दैवगाठ- मराठी  प्रेमकथा
दैवगाठ- मराठी प्रेमकथा

दैवगाठ- मराठी प्रेमकथा

दैवगाठ-मराठी  प्रेमकथा

 

अहो ….थांबवा…..थांबवा म्हणत आभा धावली पण बस निघुन गेली…. आभा सुंदर स्त्री(तीस वर्षा ची असेन).फिरोजी रंगाच्या पंजाबी ड्रेस सावरत थोडी वैतागून स्वतःशी बडबड करत बस स्टाॕप च्या शेड मधे शिरली…

किती ही घाई करा व्हायच तेच होते . गेली न निघून बस …आज परत सगळे हसणारं मला ….नुसता हशां
पिकवण्यालाच राहिल आहे व्यक्तीमत्व माझं . साठे बाई तर महा कजाग आहेत . कारण च शोधत रहातात हसायलां .

 

. तितक्यात गाडी येऊन थांबते.
देव..(एक भारदस्त व्यक्तिमत्त्व , थोडी अवसादाने भरलेली मुखमुद्रा) आभा ये, सोडतो आॕफीस लां.
जीव थिजलाचं जसा,नकळत यंत्रवत गाडीत जाऊन बसले .गाडीतं पांढरे शुभ्र सीट कव्हर,आत दरवळणारा ओळखीचा सुगंध ,वाजत असलेले गाणे ही आवडीचेच

“आओ तुम्हें चांद पे ले जाएं”
तितक्यात आभा चा फोन वाजला….

हलो -हलो …निघाले आहे ग, पोहोचत आहे .
हो….हो येतेच आहे.

(मुद्दाम डाव्या कानाला फोन लावला आभा नी सम्पूर्ण न्याहळलं देव ला…तब्बल सहा महिन्यांनी पाहिलं होत त्याला …. जरा बारीक झालेला जाणवला.बारीक कटिंग …चष्म्याची पांढरी फ्रेम …आता घ्यावी वाटली होय(मनातच म्हंटले आभाने)…. बरं झालं . गाडी चालत होती …अतिशय आॕकवर्ड अशी शांतता पसरली होती गाडीत .दोनदा दोघांची नकळतच नजरानजर ही झाली पण बोलले दोघे ही नाही …तसा ही देव अबोलच होता .
खरे तर प्रेमाच्या त्या रंगीत काळात हा च गुण आवडत असे आभा ला त्याचा.त्याच्या खांद्यावर डोक ठेवुन तासनतास बसायची ..म्हणायची, देव मला न तुझ्या श्वासांची ही आवर्तने ऐकायला फार आवडतात रे , तुझ्या परफ्युम चा सुगंध बेभान करतो रे मला,तुझ्या स्पर्शाने साधलेला संवाद एकांतात बोलतो रे माझाशी .मला एकट होवू देत नाही…

 

लग्ना नंतर मात्र तो च अबोला “कारण” ठरुन नातच शेवटा वर नेवून पोहोचलं होतां ..,इगो रुपी राक्षस होऊन दोघांच नातच गिळंकृत करायला कारण ठरला होतांं.कारण देव काही बोलूच नाही शकायचा…आभा ला त्याच्या अबोल असण्याच्या गुणा चा पार विसर पडला होता जणू.दोन वर्ष प्रेम दोन वर्ष कसाबसा संसार निभावलां .विकोपाला गेलेल नातं जोपासणे तस कठिणच असतं..आभा ने वेगळे होण्याची भाषा केली आणि डिव्होर्स फाईल केले .नोटिस पाठवली …
तो दिवस आणि आज चा दिवस..दिसला तो, आणि चक्क गाडीत बस म्हणाला

आल आफिस .आभा ऐ आभा …कुठे गुंतली
आभा…ओह साॕरी ..आल आॕफिस …थैंक्यु.

आभा ला फारच बेचैन झाल होत देव ला भेटल्या पासुन. करमत नव्हत .शेवटी तिनी सुट्टी टाकली नी घरी गेली ……..काॕफी घेत बसली आणि विचार करायला लागली …देव आपल्याला आज पहिल्यांदाच भेटला होतां..कुठे होता तो इतके दिवस. पूर्वी सारखाच का जाणवला …आज ही तो काहीच कसं बोलू शकला नाही ….पण मग त्याला आपल्याला पिकअप का करावे वाटले ,आपण ही का विरोध करु शकलो नाही,

का गाडीत मला घ्यायचे होते तेच पांढरे सीट कव्हर्स, कां तोच परफ्युम ,का तीच गाणी ….
का? का? का?

आभा च डोकं भणभणायला लागलं.डोळ्यातून आपसुकच पाणी वाहायला लागलं.
आभा नी मनाशी काही तरी ठरवलं .डिव्होर्स ची कागदपत्रे घेतली ,पर्स घेतली ,घरा बाहेर पडली …..टैक्सी मधुनच घरी गेली .बेल वाजवताच दार उघडलं ….तिने पर्स टेबल वर ठेवली आणि देव ला गच्च मीठी मारली

 

नाही जगू शकत रे मी तुझा शिवाय ..,डोळ्यांना धारा लागल्या होत्या…..देव नी तिला सावरलं…मला माहित होत आपल प्रेम जिंकणारं ..तू येणार..

तिला हाताला धरत बाल्कनीत आणले .बघते तर काय… संपूर्ण बाल्कनी शेवंतीच्या फूलांनी बहरलेली …हे काय आहे रे …तुझी आवडच तर जगण आहे माझं ….आभा नी हाल मधुन डिव्होर्स ची कागद आणली आणि फाडून टाकली..
हा असा “कागदी चिटोरा “आपल नात तोडू शकेल, शक्य च नाही

प्रेमाचं नातं जन्मजन्मांतरीच असतं... तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं …

 

शब्दपर्णच्या इतर प्रेमकथा वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

@$

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!