भाग-3-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)
जयंतला घेऊन व्यापारी दिल्लीला रवाना झाला.आपलं सार दुःख त्यानं यांच्याकडे पाहून बाजूला सारल.केवढं मोठं मन लागत यासाठी सुद्धा..! पुढे दोघात खरंच बाप लेक म्हणून घट्ट नातं निर्माण झालं.या नव्या बापाने त्याला business चे नवे धडे दिले.अगदीच perfect बनवले थोड्या काळात; पण त्याला आपल्या पूर्व जन्माचं थांगपत्ताही लागला नाही हे किती अजब…..!
आता तो तिथे चांगलाच रुळला होता.त्याची भाषा,त्याची बोलण्याची लकब,त्याची राहणीमान,पद्धती साऱ्यात कमालीचा बदल झाला होता.
इकडे आई वडील,भाऊ,बहिणी त्याच्या वाटेकडे डोळे लावून होते.वर्षे उलटली होती ,तरी जयू ची काहीच खबर नव्हती,जीवाचे बरे वाईट केले की काय? कुठे आहे,कसा आहे?काहीच खबर नव्हती.
जयंता मात्र आता business मध्ये चांगलाच जम बसवून होता.नशिबाने कशी कलाटणी घेतली होती.मागचे तर काहीच आठवत नव्हते.नव्या बापाने कधी सांगायचं प्रयत्नही केला नाही.स्वतःचे नाव,देऊन त्याला अफाट संपत्तीचा मालक केले होते.एक नात्यातील उपवर मुलगी पाहून त्याचे दोहोंचे चार हात केले होते.पुढे त्यालाही 2 मुले झाली.सारे सुरळीत सुरु होते.नशिबाने जयू ला हरवून जिंकवले होते.किती विलक्षण होतं ना सारं….!
पुढे एक दिवस व्यापारी अंथरुणाला खिळला. तसे त्याचे मन त्याला खाऊ लागले.सत्य सांगण्याची वेळ आली आहे,असे त्याला वाटू लागले.आणि एक दिवस अचानक त्या व्यापाऱ्याने जयू ला तो दहावी चा मार्कमेमो दाखवला.आणि सारी घटना त्याच्या समोर मांडली. मार्कमेमो वरची अक्षर सुद्धा आता पुसटशी झाली होती.त्या वेळी घडली घटना,तो अपघात,ती वेळ,ते दुर्देव,तो त्याचा स्वार्थ सारं काही सांगून त्यानं मन मोकळं केलं जणू….!
आणि मारणापूर्वीच ओझं हलकं केलं होतं….!
जयंतास हे सारं धक्कादायक होतं. त्यानं रात्र जागवली,मेंदूला ताण दिला,बालपण आठवण्याचा प्रयत्न केला.तशी मेंदूनही त्याला साथ दिली.बालपण पुसटसा आठवू लागलं.आईचा मायेन वाट पाहणारा चेहरा आठवला.दहावी चा result, रागावले बाबा,सोडलेले घर सारे अंधुक आठवू लागले.मित्राची आठवण झाली.आणि तो साऱ्या घटनेने चक्रावून गेला.आपण हे काय करून बसलो.नशिबाने आपल्याला कुठून कुठवर आणले? वेळ माणसाला बदलते हे खरेच….!
अभ्यासात कमी असलेला जयंत आज एक मोठा businessman ,करोडोचा मालक झाला होता.त्याची भाषा,राहणी,साऱ्यात कमालीचा बदल झाला होता.त्या मार्कमेमोवरून आता त्याने घर गाठले.घरी त्याला ओळख पटवून द्यावी लागली.
४५वर्षांनी परत आलेल्या जयंत चे गावात जंगी स्वागत झाले.उतारवयात आई वडिलांना मुलगा भेटल्याचे स्वर्गसुख मिळाले होते जणू. त्याच्याही चेहऱ्यावर विलक्षण आनंद झळकत होता.४५ वर्षानंतर आज त्याला मित्रही भेटले होते.माझा नंबर मिळताच त्याने फोन करून भेटीचा विलक्षण आनंद घेतला.मी तर त्याला प्रथमच पाहत होते.पण त्याने बालपणीच्या खूप आठवणी सांगितल्या.मन भरून दोघांनी गळाभेट घेतली.दोघांचेही डोळे पाणावले होते,अशी कृष्ण सुदामा भेट आज मी अनुभवली होती.ती मी शब्दात घट्ट बांधली……!
भाग-1
https://marathi.shabdaparna.in/1-हरवलेल्या
भाग-2
https://marathi.shabdaparna.in/भाग-2-हरवलेल्या
सौ.प्रिया देशपांडे







नशीब कोणाला कुठे नेते ,सांगू शकत नाही.
तीनही भाग खूप मस्त मांडले.
तिनही भाग उत्कृष्ट.
याला जीवन ऐसे नाव
Chan
छान