Cinema-दिल एक मंदिर Dil Ek Mandir -रूक जा रात ठहर जा रे चंदा Review in marathi
काळजाच्या कोपऱ्यात राहणारा…हळवा..सुंदर सिनेमा.शंकर जयकिशन यांचे कर्णmarathiमधूर संगीताने सजलेला.
साधी…सालस भारतीय नारी मीनाकुमारीने तिच्या सर्वांगसुंंदर अभिनयाने अजरामर केली.कथेला साजेस नाव सीता..,
सीताच्या भूमिकेत मीनाकुमारी अगदी चपलख बसते.तिचा भावूक …हळवा …भावनिक चेहरा..मनात घर करून राहतो.
ती भूमिका तिनेच साकारावी. तिचे आरसपानी सौंदर्य ..कुणालाही घायाळ करणारे. कपाळी मोठे कुंकू .. तिच्या सौंदर्यात भर घालणारे दागिने. भरजरी साडी.अस्सल खानदानी रूप.चेहऱ्यावर ममता..निरागस भाव ..पती..कॕन्सरने आजारी.. मनात सारखी धाकधूक..भीती जीव सारखा पतीमध्ये गुरफटलेला.
तिच्या पतीच्या भूमिकेत दिग्गज कलाकार राजकुमार.
खूप ताकदीने त्यांनी रामची भूमिका साकारली.
बायकोवर नितांत प्रेम करणारा हळवा पुरूष.
आपल्याला आॕपरेशन मध्ये काही झाले तर….या कल्पनेने व्यथित झालेला राम डाॕक्टरकडूनच बायकोच्या दुसऱ्या लग्नाचे वचन घेतो.
डाॕक्टरची भूमिका राजेन्द्र कुमारने समर्थपणे आणि ताकदीने रंगवली.शांत …सौम्य चेहरा..आजारी लोकांची सेवा करण्याची तळमळ..रामला वाचविण्यासाठी त्याचे दिवस ..रात्र एक करणे…प्रेमिकेचा पती असूनही त्याच्या मनात पवित्र भावना.स्वतःच्या स्वप्नांची अपूर्णता…
पण कुठे आकस नाही.
आॕपरेशनच्या आदल्या रात्री राम सीताला नववधूचा श्रृंगार करायला सांगतो..सीता व्यथित होते..पण रामच्या इच्छेनुसार व्याकूळ मनाने साजश्रूंगार करून बाहेर येते.खिडकीतून बघते.. बाहेर काळोखी रात्र ..
आर्त स्वर सुरू राहतात.
रूक जा रात
ठहर जा रे चंदा
बीते ना मिलनकी बेला
एका अनामिक भितीचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.आजारी नवरा आणी त्याची इच्छा या द्वंद्वात तिला काही सुचत नाही.
हातातून वाळू निसटून जावी तसा प्रत्येक क्षण सरकत आहे. नववधूचा वेष धारण करून ती हळूच बाहेर बघते.बाहेर गच्च काळोख दाटलेला.नभात चंद्र मोठ्या दिमाखात फिरत आहे.त्याच्या सोबतीला अंसख्य तारका चमकत आहेत..जणू त्या त्याच्या प्रेमिका.
ही रात्र सरुच नये म्हणून ती चंद्राला आळवणी करत आहे.नववधूचा साज करून तिने आपल्या समोर यावे ही त्याची मनातील इच्छा …कदाचित शेवटची. अगतिक नवरा…आजरपणामुळे तो पलंगावर पडून शून्यात बघत आहे.
रात्रच ही सरणारच हे तिलाही कळते .तिच्या वेदना रात्रीला थोडीच थांबवून ठेवणार.
तिचा आर्त सुर सुरू असतो.
पहले मिलन की यादे लेकर
आयी है ये रात सुहानी
दोहराते है फिर ये सितारे
मेरी तुम्हारी प्रेम कहाणी
पहिले मिलन मी कशी विसरणार ? ते तर माझ्या आठवणीत कायम समावलेले…
मी तर कायम तुझीच…आणि फक्त तुझी
ते बघ आपली अमर प्रेम कथा
सर्वांना कळली बर…
आकाशातील चांदण्या…चंद्र काळोखी रात्र
जणू आपल्या प्रेमाचे साक्षीदार आहेत.
कल का डरना
काल की चिंता दो तन है मन एक हमारे
जीवन सीमा के आगे भी आऊँगी मै संग तुम्हारे.
उद्या पतीचे आॕपरेशन..त्यात तो कदाचित मला कायमचा सोडून जाईल ही व्याकुळता..
आॕपरेशन करणारा तरी कोण?
लग्नाआधीचा प्रियकर ..
तुम बदला तो नही …लोगे ना?
तिचा तो कातर आवाज
काळीज पिळवटून टाकते.
तेव्हा तिच्या ओठांची होणारी थरथर काळजात पक्की
रूतत जाते.
प्रियकर मात्र शांत…अबोल
तो सर्व विसरलेला
रूग्ण सेवेत स्वतःला समर्पित.
मनाची घालमेल..अर्धवट राहिलेले प्रेम.
ती सल त्यालाही वाटत असेलच.
तो काहीच न बोलता कर्तव्याशी एकनिष्ठ.
शेवटी त्याचाच अंत अंगावर शहारे आणते.
काय म्हणावे या प्रेमाला
इतके निरपेक्ष प्रेम असू शकते का?
प्रेमिकेच्या पतीला वाचविण्यासाठी
त्याची धडपड …मेहनत …रात्रभर जागरण.
त्यालाही त्याच खरे आणि निस्वार्थी प्रेम सिद्ध करायच
असते..मी फक्त डाॕक्टर आहे..
मला फक्त पेशंट आणि तो कसा चांगला
होईल ही तळमळ.
तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे.
तुम कहते हो कि भुल
जाओ.
हे गाणे तर खास आवडीचे.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबलेले ती दोघे
सर्व जगाला विसरून गेले.आता कुणीही आपल्याला दूर करू शकणार नाही..याची शाश्वती..
आणि हा काय वेडेपणा , मी या जन्मात तुला कशी विसरून जाणार … अरे वेड्या तू तर माझा श्वास आहेस. हे सारे भावविश्व तुझ्यासाठी आहे.तुझ्याविना मी कशी
रे जगू..
नियतीचा डाव कधी कुणाला कळला?
तिने तिचा डाव साधला.
दोन प्रेमी आपआपल्या मार्गाने निघून गेले
काळाचा महिमा अगाध
आयुष्यात पुन्हा एका वळणावर
दोघांची पुन्हा भेट झाली.
आजारी नवरा…ती सतत त्याची सावली झालेली.
नकळत पहिले प्रेम समोर येते. आता मात्र तिचा जीव धास्तावतो. ती डाॕ..बद्दल संशय घेऊ लागते..
तो मात्र शांत अथांग सागरासारखा.
सर्वच काही मन व्याकुळ करणारे.
तिच्या जिवाची मात्र तगमग सुरू राहते.
डाॕक्टर आपला बदला तर नाही घेणार?
ही अनामिक भीती.. तिच्या मनात सतत राहते.
सीता स्वभावाने गोड .. दवाखान्यात सर्वांना आपले करते.
आॕपरेशन होते.रामचा जीव वाचतो. डाॕ.. सीताला सांगायला धावत सुटतो..
आंनदाच्या भरात प्रेमिकेला तुझ्या पतीला मी नवे जीवन दिले हे सांगण्याची घाई..
आणि त्या हर्षात त्याला हार्टअटॕक येतो.
आपला प्रियकर आपला सुड तर नाही घेणार ही भीती
तिला सतत व्याकुळ करित राहते.
पण प्रियकर मात्र त्याच्या निरागस…उदात्त
प्रेमाचे दर्शन घडवून देतो.. प्रेमिकेच्या पतीकरिता सर्वस्व बहाल करून शेवटचा श्वास सुध्दा त्याला अर्पण करायचा.
काय म्हणावे या त्यागाला?
लता मंगेशकर… मोहम्मद रफी यांचे आर्त स्वर
शंकर …जयकिशन यांचे कर्णमधुर संगीत.
शैलेन्द्र यांचे काळजाला भिडणारे गीत.
शेवटी दिल एक मंदिर है ..
गाणे सुरू राहते .त्या गाण्याचा आर्त
स्वर कानावर आदळत राहतो..
आपण बाहेर निघतो ते डोळ्यांत
अश्रू घेऊनच .
रुक जा रात ठेहर जा रे चंदा गाणं ऐकण्यासाठी YOU TUBE ची लिंक बघा
गायिका सरिता बायस्कर
https://marathi.shabdaparna.











Wah mst लिहिल g
छानच लिहिले
सुंदर
वां वां खुपच सुंदर लिहिलेस समीक्षष लिहिलेस ज्योती बेन …दिल ऐक मंदिर पिक्चच बाबत …
सुरेख
Excellent tai🌹🌹🌹
खूप मनभावन
Nice
सुंदर लिहिलस g jyoti
मस्त…
वेगळं दर्शन
Excellent
सूंदर समीक्षण केलेस