२-उलटे पडले फासे
२-उलटे पडले फासे

२-उलटे पडले फासे

२-उलटे पडले फासे
विनयचा पोलीसस्टेशनमध्ये फोटो बघून राहूल संभ्रमात पडला.त्याने मनिषला बोलावले.मनिष,राहूल आणि विनय तिघेही मित्र.सोबत शिकले.हूशार असलेल्या विनयच्या आयुष्यात काही विपरीत घटना घडतात…..
भाग-२
मनिष जास्त वाट बघावी लागली का रे?
अरे नाही यार. 
आताच आलो आणि दोन चहा पण सांगितले.
लंचटाईम संपायच्या आत कोर्टात पोहचावे लागेल मला.
दोन केसेस आहेत.कधीही नंबर येऊ शकतो.
असे काय झाले असेल विनयच्या आयुष्यात ज्याने तो इथवर पोहचला?
आणि खरेच त्याने हा भयंकर गुन्हा केला असेल तर पुढे काय?
राहूलला विचारात गढलेला पाहून मनिष  बोलला
राहूल अरे होईल सर्व  ठीक.काहीतरी मार्ग  निघेलच.
नाही रे,गुन्हा भयंकर आहे त्याचा.
खून केल्याचा आरोप आहे.
राहूलला अचानक काहीतरी आठवले.
मनिष तुझ्या जवळ राहूलची डायरी होती.आठवते का?
हो रे तिला कसा विसरेन मी?
तिच्यामुळे तर इथवर पोहचलो आपण.
जपून ठेवलाय मी तो ठेवा. विनयने ती डायरी लिहिली नसती तर  आपण आता जिथे आहोत तिथे नसतो.
ज्याच्यामुळे आपले जीवन  बदलले,आपण वाल्याचे वाल्मिकी झालो त्याचे असे का व्हावे?
राहूल उद्या जाऊ शकतो का त्याला भेटायला?
हो.असे म्हणत राहूल उठला.दोघेही आपापल्या कामावर गेले.
संध्याकाळी मनिष घरी आला पण मन थाऱ्यावर नव्हते.
डोक्यात विनयचाच विचार होता.
होस्टेलचा विनय आठवत होता.
मनिषने एवढी वर्ष  जपून ठेवलेली डायरी बाहेर काढली.आणि  एकेक पान उलगडू लागला. आधी विनयची डायरी  तो नेहमी वाचायचा. आणि  विनयने जे लिहिले त्यापुढे त्याला वाटले तर कंसात काहीतरी लिहून ठेवायचा.विनयसोबत त्याच्याही मनातील काही गोष्टी डायरीत जमा झाल्या होत्या. डायरी आता एकट्या विनयची नव्हती.
हातातील डायरीकडे त्याने बघितले.
आणि  एकेक पान उलगडू लागला.
पहिल्याच पानावर होते
Honesty is a great virtue….
(मनिष-हे लिहिलेले शब्द तंतोतंत पाळणारा विनय चोर आणि खुनी कसा काय बनू शकतो? राहूलची फाईल वाचण्यात काही चूक तर नसेल झाली. पण राहूलकडून अशी चूक होणे अशक्य वाटते.)
मनिषने डायरीचे पान पलटवले.
दिनांक
आज होस्टेलवरचा पहिला दिवस.
घरी आई बाबांना सोडून मला यायचेच नव्हते इथे एकट्याने.पण चांगल्या शाळेत नंबर लागला म्हणून मला जबरदस्तीने पाठवले.आई तर किती रडत होती मला निरोप देतांना. आणि आजी, तिचेही डोळे पाणावले होते.नेहमी माझ्याशी भांडणारी  विणा  पण किती नाराज होती मी येतांना.
मी येतांना बाबांना म्हणालोही,बाबा मी इथेच शिकतो.
 बाबा बोलले खूप मोठे बनायचे तर तुला चांगल्या शाळेत जावे लागेल.
पण माझे  मन नाही लागत आहे इथे.
आज मी रुमवर एकटाच आहो.माझे दोन्ही पार्टनर उद्या येणार.( काही अक्षरे विनयच्या अश्रुंनी मिटले होते.)
आज मी रुमवर एकटाच आहो.माझे दोन्ही पार्टनर उद्या येणार.( काही अक्षरे विनयच्या अश्रुंनी मिटले होते.)
मनिष पाने पलटवत गेला….
दिनांक
आज दोन्ही पार्टनर आलेत.
आज जेमतेम तोंडओळख झाली.बघू या कितपत जमते.
एक  राहूल आणि दुसरा मनिष
तिघे तीन ठिकांणावरुन आलो.
दिनांक
दोनच दिवस झाले येऊन.काहीही आवडले नाही इथले.
राहूल आणि मनिष मात्र बरे वाटत आहेत. ह्या शाळेत आले म्हणजे हूशार असतीलच.
पण दोन दिवसातच ते रुळले इथे. त्यांना घरची आठवण येत नसेल का?
(मनिष–हुशार होतोच रे आम्ही.पण वय आणि होस्टेलवर मिळालेली मोकळीक यात वाहवत गेलो. मला घरी  जावेसे नव्हते वाटत.वडील आणि बहिणीची आठवण घरी रमूच देत नव्हती. आणि  आईचा दुःखी चेहरा बघितला कि ह्दय पिळवटून जायचे.इच्छाच व्हायची नाही घरी जायची.)
क्रमशः
याआधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
प्रिय वाचक,मनिष,राहूल आणि विनयची ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे?
comments मध्ये नक्की कळवा.
पुढील भागाची लिंक
तुम्हालाही लिखाणाची आवड असेल तर अवश्य संपर्क साधा.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी
shabdaparna facebookpage follow करा.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!