रिपोर्ट- घालमेल जीवाची-मराठी लघुकथा
रिपोर्ट- घालमेल जीवाची-मराठी लघुकथा

रिपोर्ट- घालमेल जीवाची-मराठी लघुकथा

सकाळपासून  शर्मिष्ठा अंगणात अस्वस्थपणे येरझाऱ्या
मारत होती. एवढ्यात जरा तब्येतीची कुरबूर सुरु झाली होती. पन्नाशी उलटली होतीच. मागच्या आठवड्यात आंघोळ करतांना पायाला एक गाठ असल्यासारखे जाणवले. छातीत धस्स होण्यासाठी हे कारण पुरेसे होते.
अभिला न सांगताच डाॕक्टरकडे जाऊन आली.
डाॕक्टरने मनातील शंका दूर करण्यासाठी काही टेस्ट करायला सांगितल्या. टेस्ट करावी कि करु नये या द्वंद्वात अडकलेल्या शर्मिष्टाला जवळच्या डाॕक्टरने मनातील शंका दूर करण्यासाठी काही टेस्ट करायला सांगितल्या. टेस्ट करावी कि करु नये या द्वंद्वात अडकलेल्या शर्मिष्टाला जवळच्या सगळ्यांनी टेस्ट लवकरात लवकर करण्याचा सल्ला दिला.  टेस्ट करुन आल्यापासून तिचे कुठेच लक्ष लागत नव्हते…मनात सारखे नाही नाही ते विचार येत होते.
मला वाटणारी भीती खरी ठरली तर….हा विचार काळजाचा ठोका चुकवत होता…..नाही..असे नाही होणार…देव एवढा निष्ठूर नाही वागू शकत..मी पण ना काहीही विचार करते.
आणि  रिपोर्टमध्ये  काही निघाले तरी काय हरकत आहे
आज सगळेच आजार  उपचाराने ठीक  होतात.विज्ञान किती पुढे गेले.मी उगाच घाबरत आहे.अभिलाही टेन्शन आलयं माझ्यामुळे. मला दाखवत नाही आहे पण आतल्याआत तोही घाबरला आहे. असे म्हणत   स्वतःची समजूत घालत होती   पण क्षणभरच….
दुसऱ्याच क्षणाला परत तीच भीती  मनात पिंगा घालत होती……खरेच मला वाटते तसे असेल तर……घामाने ओलीचिंब झाली ती…..चालण्याचा वेग आपसुकच वाढला…ही तिची जुनीच सवय     टेन्शन आले कि भराभर चालत राहायचे.
चालता चालता स्वतःचीच समजूत  काढत होती…नाही होणार तसे….तब्येतीचे सगळे नियम किती काटेकोर पाळते मी.रोज योगा,खाणे ,आरोग्यदायी,पुरेशी विश्रांती….मला ..नाही..होणार तसले काही….पण मग डाॕक्टरने तपासणी करायला का सांगितले असेल?
आणि माझी मैत्रीण ऊषा ती तर किती जपायची स्वतःला पण तरीही…..जाऊ दे…शुभ शुभ विचार करावेत.
आई ….ए …आई..देवच्या आवाजाने विचारांची तंद्री भंगली…
अभि– आई  अग किती टेन्शन घेतेस? काही नाही झाले तुला…मी आता आॕफिसमध्ये जाता जाता लॕब मधून तुझा रिपोर्ट  घेतो…..फोन करतो तुला लगेच…..एवढे बोलून अभि गेला सुद्धा….तो पुढे  गेल्यावर शर्मिष्ठाच्या  आज त्याला डब्बा दिला नाही हे लक्षात आले…..
बस्…आता थोडाच वेळ….कळेलच आता….देवा…तुझाच आसरा आता….मला नाही जायचे रे आताच…माझ्या अभिचे लग्न व्हायचेयं अजून.. त्याचे बाबा गेल्यावर एकटीने वाढविले मी.
चालण्याचा वेग वाढवत आधीचे दिवस आठवायला लागली.
तो एकटा पडेल रे.
तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय.
त्याचे बाबाही मीच आणि आईही मीच. त्याचे बाबा गेल्यानंतर दोघांचेच छोटे विश्व बनवले आम्ही.
त्याला मी आणि  मला तो.
आईवर घरची सगळी जबाबदारी आहे म्हणून तोही लहान वयातच समजदार बनला.
आणि  माझे म्हातारे आईवडील ह्या वयात ते कसे सहन करतील दुःख ….विचार करता करता  ….तिच्या  डोळ्यातून आसवे बाहेर पडायला लागली….देवा वाचव मला.
मला माझ्यासाठीही जगायचे आहे रे.आता आता जरा कुठे  आयुष्यात निवांतपणा आला. आणि  आता लगेच मी सगळे सोडून जायचे. आता कुठे माझे जगणे सुरु झाले.
थकलेली शर्मिष्ठा घराच्या पायरीवर बसली…अभिचा फोन येईलच एवढ्यात…..तिच्या  हृदयाची स्पंदन वाढायला लागली.
काय असेल रिपोर्टमध्ये?
सगळे ठीक असेल ना.
कि संपणार सगळे.
तेवढ्यात फाटकात गाडी ठेऊन अभि येतांना दिसला….बापरे….अभि धावत येतोयं …नक्कीच  काहीतरी गडबड असणार रिपोर्टमध्ये…देवा असे का केले रे.
अभि लांबूनच ओरडला
आई अग हा बघ तुझा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
काय…अभि खरचं?
थोड्यावेळापूर्वी तिला जगण्यामरणाची वाटणारी भीती एका निमिषात कुठल्याकुठे पळाली.

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!