नवऱ्यांची आयडिया- विनोदी कथा
ही विनोदी कथा काल्पनिक आहे पण पात्र खरी आहेत.कथेतील चार पात्रांपैकी लेखिका एकाच पात्राला भेटली.तीन पात्रांना ती कधी भेटली नाही.बस् अंदाजाने रेखाटली.
कथेच्या दोन नायिका आहेत.एक सरिताताई आणि एक मोहिनी.
आधी सरिताताईची ओळख करुन घेऊ
सरिताताई एक मध्यमवयीन गृहिणी.गाणे,लेखन यामध्ये निपूण असलेली सरिताताई आणि या दोन्ही कलेचा मागमुस नसलेले तिचे धनी.मुलांना पंख फुटून ती आपापल्या घरट्यात गेली.आता दोघांनी बनवलेल्या घरट्यात ही दोघेच असतात.तर एका रुटीनमध्ये चाललेल्या यांच्या आयुष्यात सरिताताई आणि मोहिनीच्या गाणवेडेपणामुळे कशी खळबळ उडते बघा.
दिवसा एका कवीसंमेलनामध्ये जाऊन सरिताताई दोनचार कविता म्हणून येते.रात्री ती त्याच मुडमध्ये आहे.रात्री पाणी प्यायला उठते.मोठ्या बंगल्यात दोघेच राहतात हे लक्षात आल्यावर चोर चोरी करण्याच्या उद्देशाने चुकून किचनची उघडी राहलेल्या खिडकीतून आत उडी मारण्याच्या तयारीत असतो.
ताई बिचारी अजाण.
तिला काही माहित नाही.
ती आपली गोड आवाजात कविता गुणगुणत.
चोरा रे चोरा
दिसलास मला
खिडकीत तू बसला
शोधले मी तुला.
बोलवते आता धन्याला
धनी देतील चोप तुला.
शुरवीर माझे धनी
त्यांनी पण केली चोरी
चोरले माझेच ह्दय त्यांनी
ते माझे राजा अन्
मी त्यांची रानी…..
ताईच्या कवितेने चोर थरथर कापायला लागला.
इकडे ताईचे धनी जवळ ताई नाही म्हणून तिला शोधायला किचनमध्ये.
सरुsss
सsssssरुssss
सरु डार्लींग…कुठे गेली राणी तू?
असे म्हणत किचनमध्ये.
तिथे गोंधळलेला चोर चुकून उडी टाकून आत ताईसमोर.
चोराला बघून ताईची बोबडी वळलेली. पण शुरवीर
धन्याने चोराला दे दणादणा दे दणादण करुन बांधून ठेवले.पोलीसांना फोन केला..
पोलीस चोराला घेऊन गेले.
धनी ताईला
सरु डार्लींग आज केवळ तुझ्या कवितेमुळे चोर सापडला.
आजपासून मी तुझ्या कवितेचा फॕन.
ताईच्या अंगावर(अजून) मुठभर मासाची भर पडली.
सरिताताई
धनी खरेच का तुम्हाला माझी कविता आवडली?
सांगा ना गडे.
हो ग.
कुठली?
आता मात्र धनी घाबरले.कुठली कविता? एकही शब्द आठवेना.
तीsss तीsssच गsss
सरिताताई
चोरा रे चोरा
हो ग हो
धनीने सुटकेचा निःश्वास टाकला.
तर मंडळी आता पुढील भाग
पोलीस चोराला घेऊन गेले.
ताईचा धन्यावरचा अभिमान दुणावला.
ती धनीच्या मिठीत विसावली.
तुझ्या गळा
माझ्या गळा
गुंफु मोत्यांच्या माळा
चोराच्या गडबडीत झोपेचे खोबरे झालेच होते.
ताई- धनी चहा घेऊ या?
हो हो.
सरिताताई चहा करायला किचनमध्ये आली.
किचनच्या खिडकीत पहिल्या चोराचा मित्र आत उडी मारायच्या तयारीत.
त्याला वाटले रात्री चोराला पकडल्यामुळे घरचे आता बिनधास्त असणार.
या संधीचे आपण सोने करावे आणि सोबत सोनेही न्यावे.
ताईचा मुड आता कवितेवरुन गाण्यावर आला होता.
ओ मेरे सोना रे
सोना रे सोना रे
गुणगुणत चहा बनवायला लागली.
रात्रीचा चोर अजून तिच्या डोक्यात होताच.
मै भी तुम्हारे संग चलूँगी
रुक जा ए चोर
थम जा जरा….
चोराला घाम फुटला.इकडे आपली ताई जोशमध्ये.
तिने दुसरे गाणे सुरु केले
जरा सामने तो आवो ए चोर
छूप छूप छलनेमें क्या बात है
यूँ छूप ना सकेगी तेरी चोरी
मेरे आत्मा कि ए आवाज है
चोराने भीतभीत इकडेतिकडे बघितले.
बाजूलाच चिंचेचे मोठ्ठे झाड.
आत्माकी आवाज,चिंचेचे झाड….हाही थरथर कापू लागला.
ताई आपल्याच नादात.चहा तयार झाला.
धनीला आवाज देवून बोलवण्यापेक्षा ताईने गाणे गुणगुणत साद घातली.
शायद मेरी शादी का
धनी आवाजाने आत आले
रात्री धन्याने कवितेची तारीफ केल्यामुळे ताई धनीवर खूष होतीच.
धनीसाठी काय करु नी काय नको अशा अवस्थेत.
ताईचे गाणे सुरु.
लूटे कोई मन का नगर
बनके मन का चोर
तिकडून धनी
कौन है वो?
ए तो बडा धोखा है
ताईचे सुरुच
यही पें कही है
मेरे मनका चोर
धनी
नजर पडे तो….
बहिया दूँ मरोड
आता मात्र चोराचा धीर खचला.
तो उडी मारुन सरळ ताईच्या पायावर.
धनीssss
धनीने यालाही चोप दिला.आणि गाडीत टाकून स्वतःच पोलीसस्टेशनमध्ये पोहचवले.
मानले यार सरु डार्लिंग तुला.
काल कवितेमुळे आणि आज गाण्यामुळे इतिहास घडला घरात.
मी धन्य झालो राणी तुझ्या सहवासात.
इश्श धनी
ताई लाजेने लाल.
आता जरा तिकडे मोहिनी-शैलेशच्या बंगल्यात डोकावू.(मोहिनी सरिताताईची धाकटी बहिण.)
म्हणजे उगाच फालतू चौकशी करायला नाही डोकवायचे.
पुढे कळेलच तुम्हाला डोकावायचे कारण.
तर इकडे आहे शैलेश आणि मोहिनीची जोडी.
शैलेशराव मोहीनीला मन्या डार्लिंग म्हणतात.
ती नेहमी त्यांना विचारत असते.
डार्लिंग डार्लिंग काय म्हणता?
तर मोहिनी म्हणजे भन्नाट गायिका
गाणे गाऊन झाले कि,
अहो सांगा राया
सांगा मी कशी गाते,
अहो सांगा अहो सांगा…..
रायाने सांगितल्याशिवाय हिला चैन नाही.
रायाला तारीफ करणे भाग.
आता याहून कहर म्हणजे मोहिनीला लिखाणाची चढलेली नशा. एक दोघांनी चांगले लिहितेस म्हंटल्यावर मोहिनी आणि सरिताताईंनी मुलांच्या मदतीने स्वतःचा Blog तयार केला.
Blog तयार झाल्यावर आता Views मिळवण्याची धडपड असे.
घरी येणारे जाणारे,नातेवाईक,शैलेशचे मित्र जो दिसेल त्याला
मन्या डार्लिंग Blog ची लिंक पाठवायला लागली.
वरुन त्यांना
Blog वाचा,comment द्या.अशी तंबी.
वाचनाच्या भितीपायी घरी येणारे जाणारे बंद झाले.
एकदिवस शैलेश अर्थात प्रेमाने
मन्या डार्लिंग तू एवढी ताई ताई करते.जरा जावून ये दोन दिवस ताईकडे.
ती पण कोरोनामुळे घरात कंटाळली होती.
पण राया माझ्याविना तुम्ही राहणार?
राहू तर नाही शकणार.पण राहील कसाबसा.शैलेशने लगेच उत्तर दिले.
आता इकडे ताईच्या घरी
दोन्ही चोर ताईमुळेच सापडले म्हणून ताई एकदम खूष .
धनी-ताई जोडी गाणे गात होती.
(धनीला एकदोनच गाणी येतात.)
बाहोमें तेरे मस्तीके घेरे
मस्ती के घेरो में
….आओ खो जाते है….
तेवढ्यात मंजुळ आवाज कानी पडला.
ताई मी आले
अगबाई ही तर माझी लाडकी मोहिनी.
झटकन जोडीने एकमेकांचे हात सोडले.
धनी मोहिनी पण आता छान गायला लागली बरे.
धनी (मनात)
हे परमेश्वरा एक गाणारी कमी होती का?
काही बोललात का धनी?
नाही ग.छान वाटले.मस्त मैफिल रंगेल घरात.
बघ मोहिनी मी सांगतेय ना सगळ्यांना
माझे धनी
खूप गुणी
रात्र झाली.
धनी बोलले ,सरु राणी, तू मोहिनीबरोबर झोप आज.
मोहिनी-नको ताई माझ्यामुळे तुम्हा दोघांना कशाला विरह?
पण धनी कसले ऐकतात?
ताई आणि मोहिनी एका खोलीत गप्पा करीत बसल्या.
(रात्री दोन चोर पकडल्या गेले.त्यांचा तिसरा साथीदार मात्र होताच.आज खिडकीत त्याचा नंबर.त्या दोघांना पोलिसांनी नेले हे याला माहिती नव्हते).
गप्पात पहिला प्रहर संपला.चहाची शौकिन ताई–
मोहिनी चहा घ्यायचा का ग? चल किचनमध्ये.
मोहिनी तर काय.ताईपेक्षा दुप्पट शौकिन.
निघाल्या किचनमध्ये.
ताई मी आल्यापासून एकही गाणे नाही झाले.
हो ग.
चहा करता करता गाऊ ग
झाल्या सुरु दोघी.
चोर खिडकीतून आत यायच्या तयारीत.
दोघींची चाहूल लागली म्हणून बसला तसाच.
मन क्यूं बहका रे बहका
आधी रात को
………..
किसने बन्सी चूरायी आधी रातको
झालं चोराला वाटले मलाच म्हणत आहे.
घाबरून पळून जाण्याच्या तयारीत.
पण आपली मोहिनी सुरु झाली
चले थे साथ मिलकर
चलेंगे साथ मिलकर
तुम्हें रुकना पडेगा
मेरी आवाज सुनकर…..
चोराचा गोड गैरसमज
अरे ही तर मला थांबवत आहे.
फिर अपनी ताई शुरु हो गयी
बिडी जलायले
जिगर में पिया
…आग है
चोराचा आनंद गगनात मावेना.
मोहिनी
चूरा लिया है तुमने जो दिलको
नजर नही चुराना सनम
चुराssss म्हणत तिने हातात पकडला सुरा
हाताच सुरा घेऊन
बचके तू रहना रे
बचके तू रहना….
खलास….
हाही चोर उडी मारुन आत दोघींच्या पायावर.
सरिताताई नेहमीप्रमाणे
धनीssssss
थांब ग ताई.नेहमी काय भाऊजींच्या भरोशावर राहायचे.
मै हूँ ना
ताईलाही बहिणीची धिटाई बघून स्फुरण चढले.
चोर दोन पावले पुढे आला.
ताई जोशमध्ये
खबरदार जर
टाच मारुनी याल पुढे
चिंधड्या उडवीन
राईराई एवढ्या.
चोर
तायांनो मला सोडा मला सोडा.
पण ह्या दोघीत जमदग्नी शिरलेली.
दोघींनी त्याला दे दणादण केले.
त्याचे ताडण करत असतांनाच पोलिसांच्या गाडीचा आवाज.
सोबत भाऊजी आणि मोहिनीचे धनी शैलेशजी.
मोहिनी- अय्या तुम्ही.नाही करमले ना माझ्या वाचून.
एवढ्या टेंशनमध्येही मोहिनी मॕडम लाजेने चूर.
ताईने तिला मोहिने असे म्हणून भानावर आणले.
पोलिस घेऊन गेले दोघींनाही.
दोघींवर खूनाचा आरोप. कडक बंदोबस्तात ठेवले त्यांना.
बराक नंबर १११ मध्ये.
त्यांच्या समोरच्याच बराकमध्ये ताईने पकडून दिलेले दोन चोर होते.
मोहिनीने पोलिसांवर Impression पाडण्यासाठी हिंदी सुरु केले.
वो क्या हूआ ना पोलीसभाय हमकू पता नही था ऐसा होनेवाला है.
नही तो हम ऐसा क्यूं करते?
बताओ तुमी बताओ….
हम तो गाना गा रहे थे.
पोलीसभाई हम दोनो बहोतच अच्छा गाते है.
रुको सुनाती हूँ अभी
सरिताताई तिच्या कानात
मोहिनी हिंदी आवर.तुझ्या हिंदीमुळेच फासावर चढवतील आपल्याला.
मोहिनी-चल मग गाणे म्हणू.
सलाम-ए इश्क मेरी जान
मोहिनीच्या हिंदीने आधीच अर्धमेले झालेले पोलीस हे गाणे ऐकून सैरावैरा धावू लागले.
दुसऱ्या दिवशी अर्धा स्टाफ सुट्टीवर
मोहिनी-
ताई आपली जमानत घ्यायला कोणी आले नाही.
येतील ग धनी
शैलेशला सोबत घेऊन येतील.
हो.नक्की येतील.
माझ्या नवऱ्याजवळ तर खूप आयडिया असतात.माझ्या नवऱ्याची आयडिया कामी येणारच.
खूप वेळ गेला.कोणीच आले नाही.
वो पोलीस भैय्या हमको एक फोन करना है.
मोहिनीची पोलिसाला order. पळाला तो.
यांचा पराक्रम ताईच्या शेजारीच राहणाऱ्या ज्योतीताईच्या कानावर गेला.ह्या दोघींच्या लिखाणाची चाहती असलेल्या ज्योतीताईने लगेच आधी दोघींची जमानत घ्यायला गेली.
ज्योतीताईने सोबत धनीला आणले होते. ते सरिताताईच्या घरी जाऊन चौकशी करुन आले.
पोलीस– खूनाचा मामला आहे.जमानत होणार नाही.
ही आमची ज्योती पण छान गाते.ते पोलिसांना म्हणाले.
ताई सुरु होणारच होती.
म्हणजे आलाप सुरु केलाच होता.
गाण्याचे नाव काढताच पोलीसाने कागदपत्र न बनवताच ताबडतोब जमानत मिळाली.
त्या सगळ्या परत गेल्या.
ताई आणि मोहिनीला आश्चर्य वाटत होते.
दोघींचे धनी का नाही आले?
दोघी ह्याच विचारात घरी पोहचल्या.
अंगणातच आवाज आणि हास्याचा कारंजा ऐकू येऊ लागला.
काय शैलेश कशी वाटली आयडिया?
मस्त भाऊसाहेब.मीही कंटाळलोच होतो.रोज गाणे आणि तिचे लिखाण.
अहो लिहिते तर लिहीते वरुन वाचायलाही लावते.
view मिळाले पाहिजे म्हणून माझ्या मित्रांनाही पाठवते.
अरे शैलेश माझी तर परिस्थिती अजून वाईट.
तिच्या कविता तर ऐकतोच पण शुटींगही मलाच करावे लागते यार.
नाहीतर रुसून बसते.
बरे झाले. बसतील आता खडी फोडत
पण असली जड मोहिनीची मैत्रीण प्रिती आहे हो भाऊ.
आधी तिला पकडायला पाहिजे.
तिनेच हे लिखाणाचे भूत टाकले माझ्या मन्याच्या डोक्यात.
होईल तेही काम होईल.
आधी आजची खुशी तर Celebrate करु.
सरु आधीपासूनच अशी आहे यार.
लग्नापासून तिच्या कविता,गाणे सुरुच आहे.
आता तर दोघेच घरी असल्यामुळे फार बिकट परिस्थिती आहे माझी.कानाचे शोषण करते ती माझ्या
आपल्या दोघांशिवाय कोणी जमानतही घेणार नाही त्यांची.
पुन्हा दोघांनी गडगडाटी हास्य केले.
दोघांचे बोलणेआणि हसण्याचा आवाज ऐकून अंगणात पोहचलेल्या दोघी रागाने लाल झाल्या.
खाऊ कि गिळू नजरेने घरात शिरल्या.
ताई सुरु झाली इकडे अंगणातच
पत्थर के सनम
अरे हमने ये क्या समझा
ए क्या जाना…
बडी भूल हूयी…
मोहिनी- ताई थांब ग असे हातपाय गाळून काही नाही होणार.ये तू माझ्या मागे.
दोघी आत गेल्या.
ह्या आत गेल्या तेव्हा दोघे एकमेकांना टाळी देत होते.
दोघींना बघून दोघे किती घाबरले हे शब्दातीत आहे.
दोघी
बचना ए नवऱ्यांनो
लो हम आ गये
पुढे काय झाले असेल.
लावा अंदाज
पण ज्योतीताई सांगत होती
आता आम्ही असे नाही करणार.
तुझ्या हिंदी ला नावे नाही ठेवणार,
तुझे गाणी ऐकणार
कथाही वाचणार
मी पण शुटींग करणार….
कविता नाही समजली तरी
व्वा!
क्या बात है मेरी जान
क्या कविता लिखी है
असे आवाज येत होते म्हणे….
…….प्रिती…….








अफलातून विनोदी कथा.😀😀🤭
👌छान 👌
खूपच … विनोदी .. लिहिले..मस्त ..
Wahh dhammal
जबरदस्त 👌👌