अमावस्येची रात्र-भयकथा
अमावस्येची रात्र-भयकथा

अमावस्येची रात्र-भयकथा

अमावस्येची रात्र-भयकथा
लग्नाला पाच सहाच महिने झाले आणि संदीपची बदली कृष्णापूरला झाली.तो एका ग्रामीण बँकेत मॕनेजर होता. संदीप आणि  रचना कृष्णापुरलाला आले.
त्या गावात येताच रचनाला प्रसन्नतेचा अभाव असलेले ते गाव मुळीच आवडले नाही. ती संदीपला तसे म्हणालीसुद्धा.
पण संदीपला तसे काही जाणवले नाही.
एक भाड्याने छोटेसे घर घेऊन त्यांनी संसार थाटला.
संदीप आॕफिसमध्ये गेला कि रचना एकटी कंटाळायची पण करणार काय?
तो आॕफिसमधून घरी आला कि दोघे जरा गावाबाहेर फिरुन यायचे.
आज  जवळच असलेल्या एका शेताकडे दोघेही फिरायला गेले.अमावस्येची रात्र होती.  शेत ओसाड वाटत होते.
सगळे सामसुम होते. रचनाला कसलीतरी भीती वाटत होती.परत जाऊ या म्हणून ती संदीपच्या मागे लागली.संदीप तिला हसायला लागला.
तुला भुताची खूप भीती वाटते,मला माहित आहे.
रचना,तुला कितीदा सांगितले भुत वगैरे काही नसते.सगळे मनाचे भास आहेत. फिरु या जरा वेळ. किती आल्हाददायक वाटत आहे इथे.
 
फिरता फिरता अंधारायला लागले.शेताच्या जरा आतल्या बाजूला एक विहीर दिसत होती.
संदीप तिथपर्यत जाऊ म्हणून रचनाच्या मागे लागला.पण अंधार झाला होता गाव नवीन होते म्हणून रचना तयार झाली नाही.पण संदीपला तिथपर्यंत जायचेच होते. तो ऐकायला तयार नव्हता.याआधी असा हट्टीपणाने संदीप कधी वागला नव्हता.रचनाने नाही म्हंटले म्हणून तो एकटाच पुढे निघाला.
मी तिथपर्यंत जायलाच हवे.कुणीतरी मला साद घालत आहे
असे पुटपुटत पुढे  निघाला.तो ऐकत नाही म्हणून रचनाही त्याच्या सोबत निघाली.
दोघेही विहीरीकडे निघाले. जसजशी विहीर जवळ येत होती संदीपचे हावभाव बदलत होते. ती विहीर त्याच्या खूप ओळखीची असल्यागत तो सराईतपणे पुढे पुढे जात होता. आणि रचनाचा हात पकडून तिलाही समोर ओढत होता.आजूबाजूचे वातावरण भयावह होते.तिथे चिटपाखरुही दिसत नव्हते.रचना भीतीने घामाघूम झाली.  विहिर जवळ आली आणि संदिप एकदम बदलला.विहिरीत डोकावून कुणातरी सोबत बोलायला लागला.
सुमन मी आलो. तुला एकटीला नाही जाऊ देणार मी.
असे म्हणत विहिरीवर चढला. त्याचा एक हात रचनाच्या हातात होता. तिने झटकन त्याला खाली ओढले. ओढता ओढता तो जमीनीवर पडला.आणि बेशुद्ध झाला. रचना घाबरली.सगळेच अचानक झाले.त्या ओसाड शेतात फक्त ही दोघेच होती.आणि  सोबतीला गर्द अंधार आणि रातकिड्यांचा आवाज. मध्येच वाऱ्याचा वेग वाढत होता. पानांची सळसळ होत होती. जवळच असलेल्या रस्त्यावरुन कुत्र्यांचे भुंकणे वातावरणात अजूनच भयानकता निर्माण करत होते. रचना भीतीने थरथर कापत होती.
जरा वेळाने संदीप शुद्धीवर आला. खडबडून उठून बसला.त्याला शुद्धीवर आल्याचे बघून रचनाचा जीवात जीव आला.
संदीप रचनाला म्हणाला,
अग, चल लवकर.रात्र किती झाली. घर जवळ करायला हवे.
दोघेही झपझप चालत रस्त्यावर आले.रस्ता निर्मनुष्य होता. दोन चार कुत्रे फक्त दिसत होते. दोघेही घाबरत घाबरत घरी पोहचले.संदीपला काहीही आठवत नव्हते. रचनानेही जास्त काही विचारले नाही. दोघांनी जेवण केले आणि झोपले.संदीप लगेच झोपला.
रचनाची झोप मात्र उडाली होती.
सुमन,सुमन  मला माफ कर.
मी येतो तुझ्याजवळ.
मी तुला एकटीला सोडायला नको होते.
संदीप झोपेत बरळत होता.
रचना घाबरली.हे सगळे त्या शेतातील विहिरीजवळ गेल्यानेच सुरु झाले हे तिच्या लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ती शेजारी राहणाऱ्या घरमालकांकडे गेली.
काकु एक सांगायचे होते तुम्हाला.
 
सांग ना रचना.
 
काल आम्ही इथे जवळच एक शेत आहे तिथे गेलो होतो.
काकु अचंबित होऊन रचनाकडे बघायला लागल्या.
रचनाने थोडक्यात काकुंना सगळे सांगितले.
काकु संदीप वाचला असे म्हणाल्या.
ऐकून रचनाच्या जीवाचा थरकाप उडाला.
 काकु मला सांगा काय आहे हे सगळे.
अग फार जुनी गोष्ट नाही.इथली श्रीमंताची पोर सुमन गरीब असणाऱ्या राजूच्या प्रेमात पडली. त्या शेतातच भेटायची दोघेही. सुमनच्या घरी समजल्यावर आईवडीलांनी खूप विरोध केला. त्यांनी तिचे लग्न जबरदस्तीने एका दुसऱ्या श्रीमंत मुलाशी जुळवले.
पण सुमन राजुला विसरायला तयार नव्हती. तिने माहेरच्यांना समजवण्याचा खूप  प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते.
राजुला विसरणेही शक्य नव्हते आणि त्याच्याशी रातकिड्यांचा आवाजही शक्य नव्हते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे.
ज्या शेतात ते नेहमी भेटायचे तिथेच असलेल्या विहिरीत जीव देऊन सगळे संपवायचे असे दोघांनीही ठरविले.
अमावस्येची रात्र  होती.दोघेही विहिरीजवळ आले.
सुमन नवरीच्या वेषात होती. दोघांनी तिथेच विहिरीजवळ लग्न लावले. राजुने तिच्या गळ्यात मंगळसुत्र घातले,एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि एकमेकांचा हातात हात पकडला. विहिरीवर उभे राहिले. दोघांनी सोबतच उडी मारायची असे ठरविले होते.पण ऐनवेळी  संदीपच्या हातून सुमनचा हात सुटला,ती एकटीच विहिरीत पडली.ती पडल्यानंतर राजु जीव द्यायला घाबरला.तिथून पळ काढून तो घरी आला.
तेव्हापासून अमावस्येच्या रात्री तिथे कोणी गेले कि सुमन त्याला विहिरीत बोलवते.ती अजूनही राजुची वाट बघत आहे. तू जर संदीपला मागे ओढले नसते तर…..
रचना त्या अभद्र कल्पनेनीच शहारली.
भुतांवर विश्वास न ठेवणाऱ्या संदीपलाच भूत दिसले होते.
काकु राजु कुठे आहे ?
तो दुसऱ्या दिवशीच गाव सोडून गेला.
नंतर त्याच्याबद्दल कोणाला काहीही कळले नाही.
रचना घरी आली.सोबत काकुही आल्या संदीपला बघायला.संदीप अस्वस्थपणे घरात फेऱ्या मारत मारत बरळत होता.
सुमन आज नक्की येतो मी.तू तिथेच कालच्यासारखी नववधूच्या वेषात माझी वाट पहा.आता तुला एकटीला नाही सोडणार मी. तेव्हा मी घाबरलो होतो पण आता नाही  घाबरणार.
 येतो मी लवकरच….
प्रिती
 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Generic filters
Generic filters