नागपंचमी-varhadi katha

 

कोन होय …..कोन पायजे…..
दुध….
दुध ….माय कोन आल व ….इतल्या पायटी …
इकुन त कुनीच नाई…..घटक्या भर थांबा ..तिकुन येऊन रायली …हत माय बाहेरुन कुलुप लाऊन गेले वाट्टे धनी …
काय घोराय माय ..पायटी पायटी…..दुध वाले मामा व्हय .येतोच भगुन घेऊन..
द्या मामा दुध ….कोन सांगल तुमाले दुधाच,
सर नं सांगल न काली ….लाकडाऊन न कागदि पुड्यातल दुध भेटत ना मने ….यक लिटर भर दुध देजो मने घरी
अस व्हय मनुन तुमी पायटीच आले वाट्टे ..
पायटिच येत असतो मी….सर मने का लेकराई साठी गिलोयगोया ची डबी देईन…
मल काई सांगल नाही ब्वा याईन …
नाई का …कुटि गेले सर ..
वाक ले . फाक ले, काय मनतेत काजीन तिकडे च गेले……
अर देवा ….येतीन ना का इतल्यात .
नाही ..उशीर होते त्याहिले .
तेवढा फोन करुन ईचारा लागत हुता सर ले ….
हव करतो ….हलो …हलो
कुटिहा तुमी ..दुध वाले मामा ले कोनती गोळी द्याची मनल …कुटि ठेवेल हाय थे डबी.
ह…..त तिचा त ….आला बी का तो लागे, ..माया खिशात हाय थे डबी …. माया मनात हुत येता येता देईन त्याले टपरी वर …. बर मंग अस कर,त्याले थांबाले लाव ..मी येतोच ..
हो … थांबोतो त्याहिले.
तुमी थांबा येतेत ते ..बर अटि बसु का ,
हौ बसा.
काय दिस निंगाला …पांडुरंगा ….काय ध्यान पदरी पडल माय ..घरातनी ४ ४. पुडे पडुन हाय दुधाचे …या मानसाले काची घाई असते काजीन … अकातल्या वानीच करते,सरी सकाय माली खराब केली …यक त डोक्स दुक्यान झप लागत नाही रात ची ..आन ईयभर ….राबा लागते …तिचात्नी हे असे धिंगाने ….
अर …पायटीच आले तुमी..
अव …..ए  ऐकत का ..चीनू ची माय..चा ठेव बर २ सिंगल …
आले का तुमी..
हे काय व्हय ईतली भाजी ते बी पालेभाजी ….अव अपुन दोघच मानस हाव न घरात ..तुमी काहुन लगन घर असल्या वानी वागता ….इतल दुध इतली भाजी ..काय व्हय हे …..
व्हयं व तिकड …तुले का समजते …कस वकत हाय ….समद भरेल पायजे घरात ..
मामा या बायकायले काई समजत नाही न ….
बाप्पा … हे घ्या चा ….
पानी बी आन न
बर…आनतो …अदिक काई …असन त थे बी सांगा ,,सांगा न
काडली का भाजी ….
अवो दिस आत्ता च निंघाला न ..जरा धीरा न घ्या … यक त मले झप नाई …डोक्स थाडथाड उडुन रायल … रात भर .. डोया ले डोया नाही …. …तुमीन काय लावल हो सकाय पासुन ….तुमी ९ लेच लगे घोरता न पायटीपासुन किरकिर सुरु करता.. कटायला बाप्पा जीव ….दिवस भर राबा लागते ..कातोया करा लागते जीवा चा …तुमाले काय हाय ..नीर होबासकी.. ईभर..
बाप्पाबाप्पाबाप्पा ….कितीक चिडत व तु…अस का केल म्या …मनल तु याद भुल्ली अशीन..तुया मांग लयच घनाना असते . न ईयभर.मनुन सनवार नाही राहात ध्यानात….मनुन मीन भाजी न दुद आनल ब्वा …
कायची याद भुल्ली मी …सांगा बर ….कोनता सन भुलली.
अवो आज नागपंचमी हाय न ……
बापा ..मी भुल्ली आन तुमाले ध्यान रायल नाई व …
थांबा घडी भर …पुजे च ताट तयार करतो आन इतल्या ४ लिटर दुदा चा निविद दाखवतो ….तुमचीच पूजा करतो नेवा नेमान …नाई तरी तुमी उस्ती खालचे चे नाग हा न … मनते मोठे ..याद भुल्ली ….. धत्त माय …

ही विनोदी,वऱ्हाडी कथा आवडल्यास कृपया शब्दपर्णच्या YOU TUBE CHANNEL ला भेट दया

https://youtu.be/RNraprCfTvM

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!