१९-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या  Written by-ज्योती रामटेके
१९-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या Written by-ज्योती रामटेके

१९-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या Written by-ज्योती रामटेके

१९-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या Written by-ज्योती रामटेके

पियूष आरामात घरी आला. खूप रागात दिसत होता.
आल्यावर त्याने रौद्ररूप धारण केले. शेती माझ्या नावावर करुन द्या म्हणून बाबासोबत भांडू लागला. चंदना बाहेर आली. बाबांना हा धक्का अनपेक्षित होता. त्यांना तर काय बोलावे सुचत नव्हते. अरे पियूष तू नशा करून आलास का? काय बोलत आहेस कळते का तुला? बाबा तुम्हाला माहीत आहे मी दारू पित नाही. मी पुर्ण शुद्धीत आहो. मी मेहनत करतो शेतावर.राबराब राबतो शेतात.
ऊनपाऊस कशाची पर्वा नाही करत.मला बाकी काही नको. फक्त शेती नावावर करुन द्या.

पियूष काय झाले तुला? शेती तुलाच देणार आहे मी पण मी गेल्यावर,तसे मृत्यूपत्र बनवून ठेवले आहे . आत जा चंदना केव्हाची वाट बघत आहे.तू कुठे होता हे कळले आम्हाला. सध्या आराम कर. निवांत बोलायचे आहे तुझ्यासोबत. आणि हो, शेती नावावर करण्याचे भूत डोक्यातून काढून टाक. तुला नाही पण चंदनाची, मुलांची काळजी आहे मला.जरा जबाबदारीने वागायला शिक. उद्या तुझ्या मोठ्या भावंडांना बोलावून चर्चा करु. त्यांचे संसार बघ जरा. नमु काॅलेजमधून आली. चंदना कडे बघून तिला सर्व कळले. माझी शंका खरी ठरली तर. त्या दिवशी दादाच्या गाडीवर बसलेली राधा होती. अंधारात मला ओळखता नाही आली. राधा स्वार्थी आहे. तिला दादाचा सुखी संसार दिसत होता तरीही ती दादाला फसवत आहे. तो साधा आहे. तिच्याबद्दल वाटणारी सहानुभूती दादाच्या संसाराचे वाटोळे करेल असे वाटले नव्हते.

सुरुवातीला नाही लक्षात येत अशी नाती पण वेळ गेली नाही. लवकरात लवकर हे त्याचे नाते संपायला हवे.
सदैव चंदनाच्या प्रेमात वेडा दादा कसा काय राधाच्या प्रेमात गुंतला कळत नाही आहे. बाबा तुम्ही शेती चंदना वहिनीच्या नावाने करा. दादा वेड्यासारखा वागत आहे. मला तर वहिनीची खूप काळजी वाटत आहे. समोर मुलांचे शिक्षण आहे. गार्गी अभ्यासात हुशार आहे. तिला डाॅक्टर बनायचे आहे.तिच्या शिक्षणाची सोय करायला हवी.राधाने दादाला पैशासाठी जवळ केले आहे. तिची मुले मोठी आहेत ते सर्व सांभाळून घेतात. दोघांनी मिळून फसवले आहे वहिनीला.

चंदना रडत होती. नमु मला तर हे सर्व खोटे वाटत आहे. राधा तर परकी आहे मला पण पियूष तर सर्वस्व आहे माझे. मला कधी या दोघांच्या वागण्याचा जराही त्रास नाही वाटला.वहिनी म्हणजे एक सखी, मनातले सांगायला हक्काचे ठिकाण. कधी काही चुकले तर रागावणारी जवळची व्यक्ती हेच मी समजत होती.राधा तर दुरची वहिनी
कधीतरी भेट होत होती. पियूषच्या निष्पाप स्वभावामुळे कधी असला विचार डोक्यात आला नाही. सदैव माझ्या आणि मुलांमध्ये गुंतलेला पियूष मला इतक्या वेदना देईल
असे स्वप्नातही वाटले नाही. काय चुकले माझे? स्वतःला घरात गुरफटून घेतले. सतत फक्त घराचा विचार केला.सर्व गोष्टी निभावून नेल्या. माझ्या अपेक्षा, इच्छा मला कधी कळल्याच नाही.

समर्पणात सुख शोधताना मलाच मी हरवून बसली. आईच्या लक्षात आले होते पण मी तिलाच खोटे ठरवले.
संसारात संशयाला जागा नसावी असे म्हणतात. माझ्या संसारात संशय कधी आलाच नाही. मी सुरवातीलाच यांच्या नात्यात संशय शोधला असता तर… कदाचित ही वेळ आली नसती माझ्यावर.पियूष समजदार आहे. झाली असेल चुक नकळत. तो सोडेल राधाला लवकरच. तिचे स्वार्थी प्रेम कळेल त्याला. मला सोडून नाही राहू शकणार पियूष. गार्गी शाळेतून आली. बाबा, तुम्ही कोणत्या गावाला गेले होते? सांगून जात जा. आम्हाला काळजी वाटते. तुमचा फोन देखील लागत नाही. थोडा वेळ थांबून पियूष घरातून बाहेर पडला. हळूहळू तो निर्भयपणे वावरायला लागला.जेव्हा वाटेल तेव्हा घरी येत असे. सर्वांनी खूप समजावले पण तो पुरता वेडा झाला होता राधाच्या प्रेमात.

आता तो फक्त जेवायला येत होता. नमु नेहमी म्हणायची वहिनी याचा स्वयंपाक करु नका. तो त्याचे बघून घेईल.
चंदना दुःखाने पोळून निघत होती. आतल्या आत तिचे मन शरीर कमकुवत झाले होते. सारखे डाॅक्टरकडे जावे लागायचे.कमी वयात बी..पी झाले. पियूष ..राधाला धाक राहिला नव्हता. पियूषच्या रुपात तिला एक चांगला पैसेवाला मुर्ख व्यक्ती मिळाला होता.तो सर्व पैसा राधावर तिच्या मुलांवर खर्च करत होता. आमचे तसे काही नाही हे आताही ते सांगत होते. अपर्णाने पियूषला सोडून दे म्हणून विनवणी केली. माझ्या सोबत दुबईला चल नविन आयुष्य सुरु कर म्हणून सांगितले पण चंदना आताही त्याच्या प्रतीक्षेत होती. आई चंदनाकडे बघून दुःखी व्हायची. बाबा बेडवर झोपून राहायचे.त्यांना चालता येत नव्हते. त्यांना काही कळत नव्हते.

सुमनताई नेहमीसारख्या शांत होत्या. घरी कमी राहत असल्यामुळे त्यांना जास्त काही माहीत नसायचे. नमु नेहमीच चंदनाच्या आधाराला असायची. मन रमायला चंदनाने जेवण बनवून देण्याचे काम हाती घेतले. आवड होतीच तिला स्वयंपाकाची आणि पैशाची गरज पण होतीच. तिच्या लाघवी स्वभावामुळे बरेच लोक वाढली. तिच्या हाताला रुचकर चव होती. पोळ्या तर प्रसिद्ध होत्याच.
मुले छान शिकत होती. चंदनाची प्रगती सुरू झाली.
मेहनत तर प्रचंड होती. रीनाचे प्रोत्साहन होतेच. बहिणीसारखी पाठीशी राहायची ती. सासरे थकले आता. म्हातारपणा पेक्षा पियूषच्या वागण्याने थकले होते ते. आंनदी.. सुखी घराला राधाची नजर लागली होती.
समजावून तरी किती सांगणार. सांगून.. सांगून थकले होते.

चंदना आताही त्याची वेड्यासारखी वाट बघायची. त्याच्या आवडीचे जेवण बनवायची. पियूष लवकरच घरी वापस येणार असा विश्वास वाटायचा तिला. मुले तिला रागवायची.
बाबाच्या जेवणाचे राधा बघेल. तू त्यांना जेवण नाही द्यायचे म्हणून सांगितले पण ती ऐकायला तयार नव्हती.
गार्गी बारावी झाली. मेडीकलला नंबर लागला. चंदनाचा आंनद गगणात मावेना. आता पियूष असता तर माझ्यासोबत या कल्पनेने रडायला लागली ती. गार्गी आणि ती किती तरी वेळ रडत होत्या. गार्गीला आईचे दुःख रोज दिसायचे. ते बघतच ती मोठी झाली. आईला तिचा आधार होता.

क्रमशः

पुढील  भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/२०-सुन्या

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!