सासु सुनेची जुगलबंदी..
सूनबाई ए सूनबाई अग हा काय पसारा करून ठेवला घरभर एक वस्तू जागेवर सापडत नाही आहे माझी …मी मेली चार दिवस वारीला काय गेली तर तू सगळ्या घराचा उकीरडा करून ठेवला झोपा काढत होती का दिवसभर.. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर सूनबाई च्या नावाचा जप केल्याशिवाय उषाबाई चा जणू दिवस उजाडत नसे. त्या सदानकदा आपल्या सुनेच्या चूका काढायला टपूनच राहत असत त्यांचे सून अनूही काही कमी नव्हती ती पण शेरास सव्वाशेर होती या दोघी सासू सूनेच्या तू तू मैं मैं मध्ये मात्र बिचाऱ्या शेखर चे नेहमीच पानदान वाजत होते एकीची बाजू घ्यावी तर दुसरी लगेच गाल फुगवून बसायची घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून या वाक्याचा अर्थ खरंतर शेखरला आता पूर्णपणे कळला होता. सासू सूनेच्या या अग्नीदिव्यातून तो रोज जात होता.
घराचे बांधकाम जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेले होते.
नवीन घरात राहायला जाण्याआधी सासू-सूनबाईच्या नात्यातील तणाव पूर्णपणे दूर करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असे शेखरला वाटू लागले.
दोघींच्या नेहमीच्या तू तू मै मैं ला तो पार वैतागला होता.
कोण्या एकीची बाजू घेऊन चालणार नव्हते.
त्याच्या आयुष्यात त्याला दोघींही महत्त्वाच्या होत्या, पण दोघींमध्ये असणारे गैरसमज हळूहळू वाढत आहेत हे त्याला जाणवत होते
मग त्याला दोघींना एकत्र आणण्यासाठी एक युक्ती सुचली.
या युक्तीचा फायदा त्याला झाला
सासू-सूनेच्या नात्यात सुधारणा होऊ लागली. दोघींनीही एकमेकींशी बोलणे सुरू केले आणि घरातील कामे एकत्र येऊन करू लागल्या. शेखरला त्याच्या युक्तीचा परिणाम दिसू लागला होता. त्याला आनंद झाला होता की त्याच्या प्रयत्नांना यश आले होते.शेखरने एक अनोखी युक्ती केली. त्याने सासू-सूनेच्या भांडण्याच्या वेळी एक जुना टीव्ही आणला आणि त्यात एक व्हिडिओ चालू केला. व्हिडिओमध्ये एक म्हातारी सासू आणि सूनबाई एकत्र येऊन स्वयंपाक करत होत्या आणि हसत-हसत एकमेकींशी गप्पा मारत होत्या.
व्हिडिओ पाहून उषाबाई आणि अनु दोघीही एकमेकांकडे चोरुन पाहू लागल्या. त्यांना वाटले की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. शेखर म्हणाला, “हे पहा, हे दोन वर्षांपूर्वीचे तुमचे फोटो आहेत. तुम्ही दोघींनी एकत्र येऊन किती सुंदर स्वयंपाक केला होता.” दोघींनीही एकमेकींकडे चोरून कटाक्ष टाकला त्या दोघींनाही शिखरचे बोलणे पटत होते. आपण दोघी मिळून उगाच निरर्थ क दिवसभर भांडत राहायचो
आपल्या भांडणामुळे घरातील लोकांना किती मनस्ताप होतो याचा आपण कधीच विचार केला नाही या विचारानेच दोघी मनातल्या मनात खजिल झाल्या.
आता एकमेकांशी न भांडता एकमेकांना समजून घ्यायचे असे दोघींनी एकमेकींना वचन दिले
हळूहळू त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन
त्यांनी एकमेकींशी बोलणे सुरू केले
आई आणि बायकोला एकत्र आलेले बघून शेखरला ही आनंद झाला शेखरच्या सांगण्यावरून उषाबाई आणि अनु ने दोघींनीही एकत्र येऊन एक कुकिंग शो तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यासाठी एक थीम निवडली – “भारतीय पाककृती”. शेखरने त्यांना या कामात मदत केली आणि त्यांचा शो सोशल मीडियावर अपलोड केला.त्यांचा शो लवकरच लोकप्रिय झाला आणि लोकांनी त्यांच्या पाककृतींची प्रशंसा केली. सासू-सूनबाई दोघींनीही एकत्र येऊन अनेक नवीन पदार्थ बनवले आणि त्यांच्या शोमध्ये ते सादर केले.
त्यांच्या शोचे नाव होते “सासू-सून की रसोई”. लोकांना हा शो खूप आवडला आणि त्यांच्या पाककृतींची मागणी वाढली. सासू-सूनबाई दोघींनीही एकत्र येऊन एक कुकबुक तयार केली आणि ती प्रकाशित केली.
त्यांच्या कुकबुकला खूप प्रसिद्धी मिळाली आणि ती बेस्टसेलर ठरली. नंतर सासू-सूनबाई दोघींनीही एकत्र येऊन एक यशस्वी व्यवसाय उभा केला . शेखरला त्याच्या आई आणि पत्नीच्या यशाने खूप आनंद झाला .
लेखिका..
सौ.दर्शना ओमकुमर भुरे हिंगोली…






khup chan katha