मानव,पालवी व श्लोक मयंकला अशा अवस्थेत बघून हिरमुसतात.
मानव मयंक नंतर घरात मोठा पडतो..म्हणून तो पालवी आणि श्लोक ला हाँल मध्ये टिव्ही बघत घेऊन बसतो.मानवचाही भितीने थरकाप होत होता.तो जरी पालवी आणि श्लोक सोबत टिव्ही बघत होता.तरी त्याच्या डोक्यात विचार मात्र मयंकचेच सुरू होते…मयंक दादाला असे अचानक…काय झाले असेल..?
मानवला दोन दिवसांपासून मयंकमध्ये झालेला तो बदल आठवू लागला.त्याचे ते मागील वाड्यात ओट्यावर एकाकी,सुन्न बसणे,कार्यक्रमाला न येणे,,एरवी खूप जास्त बडबड करणारा
दादा…गेल्या दोन दिवसांपासून गप्प गप्प आहे.
हे सर्व मानवला आठवत होते.
प्रमोदने मयंकला बेड वर झोपवत त्याचे दोन्ही हात व पाय दोरखंडाने बांधले.तसा प्रमोदने दीर्घ श्वास सोडला..मयंकला आवरत आवरत बांधायला बराच वेळ लागला होता….
प्रज्ञा तिथेच मयंकपाशी रडत त्याला कुरवाळत बसून राहिली…..विनोदने विनिताला बाकी मुलांसाठी जेवणाचे बनवायला सांगितले.इकडे प्रमोदने त्याच्या खोलीत आल्यावर .दरवाजा आतून लावून घेतला..आणि तो स्वतःला सावरू शकला नाही.बाप म्हणून त्यालाही पाझर फुटला.डोळ्यावरचा चष्मा काढत..त्यालाही खूप रडू आले.माझा मयंक कालपर्यंत छान हसत ,बोलत होता.आज असं काय झाले अचानक?हा विचार करत प्रमोद एकटाच खोलीत बसून राहीला..
तेवढ्यात डाँक्टर आले.विनोदने प्रमोदला त्याच्या खोलीतून बोलावले…आणि मयंकच्या खोलीत नेले……मयंकच्या खोलीत एकच भयाण शांतता फक्त मयंकची ती बडबड सुरू होती मला सोडा….मला जाऊ द्या.कुणीतरी बोलावतय मला तिथं…….
प्रज्ञा मयंकजवळून उठून बाजूला येते…डाँक्टर मयंकला चेक करतात.नंतर त्याचा बीपीही चेक करतात.
सर्वजण स्तब्ध होऊन फक्त मयंककडे बघत राहतात.तेवढ्यात डाँक्टर मयंकला इंजेक्शन देतात…तसा मयंकला त्या इंजेक्शनमधून गुंगी चढते.आणि तो हळूहळू डोळे बंद करत झोपी जातो.
डाँक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे सावट सगळ्यांना दिसून येते.
डाँक्टर -त्याला आता थोड शांत झोपू द्या…मी औषध दिले आहे.आपण जरा बाहेर बोलू.
डाँक्टरांसोबत सर्वजण बाहेर हाँलमध्ये येतात.
हाँलमध्ये सर्वजण आल्यावर विनोद टिव्ही बघत बसलेल्या मानव,पालवी,व श्लोक ला बाहेर खेळायला जा म्हणून सांगतो.तशी ती तिघेही उठतात आणि बाहेर जातात.
प्रज्ञा ,प्रमोद ,विनिता खूप आशेने डाँक्टरांकडे बघतात की ते आता काय सांगतात म्हणून.
डाॕक्टर -मला एक सांगा. अलिकडे तुमच्या घरात काही दुर्घटना किंवा खूप दुखःद घटना घडली का ?
प्रमोद-नाही तर.असलं काहीच नाही घडले.
प्रज्ञा -( न राहवून मध्येच बोलते ) का ? काय झाले डाँक्टर..? असा प्रश्न का केला ? म्हणजे माझा मयंक त्याला काय झाले? तुम्ही प्लिज काय ते स्पष्ट सांगा ना काय झाले त्याला ?
प्रज्ञाला जणू काही तिच्या मयंकसोबत खूप अघटीत घडले आहे…असे वाटून गेले त्यामुळे ती थोडी धास्तावली आणि नको ते प्रश्न डाँक्टरांना विचारु लागली.
प्रमोद -प्रज्ञा जरा शांत हो.डाँक्टर आहेत न.आणि त्यांनी दिले मयंकला औषध.होईल तो लवकरच बरा.
तरीही सर्व जणांची नजर व कान डाँक्टरांकडे लागून राहतात…हे ऐकायला की ते आता पुढे काय बोलतील.
डाँक्टर-प्रमोद मयंकची बाब थोडी गंभीर झाली आहे.मी पहिल्या वेळेसही जेव्हा आलो होतो तेव्हा बोललो होतो की त्याला कसला तरी मानसिक धक्का बसला आहे म्हणून आणि..आता .
प्रज्ञा-आणि काय डाॕक्टर? बोला ना.काय झालंय माझ्या मयंकला..?
प्रमोद विनिताला खूणावत प्रज्ञाला आत खोलीत घेऊन जायचा इशारा करतो.
डाॕक्टर-प्रमोद मयंकला खूप जबरजस्त मानसिक धक्का बसलाय ज्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊ शकतो.मला नेमकं ते सांगता येत नाहीये..पण ह्या क्षणाला मी हेच म्हणेल की मागील वेळेच्या तुलनेने आताचा मयंकला बसलेला मानसिक धक्का हा त्याच्यासाठी हानीकारक आहे. आपल्याला त्याला ह्यातून काढायला हवे.मी तसे त्याला औषध दिले आहे..त्याला झोपू द्या शांत.उद्या वाटलीच तशी गरज तर फोन कर मला.मी येईल लगेच.
विनीत डाॕक्टरांना बाहेर गेट पर्यंत सोडायला जातो.इकडे प्रमोद मयंकच्या खोलीत येतो तर मयंक गाढ झोपलेला असतो.प्रमोद हळूच खोलीचा दरवाजा बंद करत दबक्या पावलांनी बाहेर निघतो.
सकाळनंतर सर्व जण दिवसभर आपापल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..पण प्रत्येक जण असफल ठरतो..कोणाचेच मन कशातच लागत नाही.ह्याच विचाराने कि मयंकला नेमकं असे अचानक काय झाले तरी असावे.? मानव ,पालवी व श्लोक कधी मयंक दादा उठेल आणि कधी त्यांच्यासोबत बोलेल,खेळेल याची वाट बघत असतात.मयंक ला अस बेड वर अर्धमेल्या सारखे झोपलेले पाहून कोणाच्याच घशाखाली अन्नाचा एक घास गेला नाही..की काही करण्याची इच्छा झाली नाही.प्रज्ञा सारखी मयंंकच्या खोलीकडे जात खोलीचा दरवाजा अर्धवट उघडत मयंकला जाग आली का? त्याची काही हालचाल झाली का ? हे बघत होती.
हे सर्व करण्यात संध्याकाळही सरली..प्रमोद व विनोद आँफिसमधून घरी आले.तेही हाँलमध्ये गप्प गप्प बसले.प्रमोदने काय तेवढा मयंकला बाहेरूनच अर्धवट दरवाजा उघडत बघितले.
विनिता ने रात्रीच्या जेवणाबाबत विचारले.सर्वांनी एकच उत्तर दिले फारशी भूक नाहीये..जे काही करशील ते थोडंच कर.
प्रमोद -प्रज्ञा..जरा खोलीत येते का ? थोडं बोलायचं आहे..
हाँलमध्ये मुलं टिव्ही बघत असल्याने प्रमोदने प्रज्ञाशी एकांतात बोलण्याचे ठरवले…जेणे करून मयंकचा विषय मुलांच्या कानावर पडणार नाही आणि तिही घाबरणार नाहीत.
प्रज्ञा-हो.येते. तुम्ही व्हा पुढे.मी आलेच मयंकच्या खोलीच्या खिडक्या बंद करून.
प्रज्ञा मयंकच्या खोलीत खिडक्या बंद करायला जाते..तेव्हा तिची नजर झोपलेल्या मयंकवर पडते.मयंक सकाळपासून जसा झोपला होता..आताही तसाच त्या अवस्थेत होता…त्याने जराही कूस बदललेली नव्हती. त्याचे ते बांधलेले हात व पाय बघून तीला पुन्हा रडू आले. त्याच्या अंगावर चादर टाकते आणि डोळे पुसत बाहेर निघते..प्रज्ञा तिच्या खोलीत जाते..प्रमोद कसला तरी विचार करत बसलेला असतो.प्रज्ञा आल्याची चाहूल लागताच तो भानावर येतो.
क्रमशः
प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की Like,Share करा.
https://marathi.shabdaparna.in/६
पोर्णिमा शिंपी
https://www.facebook.com/
भीती आणि उत्सुकता ताणणारे कथानक.
भिती कायम, पुढे काय ?