Hindi movie-Abhimaan-अहंकार कि प्रेम?
Hindi movie-Abhimaan-अहंकार कि प्रेम?

Hindi movie-Abhimaan-अहंकार कि प्रेम?

Hindi movie-Abhimaan-अहंकार कि प्रेम?
हलकेफुलके,विनोदी सिनेमे काढून प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या दिग्दर्शकात हृषिकेश मुखर्जींचे नाव सगळ्यात वर आहे.
साधेपणातील सौंदर्य बघायचे तर हृषिकेश मुखर्जींचे बघायला हवे.
फायटींग सीन्स,डान्स,अंगप्रदर्शन,तोकडे कपडे हे हमखास यशाचे मार्ग अशी साधारणपणे सगळ्यांची समजूत असते पण हृषिकेश मुखर्जींचे सिनेमात यातील काहीही नसतांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले ते केवळ दर्जेदार कथा,अभिनय,गाणी यांच्या बळावर.
त्यांचे आनंद आणि अभिमान हे दोन्ही सिनेमे त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा गंभीर आहेत.
अभिमान पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारा आणि  एकूणच स्त्री-पुरुष समानता,मानसिकता,पुरुषी अहंकार (male ego) यावर भाष्य करणारा आहे.
अर्थात सिनेमा १९७३ मधला आहे.जवळपास पन्नास वर्षापूर्वीचा.
आता male ego कदाचित् कमी झाला असेल.
पण या अहंकारापायी खूप  कळ्या उमलण्याआधीच कोमेजल्या असतील.स्त्रियांमधील कला फुलल्याच नसतील.
पुरुषाचा मीच सरस हा हट्ट स्त्रीच्या त्यागानेच पूर्ण  होतो.
सुबीर नावाजलेला गायक.आवाजाने भूरळ घालणारा,खूप  चाहते असणारा प्रसिद्ध गायक. 
एका गावी जातो.तिथे उमाचा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकतो.दोघेही संगीताचे पुजारी.पण संगीतावर प्रेम करण्याचे दोघांचीही कारणे वेगळी. सुबीर श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी गातो आणि उमा स्वतःसाठी.सुबीर  उमासोबत विवाह करुन परततो.
आल्यानंतर रिसेप्शन देतो.आणि यापुढे तो फक्त  उमासोबतच गाणार असे जाहीर करतो. यानंतर
सिनेमात आलेला संवाद
मैने तो फैसला किया हम दोनो एकसाथ गायेंगे
इतनी बडी भूल सुबीर ना करे तो अच्छा है
कौनसी भूल सर
ये एकसाथ 
उमा सुबीरसे ज्यादा प्रतिभाशाली है और इतिहासमें सिखाया है पुरुष नारीसे श्रेष्ट 
है और उसकी पत्नी आगे जायेगी तो
क्या वो बर्दाश्त कर सकेगा?
वरील संवादात असलेल्या अर्थाप्रमाणेच पुढील सिनेमा घडत राहतो.
सुबीरने ठरवल्याप्रमाणे लग्नानंतर सुबीर-उमा सोबत गातात. उमाचे वडील शास्त्रीय संगीतात तरबेज असतात. उमा लहानपणापासून त्यांच्याजवळ शिकलेली.अर्थातच तिचे गायन रसिकांना अधिक भावते. सिनेमात गायनाच्या आॕफर तिला जास्त यायला लागतात.चाहते आॕटोग्राफसाठी तिच्या भोवती गराडा घालतात.
तिचा लोकप्रियतेचा आलेख वाढत जातो तसतसा सुबीरचा तिच्या पुढे राहण्याचा अट्टाहासही वाढतो.
इथून पुढचा सिनेमा अहंकार आणि प्रेम यात सुबीर काय निवडतो यावर आधारित आहे.
उमाची लोकप्रियता वाढते आणि सुबीरचा अहंकार दुखावतो पण तो तिला गाणं बंद कर असे स्पष्ट न सांगता तिला दुखावत राहतो.
साधी,सरळ,कुठलीही महत्वाकांक्षा नसलेली,घरात रमणारी,सुबीरवर प्रेम करणारी संवेदनशील  उमाला सुबीरचे वागणे अपमानास्पद वाटते  आणि  ती घर सोडून वडिलांकडे निघून जाते.
ती आई बनणार असते पण ही गोड बातमी  सुबीरला चंद्रु कडून समजते,पुन्हा त्याचा अहंकार आड येतो.उमा त्याची वाट बघते पण सुबीर तिला भेटायला जात नाही.भावूक उमा डिप्रेशनमध्ये जाते,मुलं जन्मापुर्वीच दगावते.
शेवटी अहंकार बाजूला ठेवून सुबीर उमाला भेटायला जातो.तिला घरी घेऊन येतो.
गाण्यामुळे ते जवळ येतात. गाण्यामुळेच दूर जातात आणि शेवटी गाणेच त्यांना जवळ घेऊन येते.
अमिताभ-जया बच्चनचा  अभिनय अर्थातच  उच्च दर्जाचा.
अभिमान मध्ये पतीला पत्नीच्या प्रतिभेमुळे आलेली कमीपणाचा,असुरक्षिततेची भावना उत्तम मांडली आहेच.
सुबीर-चंदरची मैत्री,सुबीर-चंद्राची मैत्री अभिमानची जमेची बाजू आहे.
सुबीरचे घर,करियर सांभाळणारा,सुबीरसाठी काहीही करणारा चंद्रु.हा रोल असरानीने केला आहे.
 सुबीर आणि चित्राच्या मैत्रीला विविध पैलू आहेत.
 उमा सुबीरच्या आयुष्यात येण्यापुर्वी आणि  ती आयुष्यातुन गेल्यानंतर भावनिक आधार सुबीर चित्रातच शोधतो.
सुबीरचे लग्न उमासोबत झाल्यानंतर तिला वाईट वाटते पण जे आहे त्याचा ती स्वीकार करते. 
 सुबीरच्या लग्नानंतरही ही मैत्री टिकते आणि  उमालाही या मैत्रीवर आक्षेप नसतो.
नेहमी खलनायिकेच्या भूमिका करणाऱ्या बिंदूने सुबीरचा तुटत आलेला संसार पुन्हा जुळावा अशी मनापासून इच्छा करणाऱ्या सुबीरच्या मैत्रीणीची  चित्राची भूमिका वठवली आहे.
अभिमान- गायकाच्या अहंकारावर,प्रतिभेवर बेतला असल्याने संगीत खूप महत्वाचे असणे ओघाने आलेच.
सिनेमाची सुरुवात
Ladies and gentleman fasten your seatbelt,
दिल थामकर बैठीए
शानदार मैफिलमें वो सुरीली आवाज जिसने मधुरता कि वजहसे लाखो,करोडो दिल जिते है
वही आवाज,वही लाजवाब आवाज लेकर आ रहा है देशका महान गायक सुबीर कुमार…सुबीरचे गाणे सुरु होते.
मीत न मिला
मीत न मिला रे मन का 
कोई तो मिलन का
कोई तो मिलन का, करो रे उपाय
मीत न…
गाणे संपल्यानंतरच्या दृश्यात सुबीरकुमारच्या प्रसिद्धीचा,लोकप्रियतेचा  आपल्याला अंदाज येतो.
हे नदिया किनारे
हे नदिया किनारे हेराए आई कंगना
नदिया किनारे हेराए आई कंगना
ऐसे उलझ गए अनाड़ी सजना
ऐसे उलझ गए अनाड़ी सजना….
सुबीर प्रथमच उमाला बघतो.तिच्याआधी तिच्या आवाजाच्या प्रेमात पडतो.
तेरी बिंदिया रे 
तेरी बिंदिया रे आय-हाय, तेरी बिंदिया रे
तेरी बिंदिया रे आय-हाय, तेरी बिंदिया रे
सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया
रे आय-हाय, तेरी बिंदिया रे
सुबीर-उमाच्या लग्नानंतरचे हे पहिले गाणे.नवविवाहितांच्या भावना गीतात मांडल्या आहेत.
तेरे मेरे मिलन की ये रैना

 

तेरे मेरे मिलन की ये रैना
तेरे मेरे मिलन की ये रैना
नया कोई गुल खिलाएगी
नया कोई गुल खिलाएगी
 लग्नाला काही दिवस झालेत.दोघांच्या मिलनातून नवा जीव जन्माला कधी येईल याची उत्सुकता,त्याचे आगमन झाल्यानंतर आयुष्यात  होणारे बदल
 नन्हा सा गुल खिलेगा अंगना
सूनी बैयाँ सजेगी सजना 
जवळपास सगळ्यांचाच अनुभव गीतकाराने मांडला आहे.
 लुटे कोई मनका नगर
 लुटे कोई मनका नगर
बनके मेरा साथी
लुटे कोई मनका नगर
बनके मेरा साथी
रोमॕटिक गाणे.तिची लटकी तक्रार आणि  का करू मै बिन उसके
रह भी नहीं पाती……ती त्याच्यात किती गुंतली हे दाखवणाऱ्या  ओळी.
अब तो है तुमसे
अब तो है तुमसे हर खुशी अपनी
तुमपे मरना है ज़िंदगी अपनी
ओ ओ अब तो है तुमसे   …
श्रोत्यांना सुबीरपेक्षा उमाचा आवाज जास्त भावतो.  तिला एकटीला गाण्याच्या आॕफर्स यायला लागतात.तिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या सर्व भावना गीतात एकवटल्या आहेत.
 तिच्या आनंदी क्षणाचे,यशाचे सगळे श्रेय ती सुबीरला देते.
पिया बिना पिया बिना
पिया बिना पिया बिना पिया बिना, बसिया
बाजे ना बाजे ना बाजे ना,  पिया बिना …
सुबीर उमाची लोकप्रियता वाढल्यानंतर तिच्यापासून दूर होत जातो.तिचे हे शेवटचे गाणे.यानंतर ती निघून जाते.तो तिच्यावर रुसला आणि तिचे संगीत थांबले.
पिया ऐसे रूठे, के होंठों से मेरे, संगीत रूठा
खूप स्त्रियांच्या स्वप्नांची होळी पुरुषी अहंकारामुळे झाली.
निःस्वार्थीपणे पुरुषाच्या मागे येणारी स्त्री,पुरुषाच्या इगोला धक्का लागू नये म्हणून प्रयत्न करणारी स्त्री आणि मीच श्रेष्ठ अशा आविर्भावात वावरणारा पुरुष यांची कथा असणाऱ्या संगीतमय अभिमानचे संगीत S.D.बर्मन यांचे आहे.
या सिनेमात कथेला पुढे नेण्यात गाण्यांचा खूप वाटा आहे.
सगळी गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली आहेत.
नितांतसुंदर गाण्यांना आवाज दिला रफी,लता मंगेशकर,किशोर कुमार यांनी.
काहीजणांचे अन्नपुर्णादेवी आणि रविशंकर यांच्या कथेवर सिनेमा बेतला आहे असे म्हणणे आहे.
अन्नपुर्णादेवी- पुस्तक वाचले तर बरेच साम्य आपल्या लक्षात येते.
अन्नपुर्णादेवीचे वडील प्रसिद्ध संगीतकार अल्लादिन खान.त्याच्याकडूनच सुरबहार हे कठीण वाद्य शिकल्या.
 रविशंकरही  अल्लाद्दिन खानचे शिष्य .लहान वयातच अन्नपूर्णादेवीचे रविशंकर सोबत लग्न झाले.
प्रतिभावान अन्नपुर्णादेवीभोवती लोकप्रियतेचे वलय जमायला सुरुवात झाली आणि  पुढे  अभिमानमधील उमासारखे आयुष्य  फरफटत गेले.
अन्नपुर्णादेवीने स्टेज शो बंद केल्यानंतरही नाते सावरल्या गेले नाही.
(संदर्भ -Annapurna Devi: The Untold Story of a Reclusive Genius)
अभिमान सिनेमा असल्यामुळे लेखकाला गोड शेवट करता आला.सुबीर अहंकार बाजूला ठेवत तडजोड करतो.प्रेम अहंकारावर मात करते…..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

  1. Darshana

    अभिमान …
    अमिताभ, जया भादुरी चा अभिनय असलेल्या सुरेख, अर्थपूर्ण चित्रपटाचे तेवढे च सुरेख रसग्रहण.. संपूर्ण चित्रपट परत एकदा आठवला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!