भाग २२ हरवून गेल्या जाणिवा…
भाग २२ हरवून गेल्या जाणिवा…

भाग २२ हरवून गेल्या जाणिवा…

भाग २२ हरवून गेल्या जाणिवा…
सौ.दर्शना भुरे..
 वैकुसोबत  तिची सासू रत्ना वहिनीच्या भेटीसाठी येणार म्हणून घरात त्यांच्या साठी खास मेजवानीचा बेत ठरत होता.आणि सोबतच नर्मदा आत्या  वैकुंठच्या आवडत्या करंज्या, अनारसे स्वतः च  तिच्यासाठी बनवणार होती.
 पुढे…
  अखेर वैकुंठा माहेरी  आली. बऱ्याच दिवसांनी वैकुला घरी परतलेले पाहून घरातील सर्वजण आनंदले.वैकु तर आल्या आल्या  साऱ्या घरभर  खुशीने फिरत होती.  सर्वांची चौकशी करत होती. शेवंता, आशा वगैरे तिच्या सर्व मैत्रिणीच्या कानावर वैकुंठा आल्याची बातमी गेली.तशा त्याही  तिच्या  भेटीसाठी तिच्या सोबत खेळण्यासाठी लगबगीने धावत आल्या होत्या. घरी
आल्यापासून वैकुंठाचा पाय एका जागेवर टिकत नव्हता.  तिचे नेहमीप्रमाणे  मैत्रीणीना घेऊन  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी  हुंदडणे,  खेळणे  चालू  झाले.
   आज सर्वजणी  रानातून बोरं तोडून आपापल्या ओटीत भरून
 नेहमी प्रमाणे  ओढ्याकाठी वाळूवर बसल्या  होत्या.. बसल्या बसल्या वैकुंठा वाळूचे घर बनवू लागली तिचे पाहून बाकीच्या ही  त्यात गुंतल्या  त्यांची वाळूच्या घरासाठी आपसात चढाओढ लागली होती.
पण शेवंता मात्र  कसल्यातरी विचारात दंग  होती ती या सर्वांपासून अलिप्त होवून  नुसतीच  वाळूवर  वेड्या वाकड्या  रेघोट्या मारत  होती.
 तीला तसच बसलेले पाहून
 आशा आपलं घर दाखवित म्हणाली,
का ग शेवंते… एवढा काय विचार करत आहे.. बघ माझे घर बांधून तयार पण झाले.
तसे ती दचकत  वाळूवरची रेघ पुसत आशाला म्हणाली,
 काही नाही ग आशे माझी ताई उद्याला तिच्या सासरी जाणार आहे  ती  म्हणत होती.
प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावेच लागते..  आणि तेच तिचे घर असते..
 आपल्या सर्वांना एक दिवस सासरी पाठवून दिले तर.. आपण एकमेकांना कस भेटायचे आणि कस खेळायच..
 शेवंता चे बोलणे ऐकून आशा वैकुकडे बघत म्हणाली अग तसे काही नसते आपली वैकुंठा गेली होती न सासरी आली की परत..
 आणि ती पुन्हा गेली तर  हो ना ग वैकु..
 त्या दोघींचे तिच्याविषयीचे  बोलणे ऐकून जवळच पडलेला दगड हाताने  ओढ्यातील पाण्यात दूरवर फेकत  फणकाऱ्याने
   वैकुंठा म्हणाली पण मी नाही जाणार  परत सासरी ..
अग पण वैकु..
 वैकु त्यांचे काही एक न ऐकता सरळ घराकडे यायला निघाली. त्यांच्या बोलण्याचा तिला खूप राग आला होता.  रस्ताभर  तिच्या कानात शेवंता चे बोलणे घुमत होते . घरात येवून ही तिची धुसफूस चालूच होती.
   वैकुंठाच्या वागणुकीवरून नक्कीच तिचे बाहेर मैत्रीणींसोबत  काहीतरी  बिनसलं आहे हे नर्मदा आत्याच्या लक्षात आले पण त्याकडे दुर्लक्ष करून  तिची समजूत काढण्याऐवजी त्या  विमलाच म्हणाल्या,
 विमल तिचे  बाहेर फिरणे बंद करून  जरा तिला घरकामात घाल .. नाही तर उद्या लाडाने वाया गेली तर सासरी तुझाच उध्दार होईल.. विमललाही नणंदेचे म्हणणे पटले व त्यांच्या
 म्हणण्यानुसार
आता ती वैकुला घरातील छोटेमोठे काम सांगत होती. आणि वैकुही ती  सर्व कामे  आवडीने करत होती.
पोरीची जात  भरभर वाढून वयात यायला काही उशीर लागत नाही.
दिवसामागून दिवस  सरत होती.
वैकु  आता हळूहळू वयाने वाढत होती.
 इकडे विनायकही शेतीकामात तरबेज  झाला होता .वसंतरावला जरा आरामाचे दिवस भेटू लागले.मुलाचा बहरलेला संसार त्यांना डोळ्यासमोर दिसू लागला होता .वैकुच्या लग्नाला पाहता पाहता एक वर्ष झाले. .त्यांना वैकुंठाला आणण्याची घाई लागली होती.
 पण  इस्टेटीवरून होणारे‌ भाऊबंदकीतील वाद आता विकोपाला गेले होते. तिन्ही भाऊ त्यांना मिळालेल्या इस्टेटीत खुश होते. पण हरिप्रसाद ला हे सर्व काही पटले नव्हते त्याची आतल्या आत धुसफूस चालू होती .
   कांता प्रसादला पहिल्या बायकोपासून चार आणि दुसऱ्या बायकोपासून  दोन मुले आणि एक मुलगी त्रिशाला अशी एकूण सात अपत्ये झाली होती. पैकी अनंता  हयातीत नसल्या कारणाने त्यांनी त्याला  मृत्यू पत्रातून वगळून
 इस्टेटीचे समान हिस्से करून ठेवले होते.    मृत्यू पत्रातून त्यांनी  सर्व भावंडात त्रिशाला एकटीच मुलगी आहे. तरी तिला सर्व  भावांच्या  बरोबरीने वाटा देण्यात यावा असे लिहिले होते.  पण  आपल्या संसारात समाधानी असलेल्या त्रिशाला ने  तो न घेता  आपल्या धाकट्या भावाला अनंताला दिला. त्याची बहिणी वर अतोनात माया होती. आणि  वसंता ही  आपल्या ला किंवा आपल्या आईला कधीही अंतर देणार नाही हा  विश्वास तिला  होता.
त्रिशालाने  तिला मिळालेल्या इस्टेटची चा संपूर्ण वाटा  वसंतला  दिल्या
 कारणाने वसंताचा  मुलगा विनायक  आता दुहेरी इस्टेटीचा एकुलता एक वारस बनला होता.
हे त्याला सहन होत नव्हते.
 तो वसंता विरुद्ध डाव आखू लागला. सोबत च इतर भावांना भडकावून देवू लागला.  वसंताशी उघड उघड दुष्मनी घेऊन त्याला धमकावू लागला.
नवऱ्याचे असे  वागणे  शारदा ला अजिबात पटत नव्हते ती त्याला आपल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करी पण तो  त्याकडे दुर्लक्ष करून तिला गप्प राहण्यासाठी सांगत असे..
हरिप्रसाद ची मुले
इतर भावांच्या मुलांच्या तुलनेत  उथळ स्वभावाची होती. दिवसेंदिवस ती
    जुआ खेळणे, सट्टा लावणे यात निपुण बनत चालली होती. पण
वडील म्हणून
 त्याचे काही देणे घेणे नव्हते.. तो फक्त दिवसरात्र आपल्या ला वसंताची इस्टेट  कशी हडपता येईल याच विचारात रहात होता.
आणि वेगवेगळे डावपेच आखत होता.
त्याचे हे डावपेच
 वसंतला भावाची सर्व वागणूक लक्षात आली होती पण तरीही तो शांत होता. पण  आतल्या आत त्याचे मन काळजीने पोखरू लागले.  दिवसेंदिवस कसली तरी अनामिक भिती वसंतला सतावत होती. ते हल्ली विनायक ला जास्तच जपू लागले.
 लहानपणापासून  अगदी
  शांत आणि समजूतदार स्वभावाचा असलेला विनायक वडिलांचे सर्व बोलणे ऐकत होता. वयानुसार आता जिम्मेदार ही झाला होता. वडिलांना शेती सांभाळण्यात, शेतीकामात मदत करू लागला.
वसंताने त्याला वळण च तसे लावले होते.
 दसरा सरून  दिवाळी पंधरा दिवसांवर   आली होती.
वैकु विनायक चा लग्नानंतर चा पहिला दिवाळसण म्हणून दोन्हीकडे लगबग चालू होती.
 दिवाळसणासाठी  वैकुंठा सासरी जाणार होती.हिवाळा सुरू झाला.
हिवाळ्यात दिवस लहान असल्यामुळे   लवकर अंधारुन येत असे म्हणून आईने वैकुला संध्याकाळसाठी  लवकरच कंदील साफ करून  तेल भरून ठेवायला सांगितले.
 त्याकाळात आता सारखे ठिकठिकाणी विजेवर चालणारे दिवे त्याकाळात  नव्हते. त्यामुळे बहुतांश गावे  अंधारात असायची..  म्हणून तेव्हा लोक  उजेडासाठी घराघरांतून     तेलावर चालणाऱ्या चिमण्या, कंदील  वापरत होते.वैकुंठाला मैत्रिणींसोबत बाहेर खेळायला जायचं होते म्हणून
आईने सांगितल्याप्रमाणे
    ओसरीत बसून ती घाईघाईने कंदीलाच्या काचा साफ करू लागली.
 तिचे सर्व लक्ष बाहेर होते ती शेवंता, आशा च्या बोलावण्याची  वाट बघत होती . आणि एका आवाजाने
  तिने  हातातील काम तसेच टाकून धूम ठोकली..

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!