अतृप्त आत्मा -भूतकथा मराठी
अतृप्त आत्मा -भूतकथा मराठी

अतृप्त आत्मा -भूतकथा मराठी

अतृप्त आत्मा -भूतकथा मराठी

ज्योती रामटेके
शहापुर छोटस गाव…निसर्गाच्या  कुशीत वसलेले.लोकसंख्या  कमीच.सगळीकडे  हिरवेकंच झाडे
धनधान्यांनी गच्च  भरलेली  घरे.कुणी  खूपच  श्रीमंत  तर कुणी  खूपच  गरीब…पण सर्व  आंनदी आणि  खूष.   सणवार दणक्यात होत होते.गावातले  लोक मिळूनमिसळून  राहत होते .
गावात सदाभाऊचे मोठ प्रस्थ होते.गावात शब्दाला मान होता.खूप मोठा  वाडा.घरात नोकर चाकर..भरपूर  शेती
मुले  शहरात  नोकरी  करायचे.दोघांची  लग्ने झाली होती.
सणवार असले कि मुले घरी येत होती.लहान  मुलगा  मोहन  त्याचे नवीनच  लग्न  झाले होते.मुलगी शहरातील  होती.
सदाभाऊच्या मनाविरूध्द लग्न  झाले होते.त्यांना खेड्यात  राहणारी  सून हवी होती.पण  मोहन शहरातील  मुलगी  घेऊन  आला.सदाभाऊ नाराज  होते.
दिवाळी  आली तशी सोनाली आपण  दिवाळी  शहापुरलाच करायची  अशी जिद्द  तिने  केली  होती.तिने  खेडेगाव कधीच बघितले  नव्हते त्यामुळे  तिला  खूपच  कुतूहल  वाटत  होते.शेवटी मोहन तयार  झाला.दोघेही  शहापुरला आले.तिला शहरापासून दूर
मोकळ्या  वातावरणात    करमत होते.गायी वासरे..म्हशीचे दूध  काढणे तिला  खूप  आवडायचे.तिचा  गोड स्वभाव सदाभाऊंना आवडला.त्यांची  नाराजी  दूर  झाली होती.एक  दिवस शेतात जेवायला जाण्याचे  ठरले.
हिरवेगार शेत..आंब्याचे झाडे सोनालीला खूप  आवडले. संध्याकाळ  झाली तसे सर्व  घरी आले.रात्री  सोनाली खूपच  अस्वस्थ  वाटत होती.खोलीत  येरझारा मारत होती.मोहन  काय झाले म्हणून  विचारायचा पण  सोनाली बोलायला तयार नव्हती .मोहन झोपी  गेला
सकाळीच वाड्यात  एकच  गोंधळ  झाला.मोहन ऊठला सोनालीला बघू लागला.सदाभाऊ गडबडीत  मोहनकडे येत होते.
अरे मोहन , सोनाली त्या गणूतात्याच्या वाड्यात  गेली  आहे. तिथे  जोरजोरात बोलत आहे .तूम्ही मला मारले
हुंड्याकरिता मले मारून  टाकले  अशी बडबड करित आहे.
काय!
मोहन  ओरडला.
  ती तर गावात  कोणालाही  ओळखत नाही .ती  तर पहिल्यांदा  आली.
सर्व  गाव जमा झाले होते.कुजबूज करत होते.सोनाली घरी येण्यासाठी  तयार नव्हती.
हे माझे घर आहे.या लोकांनी  मले शेतावर  नेऊन  जाळून  टाकले.मले न्याय  नाही  मिळाला.या लोकांना  आधी अटक  करा.
 
अरूणकडे तर खूपच  रागाने  बघत  होती.घरातले घाबरून  बघत होते.तेवढयात एक  आजी बोलली.
अव…माय..हिचा आवाज त सगुनासारखा येऊन  रायला.
सारे लोक चरकले
मोहन जबरदस्तीने  तिला  घरी  घेऊन  आला.डाॕक्टरला बोलावून  आणले डाॕ ने औषध  दिले  सोनाली गाढ झोपी  गेली.
मोहनला तर काही कळतच नव्हते.
बाबा सगुना कोण ?
मोहन  विचारत होता.
सदाभाऊ भूतकाळात  रमून गेले .
तीस वर्षे  झाली त्या  गोष्टीला .सगुना नवरी बनून  किती  आंनदाने आली होती .
सदाभाऊच्या चुलतभावाशी अरुणशी  तिचे लग्न झाले होते.
सदाभाऊ तिला वहिनी म्हणायचे.
सुंदर  सुशील सगुना सर्वाच्या  लाडाची होती.काही  दिवस चांगले  गेले , नंतर  तिचा  हुंड्यासाठी छळ होऊ लागला.
पण  सगुना सर्व  सहन  करायची. कुणालाही  काही  सांगत  नव्हती . सदाभाऊला तिचे  दुःख  कळायचे पण मध्ये  पडायला ती  मनाई  करायची .छळाला कंटाळून  एक  दिवस तिने आत्महत्या  केली.लोकांना  शंका  होती  पण  गावाची बदनामी  नको म्हणून  सर्व चूप  राहिले. सदाभाऊला सर्व  माहिती  होते पण  जीवाला धोका  राहिला  असता म्हणून  ते शांत  बसले. मन आतून  खूप  काही सांगायचे .काय घडले  हे त्यांना  माहिती  होते .सोनाली सगळे बरोबर सांगत होती.ती  शुध्दीवर आली .तिला  काही  कळत नव्हते. ती शहरातील  आणि  चांगली  शिकलेली होती .अशा गोष्टी  ती ऐकून  होती  पण कधी असे काही बघितले  नव्हते. नंतर ती गावात  घरोघरी  फिरली सत्य  जाणून घेतले. सगुनावर खरेच किती  अत्याचार  झाला होता फक्त  सगुनाला न्याय  मिळायला पाहिजे  यावर ती ठाम होती.काही लोकांनी विरोध केला पण सदाशिवभाऊंनी तिला साथ दिली. पण  तिने  लगेच पोलीस बोलावून  घेतले त्यांची  अवस्था  बघूनच पोलिसांना  सर्व  कळले.सगुनाच्या घरच्या  लोकांनी  त्यांचा गुन्हा कबुल केला.
सगुनाला तीस वर्षांनी  न्याय  मिळाला होता.सोनाली वापस शहरात आली.तिलाही  काही  कळत  नव्हते.
काय असेल हे सर्व ..कदाचित  सगुनाला न्याय  मिळावा म्हणून  हे असे काही  घडले असेल का?खूप  काही  प्रश्नांची  उत्तर  नाही मिळाली.
सोनाली मात्र  आंनदी होती..
एका  निष्पाप  जिवाला  न्याय  मिळाला  म्हणून तिला  वेगळेच समाधान  मिळाले होते.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!