१०-तृष्णा

इकडे आलोच तर तृष्णाच्या आवडत्या निर्मलेला भेट द्यावी.तसेही आजवर तिचे संध्याकाळचेच रुप बघितले.आज सकाळचे बघायला मिळेल.
असा विचार करुन अमोल नदीकडे निघाला.
आता पुढील भाग….
तृष्णा
भाग-१०
संध्याकाळी शांत आणि जरा मलूल वाटणारी निर्मला सकाळी मात्र  उत्साही दिसत होती.एखाद्या नवयौवनेसारखी अल्लड,अवखळ भासत होती. 
किती वर्षापूर्वीपासून वाहत असेल ही अशी अविरत.
निसर्गाला आपल्यासारखे वय नसते.नेहमी तो तरुण असातो.आपल्यासारखे म्हातारपण त्याला येत नाही.ही निर्मलाही अशीच राहणार.अवखळ,तरुण.
कि आपल्याच विचारांचे प्रतिबिंब तिच्यात पडते.संध्याकाळच्या कातरवेळी आपण जरा उदास असतो म्हणून नदीही उदास भासते.आता सकाळी सगळे उत्साहात म्हणून नदीही उत्साही वाटत होती.
खळाळत वाहत होती.तिच्यात डोकावणाऱ्या निळ्या आभाळाच्या प्रतिबिंबामुळे तीही निळसर दिसत होती.
सगळ्या स्त्रिया निर्मलेसारख्या असतील का? आयुष्यात जो रंग मिळेल त्यात बेमालूमपणे मिसळून जाणाऱ्या .तृष्णा पण किती प्रयत्न करत आहे संसारात समरस होण्याचा,तिच्या आयुष्यात  कोणते रंग असतील पुढे ?
तृष्णा आठवताच त्याचे विचारचक्र थांबले.अमोल नर्सरीकडे परत आला,तिथून पाचसहा मोगऱ्याचे आणि  काही दुसरीही रोपे घेऊन घरी आला.
 शेजारच्या काकांकडे माळी होताच. त्याला बोलवून ती रोपे लावली.  
 साहेब तुम्ही इथेच राहणार का? माळ्याने विचारले.
 बघूया.काही ठरवले नाही अजून.
 रोपे लावून माळी निघून गेला.अमोर घरात आला.विजयने डब्बा आणून ठेवला होता.
 त्याने जेवण केले.लॕपटाॕप चार्जिंगवरुन काढला.
 खोलीत घेऊन गेला.
तृष्णाची अर्धवट  राहलेली कॕसेट सुरु केली.
सखामुळे तो समज दूर झाला.
परवा  बाजूच्या घरी एक कुटूंब राहायला आले. नवराबायको आणि  एक छोटे मुल दिसत आहे. 
आम्हाला मुल झाल्यवर सखा बदलेल.बाबा बनल्यावर हळूवारपणा आपसूक येईल त्याच्यात. माझेही आयुष्य  किती बदलेल नंतर. त्याचे लाडकौतुक करण्यातच वेळ जाईल सगळा. 
आज पहिल्यांदा सखाने मी बनवलेल्या जेवणाची तारीफ केली.किती आनंद झाला मला.
उद्यापासून डब्बा नेतो बोलला आॕफिसमध्ये.
सखा थोडा मवाळ वाटतोय एवढ्यात. बोलतो माझ्याशी.
कविताशी आज ओळख झाली.बाजूच्या घरात राहायला आली.तिचा एक वर्षाचा  सिद्धांत गोड मुलगा.पहिल्याच दिवशी आमची गट्टी जमली.
आज कविता घरी आली होती.तिला मी सजवलेले घर,बाग सगळेच आवडले.ती पण दिवसभर माझ्यासारखी एकटीच असते घरी.पण सिद्धांतमध्ये तिचा वेळ जातो.
कविता इथे नवीन.आज मी संध्याकाळी कविता आणि  सिद्धांतला घेऊन निर्मला नदीवर गेले.नदीकाठी खूप गप्पा केल्या आम्ही.यायला उशीरच झाला.मी आले तेव्हा सखा अंगणात माझी वाट बघत उभा होता.बरं वाटलं मला.
रोज मी त्याची वाट बघतेच कि.
मी आनंदात होती.कवितामुळे मला कधीही नदीवर जाता येणार होते.
सखाला विचारुन त्याच्या आवडीचे जेवण बनवले. भरलेली वांगी आणि ज्वारीची भाकरी.
साधीच आवड आहे सखाची.मी  स्वयंपाक करेपर्यंत सखा काहीतरी वाचत राहतो.त्याला आवड आहे वाचनाची.
माझे मन वाचता येईल का त्याला?
 जेवण झाल्यावर जरा अंगणात फेऱ्या  मारल्या.
 सखा सोबत असला कि खूप  आधार वाटतो मला.बाबा गेल्यानंतर असा आधार कधी मिळालाच नाही.
 फेऱ्या मारता मारता मी आईला भेटायला जाण्याविषयी विचारले.मला जाऊन ये बोलला.त्याला सुट्या मिळणार नाही 
 मी एकटीने कुठेही प्रवास केला नाही.. आणि  सखाला  सोडून जायची इच्छाही नाही. पण आईसाठी जावे लागेल.
पुढल्या आठवड्यात जायचे असे ठरले.
 एवढे बोलून तिने शुटींग बंद केले.
 कॕसेटही संपली होती.
दूपार झाली होती.विजय जेवण घेऊन आला.
विजय उद्यापासून पासून इथे स्वयंपाक करु बरं आपण.
साहेब कशाला? दोनतीन दिवसात तुम्ही जाणार. दोन तीन दिवसासांठी कशाला खटाटोप?
बघू या तर.मी कधी स्वयंपाक केलेला नाही.
साहेब भांड्यांपासून सगळे घ्यावे लागेल.
चालेल. आज रात्री येतांना वांगी घेऊन ये.
तृष्णाने बनवलेल्या भरल्या वांग्याच्या भाजीचा सुगंध त्याच्यापर्यंत पोहचला होता. त्याची आईही नेहमी ही भाजी बनवायची.
साहेब स्वयंपाक केला कि बाकीची कामेही वाढतील.
करु या रे.तसेही मला इथे काही काम नाही.
बरं,जशी तुमची इच्छा.
दोघांनी जेवण केले.विजय आॕटोरिक्षा घेऊन कामावर निघून गेला. अमोल अंगणात फेऱ्या मारु लागला.
काल रात्री तृष्णाने अंगणात अशाच फेऱ्या  मारल्या.त्याच्या मनात आले.
त्याने मुक्ताला फोन लावला.
कशी आहेस मुक्ता?
बरी आहे.तू रे?
मी पण मजेत.
रहा मग तिकडेच. मुक्ता रागाने म्हणाली.
का ग?
अरे दीन दिवसांसाठी गेलेला तू अजून किती दिवस राहणार तिथे? उद्या तेयो,परवा येतो असेच दिवस ढकलत आहेस.
अग काय करु? इथून पायच नाही निघत आहे.
म्हणजे तू उगाच राहत आहेस अमोल तिथे. काहीही काम नसतांना.
मुक्ता मी हे घर न विकण्याचा निर्णय घेतला.
वेडा आहेस का? 
तू घर विकण्यासाठीच गेला तिथे. त्या पैशात तुझे शिक्षण होईल.
दुसऱ्यांचे घर कसे विकणार?
म्हणजे? तुमचे घर नाही का? बाबांनी तुला कशाला पाठवले?
घर आमचेच आहे ग.
पण जाऊ दे.तुला नाही कळणार.
तू सांगशील तर कळेल.नेहमी घाईत बोलतोस अमोल.
काही प्राॕब्लेम आहे का अमोल? तू तिथे गेल्यापासून थोडा बदलल्यासारखाच वाटतो.माझ्याशी बोलतांनाही कुठल्यातरी विचारात असतोस.
मी तिथे आल्यावर बोलू सविस्तर.
तू येणार कधी?
येतो लवकरच.
अमोलने फोन ठेवला.
मुक्ता विचारात पडली.
अमोलचे वागणे जरा वेगळेच वाटते. कुठल्या अडचणीत तर फसला नसेल?
काही कळत नाही आहे.तिने पुन्हा अमोलला फोन केला.
अमोल तू ठीक आहेस ना? 
हो ग.
मला व्हिडिओ काॕल कर संध्याकाळी.
बरं.संध्याकाळी इथल्या नदीवर फिरायला जाईल तेव्हा करतो. 
क्रमशः
Previous Link
Next Part

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!