भेट क्षणाची
भेट क्षणाची

भेट क्षणाची

.

शर्वरी नुकतीच दहावी चांगल्या मार्कांने पास झाली होती
आणि आता मोठ्या शहरात चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन डॉ. होण्याचे स्वप्न बघत होती ….
दहावीचे वय म्हणजे तसे अल्लडच ..त्यामुळे ती नवीन शहरात कशी काय adjust होणार याची चिंता तिच्या आईवडिलांना पडली होती ….परंतु लेकीच्या भविष्यासाठी त्यांनी तिचे म्हणणे मान्य केले होते ….आणि चांगल्या कॉलेज मध्ये तिची admission घेतली होती…..

अखेर तिचा जाण्याचा दिवस उजाडला …..रात्रीचा प्रवास होता …रात्री निघून सकाळीच शहरात ..पोहोचणार होती ..
शर्वरी आणि तिचे बाबा …गाडीत बसले आणि गाडी सुरु झाली …
खिडकी जवळची जागा असल्याने पटकन झोप पण लागली …आणि थोड्या वेळाने खूप थंडीमुळे जाग आली ..स्वेटर घेण्यासाठी शर्वरी बाबांच्या जागेवर बसली आणि बाबा ..शर्वरीच्या ….

स्वेटर घालून शर्वरी आता आजूबाजूचे निरीक्षण करू लागली ….

शेजारच्याच सीट वर एक मुलगा होता …तिच्या पेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा असेल …खुपच हँडसम होता …कदाचित मुस्लिम असावा …वडिलांना अब्बाजान म्हणत होता …एकदोनदा तिची अन् त्याची नजरानजर पण झाली ..अन् नंतर मग तिला उगाच चाळाच लागला जसा त्याचा कडे बघायचा …हे आपल्याला असे काय होते आहे …काही कळतच नाही ..सारखे त्याच्याकडे का बघावेसे वाटते आपल्याला … ?आणि ..आतून खूप छान पण वाटतंय कि … त्या विचारात . तिच्या.हातातली चावी पडली …आणि दुसऱ्याच क्षणाला …त्याने ती पटकन वाकून तिच्या हातात दिली …क्षणाचीच ओळख पण तो स्पर्श तिला खूप सुखावून गेला ..

थोड्या वेळाने कुठलेसे स्टेशन आले ..आणि बाबा चहा प्यायला खाली उतरले …येताना बाबा शर्वरी साठी सुद्धा चहा घेऊन येत होते ..तोच गाडी ..सुरू झाली …अन् शर्वरी घाबरली ..बाबांनी पटकन चहाचा कप खिडकीतून देण्याचा प्रयत्न केला ..पण तिला तो घेताच येईना ..तेवढ्यात तो उठला अन्.त्याने तो कप पटकन घेऊन तिला दिला …शर्वरी मनोमन सुखावली …अन् काही बोलणार तोच बाबा जागेवर येउन बसले …
चहा तिच्या घशाखाली उतरेना …
आयुष्यात पहिल्यांदाच असे होत होते …पण त्याला कसे घे म्हणणार…!!! आपण असे कसे भावनिक होतो आहे काही तासापूर्वीच तर आपण भेटलो …पण अशी कसे आपण त्याच्यात गुंतत जातो आहे …अजुन तर आपल्याला त्याचे नावही माहिती नाही …विचारावे का ….त्यालाही तसेच वाटत असेल का …नाही तर पटकन ऊठून त्याने चहाचा कप का घेतला असता….?अशा असंख्य प्रश्नांची मालिका मनात सुरू असतानाच ..सकाळ झाली अन् ..तिचे उतरण्याचे ठिकाण आले ..बाबा सामान काढण्याची घाई करु लागले …या ही वेळेस त्याने पटकन ऊठून बाबांना सामान उतरून देण्यास मदत केली …आणि …आणि …तो निरोपाचा क्षण आला ….पुरती ओळखही नाही …नावही माहीत नाही …तरी डोळे हे आसवांनी भरून आले होते …बाबा रिक्षा थांबवायला वळले आणि ……पटकन..त्याच क्षणी त्याने तिचे डोळे पुसले …अन दुसऱ्याच क्षणात गाडीत चढून ..गाडी सूटली पण ….
म्हणजे हे फक्त एकतर्फी नव्हते तर ….
निरोपासाठी ..हलवलेला त्याचा हात बघतानाच ..परत एकदा तिचे डोळे आसवांनी भरून गेले

एका रात्रीच्या प्रवासातली ..ओळख ती काय ? मन गुंतत असतानाच ..निरोपाची ..वेळ येणे ..सगळेच न् समजण्यापलीकडचे ….
काही …सुरू होण्यापूर्वीच ….निरोपाची वेळ येणे ….
ह्यालाच जीवन ..ऐसें नाव

वैशाली जोशी ..खोडवे

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!