५आभास हा छळतो मला…कथामालिका
५आभास हा छळतो मला…कथामालिका

५आभास हा छळतो मला…कथामालिका




चित्रकार मानस? कसे शक्य आहे सुखा.त्यांचे तर लग्न झाले आहे.उगाच काहीही गंमत करु नकोस.
ताई मी कशाला ग गंमत करु.तेच नाव आहे त्यांचे मानस देव. 
अग पण लग्न झालेल्या पुरुषावर तू कशी काय प्रेम करु शकते?
तुला त्यांनी लग्नाचे सांगितले कि नाही, कि फसवले तुला?
नाही ग ताई ते माझ्यासाठी त्यांच्या पत्नीला सोडणार आहेत.
सुखा मला मुळीच पटले नाही तुझे हे वागणे.अजून वेळ गेली नाही. आपण दुसरे स्थळ शोधू तुझ्यासाठी.
ताई म्हणूनच मी त्यांचे नाव सांगत नव्हती.तुम्ही सगळे असेच बोलणार मला माहीतच होते.
सुखा जोरजोरात रडायला लागली.
तिचा रडण्याचा आवाज ऐकून मनोहरराव आणि वसुधाताई दोघेही धावत आले.




काय झाले संपदा? सुखा का रडते आहे?
संपदा जागच्याजगी थिजली.आईबाबांना काय सांगावे तिला सुचत नव्हते.
वसुधाताईः संपदा अग काय झाले? सुखाने नाव सांगितले का त्या मुलाचे.
हो.
अग मग सांग ना आम्हाला.
बाबा त्याचे नाव मानस आहे.चित्रकार आहे तो.
मग बरेच आहे कि त्याच्या संगतीत आपल्या सुखाची चित्रकारीही रंग दाखवेल. तिला लहानपणापासून रंगांची किती आवड आहे. दोघे मिळून संसारात रंग भरतील.
बाबा तो विवाहित आहे.
काय? दोघेही ओरडले.




वसुधाताई मट्कन खाली बसल्या.मनोहररावांना हाताचा आधार देऊन संपदाने त्यांना बाजूला असलेल्या खुर्चीवर बसविले.
थोडावेळ कोणीच काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
थोडावेळ थांबून संपदाच बोलली,
बाबा आज संध्याकाळी आपण मानसला भेटायला जायचे का? मी शाश्वतलाही आॕफिस सुटल्यावर इकडेच बोलवते.तोही सोबत येईल.
बाबांनी फक्त होकारार्थी मान हलवली. सुखा थोड्याच वेळात normal झाली जणू काही झालेच नाही.
आजचे जेवण मी बनवणार.
असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली सुद्धा.
सगळे अवाक् होऊन एकमेकांकडे बघू लागले.
संपदाने आईबाबांची समजूत घातली.
आईबाबा संध्याकाळपर्यंत धीर धरावा लागेल. मानस जर घटस्फोट घेऊन सुखाशी लग्न करायला तयार असेल तर आपली काळजीच मिटेल मग.
वसुधाताई बोलल्या,
अग सुखामुळे त्यांचा सुखी संसार विस्कटत असेल तर पापच आहे  ना ते.
अग आई आपल्याला अजून काहीच माहित नाही.  त्यांचे कदाचित् आधीपासूनच पटत नसेल.आपली सुखा कुणाला दुखवेल असे वाटते का तुम्हाला?
तूच म्हणतेस ना,आपली सुखा सगळीकडे सुख पेरीत जाते म्हणून.
हो ग. पण सुखाची काळजी वाटते ग.
वसुधाताईला हुंदका दाटून आला.
आता शांत राहा बघू दोघेही संध्याकाळपर्यंत. 
संपदा आईबाबांची समजूत घालत होती पण आतून तीही  हेलावली होती. सुखदा मानससाठी एवढी वेडावली आणि  आपल्याला काहीच माहित नसावे याची खंत वाटली संपदाला.
क्रमशः
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
प्रिती गजभिये

3 Comments

  1. Nirmala Mendhe

    आभास… खरंच खूप उत्कंठावर्धक लिखाण आहे. खूप छान कथा… सर्व भाग खूप सुंदर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!