हाफ तिकिट-३
ज्योती रामटेके
बबन,सदा,गंगाराम घरी आले.चौघीजनी मस्त च्या पिउन रायल्या होत्या..कवा आल्या मामी..दोघान इचारल.
आताच आलो बापा. लय दिस झाले. तुमची भेट नोती.
मायी पोरगी येत रायते आठा दिसाले.लय दिस झाले घराच्या बाहेर निंगाली नोती. आता एसटीत बी सवलत हाये.
मले त फुकटच हाये.आता पडायचा भेव वाटते. सखु म्हने मले चल व माय या वक्तीले म्हनुन आली.
सदा.. बबनने आवाज दिला. तुयावाली आई कुठ हाये आवाज दे बर कुठ दिसुन नाई रायली. अरे सैपाक करुन लय कटायलो. आज काई चांगल..चुगंल कर मानतो तिले.
गंगारामचा चेहरा चमकला. आज बहुतेक चांगल खायला भेटनार मनुन खुष झाला. बबन.. आज चांगली मसालेदार भाजी करावे लाव सुनबाईले . खान्याच बी लपुन सांगा लागते तुले. तुया मायच्या समोर काई बोलता येत नाही मले.
तोंड लय खुरी आल बापा. सदा आईले दे बर आवाज बबनने आवाज दिला.
बाबा ते पा कुपाच्या बाजुन उभी हाये आई.आता त्या सनी देओल च्या पोराचं लगीन झाल ना त्याच्यावर बोलुन रायल्या.तिकडुन नमु काकी उभी हाये.
आता दोन तास घोर नाई.. दोघीही रिकाम्या. अन कारे सदा. ते नमु काकी त रडुन रायली वाटते.
हो बाबा.. मी आताच त्यायच्या गोष्टी आयकुन आलो.
नमु काकी म्हनते का सनी देओल न हेमामालिनीले अन तिच्या पोरीले बोलवायला पाहिजे होत .धर्मेन्द्रच काई चालत नसन मनते म्हतारपनात.. पा बाबा तिकड दोघी डोळे पुसुन रायल्या.
काय मनाव या बायाले. मले तुई आई त्या टीव्हीवरच्या बाया धडाच्या पावु देत नाई. म्या जर धर्मेंद्र सारख केल ना त ही बया माया नक्कीच खुन करन.
या मामी.. बसा.. गंगारामन सासुले आवाज दिला. काय म्हनते तब्येत..काय नाई बापा आता.. सबन तीर्थ पावुन झाले.आता त नीरा दुसऱ्याच्या भरवशावर जीव झाला.कोनी नेल त गावाले जाव. नाई त घर बर.
बराबर हाये मामी तुमच..म्हतारपनात घर बर रायते.पडल..झडल त लय आफत रायते. डोयान बी दिसत नाही तुमाले बराबर. मोतीबिंदुच आपरेशन झाल न तुमच.
पावनेबुवा काय सांगु तुमाले. डोयान अजिबात दिसत नोत.
बुढा कानावर गोष्ट घेत नोता. दिसत नाई म्हनुन लय मजा हुती मायावाली.जीवाले लय आराम हुता. चहाचा कप हातात भेटत जाये.. वावरात जा नाई लागे. सबन चांगल हुत पन मले त्या सिरीयल शिवाय गमत नोत. दिवसभर त्यायचा आवाज कानावर पडे. बुढा लय खुष होता. मस्त आपल्या मनान टीव्ही पाहे.आंदी मी जे लावन ते पाहत राहे.
एक दिवस सिरियल साठी लय भाडंन झाल आमच. सारा येटाळ जमा झाला. दुसऱ्या दिवशी पोरान मले सरकारी दवाखान्यात भरती केल. दोन दिसान आपरेशन झाल.
आता मस्त दिसते मले.सबन सिरियल पायतो. बुढा बी जे मी लावन ते पायते आता.
लता ..बबनने आवाज दिला.. कवापासुन आवाज देऊन रायलो बिचारे.. आठ दिस झाले घरी नोती अन आल्याबरोबर मले सोडुन तिकडे बोलाले गेली.
काय नाई वो तिन आवाज दिला त गेली दोन शब्द बोलाले
दोन शब्द. अव बिचारे हजाराच्या वर शब्द बोलुन आली तु. हे पाय आता मी सैपाक करुन कटायलो. मी काम मनतो आज जरा मस्त मसालेदार भाजी कर. चांगला जेवतो म्हनतो आज. आई कुठ गेली.
लसन निवडाचे सांगतो तिले. मी कांदा कापुन देतो.
अव सदाचे बाबा.. माई आई भाकरी करुन रायली.. मस्त तिखट चुन..अन भाकरी केली तिन. तिच्या हाताच्या चुनाले लय चव हाये म्हनल. मसाल्याची भाजी फिकी पडते.म्या म्हनल आईले आठ दिस राय इथ .
मी उद्या महाराष्ट्र दर्शनाले जातो म्हनल.. एसटीची सवलत हाये
त येतो जाऊन. एसटीचे लय उपकार हायेत बायावर.
बबन..गंगाराम.. सदाच्या चेहरे पडले होते.
आबाजी… चिल्लर पैसे द्या.. मी पिझ्झा आनाले जातो.
समाप्त
या आधीचा भाग वाचा खालील लिंकवर







देवा…
मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हसवणारी,खुसखुशीत विनोदाची पेरणी करणारी,व-हाडी भाषेची पकड असणारी जबरदस्त कथा
Pingback: हाफ तिकिट -भाग-२ - शब्दपर्ण