्न विचारला गेला.मग काय सारेच संपले.
मग मी कायमची इथेच राहले एकाकी एकटीच.
तुला माहिती आहे मला ही शिक्षा का मिळाली
लग्नानंतर पाच वर्षे झाली होती .अजूनही मूल
होत नाही मग हीच काय करायच? घरातील लोकांनी यांना लग्न करायला भाग पाडल .यांनी पण ते मान्य केले. थोडा ही प्रतिकार केला नाही
तेव्हा मी माझ बंद असलेले तोंड उघडायला हवे होते
दोष माझा नव्हता , पण ते सुद्धा मी सांगू शकले नाही
आता मलाच माझा राग येतो .त्यांना जाब विचारणार कोणीच नव्हत.मी त्यांचे काहीच करू शकत नव्हते
तसाही माझा आवाज हवेलीतच विरणार होता
आता वाटत मीही तसच वागायच होत
शेवटी काय त्यांना मुलच हवे होते ना.रागिनी तू असे काही झाले तर ते सहन करु नको.या हवेलीने नेहमीच
बाईलाच मर्यादा आणि दुःख दिले आहे
या हवेलीतील या गोष्टी बंद करणार कोणीतरी पाहिजे ग.
नाहीतर हे असच चालू राहणार .माझा बदला अजूनही अपुरा आहे.
रागिनी ऐकत होती .खूप काही गोष्टी ओठांवर येत होत्या पण कसे सांगायचे ?
दोघी हवेलीत परत आल्या .विक्रम वेळ झाला म्हणून चिडलेला होता.
दुसऱ्या दिवशी शहरात जायच म्हणून विक्रम निघाला
तेवढयात कोणीतरी त्याला भेटायला आले.त्याच्या कंपनीमध्ये मँनेजर म्हणून कोणीतरी आले होते
विक्रम घाईत होता म्हणून त्याने रागिनीला आवाज दिला
रागिनी बाहेर आली .
अरे रागिनी!
रागिनी बघतच राहली
हा तर अजय
आपल्या काॕलेज मध्ये होता .
तू इथे कसा काय?
रागिनीला आश्चर्य वाटले.आपल्या कंपनीमध्ये मँनेजर म्हणून लागले ते विक्रमने सांगितले
अजय आणि रागिनीची मैत्री होती .बरेच वर्षे
ते सोबत होते .नंतर अजय दुसरीकडे शिकायला गेला होता .आज खूप दिवसांनी ते भेटले होते .खूप वेळ ती दोघे गप्पा करत बसले. अजय किती बदलला होता
खूपच समजदार झाला होता .अजयचे लग्न झाले नव्हते
रागिनी सतत त्याला विचारायची .अजय नेहमीच तो विषय टाळायचा. काँलेज मध्ये त्याला रागिनी आवडायची
पण तो कधी सांगू शकला नाही .आता काय सर्व संपले होते .इतके दिवस तो परदेशात होता , आल्यानंतर रागिनीला सांगू असे त्याने ठरविले होते .पण आल्यावर रागिनीचे लग्न झाले असे कळले खूपच दुःख झाले होते अजयला
आणि आता अचानक पुन्हा रागिनीची भेट झाली
अजयला रागिनी खूश नव्हती वाटत .तिला खूप काही सांगायचं राहायच पण ती मध्येच थांबून जायची .तिच्या मनात काहीतरी वादळ सुरू आहे याची जाणीव अजयला होती .पण कसे विचारु ? ती खरे सांगेल का?
असे त्याला वाटायचे .तिच्या कडे नेहमीच जाऊन बसने त्याला बरे वाटत नव्हते ,
आता रागिनीच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती .
आणि तो दिवस तिच्या आयुष्यात आला.तिच्या पायाखालची जमिन सरकू लागली .
मला दुसरे लग्न करायचे विक्रमने सांगितले …पण यात माझा काय दोष ?
हवेलीत पुन्हा तेच घडत होत जे काकी सोबत घडल होत
पण मी काकी सारखी नाही शांत बसणार. अजून दुसऱ्या मुलीच आयुष्य उध्वस्त नाही होऊ देणार.विक्रमचा बदला मीच घेणार.पण कसा..काय करू मी ? कोणताच मार्ग दिसत नव्हता.
कदाचित काकी मला मार्ग सांगतील .
रागीनी धावतच काकीकडे गेली.रागिनी सारखी रडत होती .विक्रमबद्दल सांगत होती.
काकी मी विक्रमला खूप सांगण्याचा प्रयत्न केला
आपण बाळ दत्तक घेऊ हे पण खूपदा सांगितले .ते डाँक्टरकडे यायला पण तयार नाही झाले .मी संसार
टिकून राहिला पाहिजे म्हणून खूप सहन केले विक्रमचे.
कोणालाच काही कळू दिले नाही आज न उद्या तो बदलेल याची वाट बघत होती .पण शेवटी विक्रमने मलाच बदनाम केले ,
काकीला सांगून झाल्यानंतर अजय तिथे असल्याचे रागिनीच्या लक्षात आले.
तो म्हणाला,
रागिनी मला शंका होतीच तुझा चेहरा सर्व सांगत होता. पण आता असे करुन चालनार नाही .तुलाच मार्ग काढावा लागेल .तू विक्रमसारखी लग्न करुन मोकळी होऊ शकते पण विक्रम कितीजणींचे आयुष्य उध्वस्त करणार ?
तू बदला घे त्याचा. तोही पश्चातापाच्या आगीत जळला पाहिजे
रागिनीचे रडणे सुरू होते .
रागिनी तू कशासाठी सहन केल सर्व ? मला नेहमीच तुला विचाराव असे वाटत होते पण कसे विचारु हेच कळत नव्हते . आपण काँलेज मध्ये होतो तेव्हापासून तू मला आवडायची पण कधी सांगू शकलो नाही .छान नोकरी लागल्यावर तुला सांगू असे ठरविले होते पण तेव्हाच तुझ्या लग्नाचे कळले.खूप दुःख झाले पण काहीच करू शकलो नाही.आताही वेळ गेली नाही तू मुक्त हो या बंधनातून ..आधीसारखी भरभरून जग..फक्त तू एकटीच शिक्षा भोगणार का? ते पण काहीच दोष नसतांना
चल रागिनी नवीन आयुष्य तुझी वाट बघत आहे.
खूप वेळ दोघे बोलत होते.रागीनीला अजयचा खूप आधार वाटायला लागला.
दोघे आता मोकळेपणानं बोलायला लागले होते रागिनी मनातले अजयला सांगत होती. हळूहळू दोघे जवळ येत गेले.विक्रमची लग्नाची बोलणी सुरुच होती पण रागिनी शांत
रागिनीला बरे नाही म्हणून काकीने डाॕक्टरला बोलावले होते .विक्रम घरीच होता . डाॕक्टर हसतच खोलीच्या बाहेर आले.
विक्रम रागिनी आई आणि तुम्ही वडील होणार आहात. हवेलीचा वारस येतो आहे.
विक्रमचा चेहरा पूर्ण पडला. त्याच्या पायाखालची जमीन सरकू लागली.रागिनीकडे बघायची त्याची हिंमत झाली नाही..
नऊ महिने संपले.हवेलीत एकच जल्लोष सुरू झाला
गावातील लोक खूष होते.आणि काकी तर या क्षणाची वाट बघत होती
सत्य विक्रमला माहित होते आणि काकीलाही.
पण तो काहीच करू शकत नव्हता .त्याचा पराभव झाला होता.
रागिनीचा बदला पूर्ण झाला होता.
ज्योती रामटेके








