१८-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
१८-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

१८-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

१८-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

Written by-ज्योती रामटेके

आई लवकरच घराबाहेर पडली. आधी रेखाच्या घरी गेली. काकु चंदना कुठे आहे रेखाने विचारले.

ती आंधळी झाली आहे पियूषच्या दिखावटी प्रेमात. तिला त्याचे वागणे कसे लक्षात येत नाही हेच कळत नाही.या काळात असे साधे वागणे योग्य आहे का? दिसत असूनही डोळेझाक करत आहे चंदना. आम्हाला दुःख होईल म्हणून काही सांगत नाही. आम्ही कसेतरी सावरुन घेऊ पण तिचे बाबा नाही सावरणार. त्यांना बरे नसते. चंदना डोळ्यासमोर राहील. नेहमी भेटता येईल असे त्यांना वाटले म्हणून तो निर्णय घेतला त्यांनी.रेखा तू म्हणते तसे काही असेल तर..

काकु तुम्ही काळजी करु नका. अशी नाती अळवावरचे पाणी.
तकलादू असते दिखावटी प्रेम. गरज संपली कि झाले. बघा तुम्ही,असे काही असले तरी पियूष त्यातून बाहेर येणार. आपल्या चंदनाच्या निस्वार्थी प्रेमाची किंमत कळेल त्यांना.
दोघी राधाकडे गेल्या. दारात पियूषची गाडी होती. आईने दार ठोठावले.दोघे जेवण करत होते.

या आई, राधाने आवाज दिला. पियूष मजेत जेवण करत होता. जेवण हाॅटेलमधले दिसत आहे रेखाने विचारले. राधा जरा बावरली.
हो,आज मुले खेड्यावर गेली. मग मला आला स्वयंपाकाचा कंटाळा. मग भाऊजी बाहेरचे जेवण घेऊन आले. आईच्या डोळ्यात पाणी आले. चंदना तिकडे पियूषच्या आवडीची भाजी बनवत असणार. नात्याच्या आड दोघे किती निर्दयी वागत होते.चंदनाची फसवणूक सुरु झाली होती. आधीचा पियूष किती बदलला होता. दाराच्या आड पियूषचे कपडे अडकून होते. आईला धस् झाले.

काकु, पियूषला काय कमी आहे? सोन्यासारखा संसार. गोड मुले. भरपूर शेती. चंदना सारखी समजदार बायको.
देवाने किती भरभरून दिले त्याला पण तो मुर्खासारखा मृगजळाच्या मागे धावत आहे.बघा तुम्ही तो नक्की वापस येणार.

रेखा, हा आपला फक्त संशय असेल का? राधाला पण
चंदनाचे मन कळत नसेल का? तिच्या वेदनेचा हुंकार तिला जाणवत नसेल का? घरी मुले, चंदना वाट बघत असतात आणि पियूष मात्र राधाकडे निवांत असतो. आजकाल शेतावर जातो कि नाही माहीत नाही. नुसत्या संशयावरून घराची राखरांगोळी करून घेतात किती बाया.चंदना मात्र शांतपणे बघत आहे सर्व. तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. आजकाल यांना बरे नसते. त्यामुळे ते घरात असतात.
चंदना कडे जाणे कमी झाले आहे.या ठिकाणी अपर्णा असती तर तिने राधा,पियूषला सरळ केले असते.

काकु पियूषचा मुलीमध्ये जीव आहे. लवकरच बाहेर पडतील ते.मी लक्ष ठेवून राहते. जशी वेळ येईल तसे करु. मी आहे मदतीसाठी. त्यांच्या आईला सांगा.भावांना कळवा. लवकरात लवकर हे प्रकरण मिटायला हवे. आई चंदना कडे निघाली. मनात दुःख साचून होते. चंदनाच्या गळ्यात पडून खूप रडावे, तिला सावध करावे असे तिला वाटत होते.
घराचे बाहेर भाजीचा सुगंध आला. पियूषच्या आवडीची शेवभाजी करत असेल चंदना. आई आत गेली.
आता जेवणच करुन जा आई,चंदना मागे लागली. पियूष शेतावर गेले का? आईचे डोळे पाणावले. आई आज शेवभाजी बनवून ठेवली पियूषला खूप आवडते. फोन लावते त्यांना.

आई.. फोन नाही लागत आहे पियूषचा. कधी शेताकडे रेंज नसते. बरेचदा होते असे.आजकाल तर जास्त होत आहे.
चंदना चल आपण जेवण करु मला घरी जायचे आहे. बाबा वाट बघत असतील. तू कर जेवण मी थोडा वेळ बघते वाट. आईला कळत नव्हते कोणत्या शब्दात चंदनाला सांगू. मी सांगितल्या वर नाही जेवली तर…
आईने जेवण्याचा आग्रह केला पण चंदना पियूष ची वाट बघत होती. सुमनताई सोबत बोलू का? आई आत गेली.
सुमनताई तयारीत होत्या. आज बचत गटाची भरपूर कामे आहेत हे त्यांनी आधीच सांगितले मला महत्वाचे बोलायचे आहे तुमच्यासोबत विमलताईने राधाचा विषय काढला.

सुमनताईला नेहमीप्रमाणे काहीच फरक पडला नाही. पियूष फक्त मदत करायला जातो असे त्या ठासून सांगत होत्या.
बिचारी राधा खेड्यातून आली आहे. तिला जास्त कळत नाही. मुले लहान आहेत.तुमची विचार करण्याची पातळी खूप खालच्या दर्जाची आहे विमलताई. पियूष सर्वांनाच मदत करतो.
हे सर्व ठीक आहे तुमचे पण घरी न सांगता, खोटे बोलून जायची काय गरज आहे.चंदना वाट बघत असते. आज पण ते खोटे बोलून गेले. राधा कडे आहेत पियूष. मी आताच बघून आले.असे लपून.. छपून जाणे योग्य आहे का?
मला नसेल कळत त्यांचे नाते काय आहे तर, पण आई म्हणून लक्ष द्या जरा.अती विश्वास घातक ठरतो कधी..कधी.कोणत्याही नात्यात बायकोला विश्वासात घेतले जाते. काय कमी आहे चंदनात.वेड्यासारखे प्रेम करते ती पियूषवर. माहेरी आली तरी रात्रभर थांबते. घरच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडते. संसारात आणखी काय हवे असते? वादळापूर्वीची शांतता आहे ही….
वादळ कधी घराचा नाश करेल हे ते आल्यावरच कळते.
वयाच्या या टप्प्यावर खूप काही ‌ गोष्टी पहिल्या नजरेत कळतात.चंदना भोळी आहे. जगाचा अनुभव नाही तिला.
तिचा चेहरा बघा एकदा वेळ काढून. कसा उदास.. भांबावून गेलेला दिसतो.

चंदनाचे सासरे आत होते. ते बाहेर आले. विमलताई तुमचे खरे आहे. घरातील वातावरणाला मरगळ आली आहे. पियूष चे वागणे विचित्र वाटत आहे. सुमन कमी
घरी असते तिला या गोष्टी कधी कळल्याच नाही. कुणाच्या वेदना.. दुःख या गोष्टी कळतच नाही तिला. संसारात इतके अलिप्त राहणे तिलाच जमते. मला चंदनाच्या भावना कळत आहेत. पण ही तर स्री आहे. सुमन फक्त नावाला या घरात आहे. चंदनाने घराला घरपण दिले. मी आयुष्यभर चंदनासोबत राहील. माझी मुलगी आहे ती. तुम्ही काळजी करु नका. होईल सर्व ठीक. आज पियूष आला कि बघतो.

क्रमशः

पुढील भाग खालील लिंकवर वाचा.

https://marathi.shabdaparna.in/१९-सुन्या-सुन्या

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!