marathi thriller story-मनाची शिक्षा
marathi thriller story-मनाची शिक्षा

marathi thriller story-मनाची शिक्षा

मेघाला डाॕक्टरने गुंगीचे इंजेक्शन दिले.
मला माफ कर….असे पुटपुटत मेघा झोपी गेली.
मेघाचे वडील गोविंदराव,  त्यांना ती आप्पा म्हणायची डाॕक्टरांना सोडायला अंगणापर्यंत आले.
त्यांनी काळजीने विचारले, डाॕक्टर, काय झाले मेघाला?
कधीपासून होत आहे असे?
आता एवढ्यातच.
मला माफ कर असे म्हणत  शुन्यात बघत राहते.रात्ररात्र जागी असते.
बघू.मी औषध दिले.त्याने बरे वाटले तर ठीक आहे नाहीतर शहरात दुसऱ्या डाॕक्टरांकडे न्यावे लागेल.गोविंदराव काळजीतच आतमध्ये आले.
गोविंदराव चांदूरा गावातले धनाढ्य व्यापारी होते.
त्यांना दोन मुली आणि एक मुलगा.
पत्नी कविताचा तीन वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता.नंतर वर्षभरातच माहेरपणाला आलेली त्यांची लाडकी लेक अमोलीही स्टूलवरुन पडायचे निमित्त  होऊन गेली.
सुखाच्या आशेने आयुष्यभर वडिलांनी उभा केलेला व्यवसाय प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
पण कविता आणि अमोलीने आयुष्यातील सुख कायमचे नेले.
आणि आता बाळंतपणासाठी आलेली मेघा.काय होत असेल तिला?का अशी बरळते?
जावई आलोक computer engineer होता.कंपनीने त्याला सहा महिन्यांसाठी परदेशात पाठवले होते.
.
नुकताच मेघाला पाचवा महिना लागला होता.
आप्पा झोपले नाही?
त्यांची सून आस्थाने विचारले.
झोपा आप्पा जरावेळ.
मी थांबते मेघाजवळ.
बरं. असे म्हणत गोविंदराव झोपायला गेले.
आस्था लग्न होऊन आली तेव्हापासून घराला जरा घरपण आले होते.मेघाचे लग्न झाल्यावर गोविंदराव एकटे पडले होते.त्यांचा मुलगा जयचे आस्थासोबत लग्न झाले.आस्थाच्या येण्याने घर जरा सावरले होते.
पहाट झाली.मेघा झोप व्यवस्थित झाल्यामुळे प्रसन्न दिसत होती.
कशी आहेस बेटा?
छान झोप झाली आप्पा.
मेघाला रात्रीचे काहीही आठवत नव्हते.
गोविंदराव दुकानात गेले.दुपारी जेवायला घरी येणार होते पण त्याआधीच आस्थाचा फोन आला.
आप्पा मेघाची तब्येत बिघडली.
गोविंदराव आणि जय घाईघाईने घरी आले.येतांना डाॕक्टरांनाही सोबत आणले.
मेघा शुन्यात नजर लावून शांत बसून होती.
आस्था सांगायला लागली,
मी आणि  मेघा स्वयंपाक करत होतो.अचानक मेघा मला माफ कर ओरडत स्वयंपाकघराच्या बाहेर धावत सुटली.
डाॕक्टरांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
पण ती काही सांगायला,बोलायला तयार नव्हती.
थोड्यावेळाने ती काही घडलेच नाही अशी वावरायला लागली.
डाॕक्टरांनी तिला शहरात एखाद्या मानसोपचारतज्ञाकडे दाखवायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी मेघाला घेऊन जय आणि आस्था शहरात गेले.
तिथल्या डाॕक्टरांना भेटले.
मेघाला बोलते करणे अवघड होते.पुर्वायुष्यातील कुठल्यातरी चुकीची तिला आठवण होत होती.
सध्या डाॕक्टरांना एवढाच अंदाज येत होता.
पण काय असेल?
जय आणि आस्थाला काहीही अंदाज येत नव्हता.
गोविंदरावांनाही काही आठवत नव्हते.आपली सरळमार्गी,भावनाशील मुलगी काही चूक करु शकेल यावरच त्यांचा विश्वास बसत नव्हता.
दिवस जात होते तसे मेघाचे मनःस्वास्थ बिघडत चालले होते.
आता ती स्वयंपाकघरात पाय ठेवायलाही घाबरायची.
सकाळी आस्था गोविंदरावांना सांगत होती
रात्री मला माफ कर.मी.मी चूकले ग.आलोकमूळे… मेघा बडबडत होती
गोविंदराव आणि जय दोघेही विचारात पडले.मेघाच्या सासरी तर दोघांनी मिळून काही चूक केली नसेल?
पण सासरच्यांशी नेहमी बोलणे होते.ते तर नेहमी तिचे कौतुक करत असतात.
मग काय असेल?
मेघाला डाॕक्टरची ट्रीटमेंट सुरु होती पण सुधारणा होत नव्हती.
 आता ती आई बनणार आहे हेही ती विसरली होती.
 रात्री झोपेतून उठून धावत बाहेर आली. वरच्या खोलीतून खाली येतांना पायरीवरुन खाली कोसळली.
 बाळ गेले आतच.
 आलोकला गोविंदरावांनी फोन करुन बोलवून घेतले.
 आलोकला बघताच ती ओरडली.आलोक तुम्ही तरी सांगा
 मी काही केले नाही.दी…असे म्हणून बेहोश झाली.
 डाॕक्टरांनी आलोकला विचारले.त्याने तसे काहीही झाले नसल्याचे सांगितले.पण आतल्या आत त्याचा थरकाप उडाला होता.
 मेघा अडकणार.मलाही अडवणार…..घामाने ओला झाला तो.
 त्याला अमोली आठवली.त्याची पहिली पत्नी.
 लग्नाच्या दिवशी मेघाला बघितले आणि तिच्या प्रेमात पडला तो. मेघाने नुकताच यौवनात प्रवेश केलेला.चांगले,वाईट याची समज तिला अजून आली नव्हती. तीही भाळत गेली. दोघांच्या एकत्र येण्यात अमोलीचाच अडसर होता.अमोली माहेरी आली होती.तिला घ्यायला आलोक आला.
 स्वयंपाकघरात उंच स्टूलवर उभी राहून,पायाच्या टाचा उंचावून अमोली वर असलेला डब्बा काढत होती.
 आलोकने झटकन पूढे होत स्टूलला धक्का दिला.
 मेघा बाजूलाच उभी होती.ती अमोलीला वाचवू शकत होती.पण…….
अमोली गेली.दुसरी मुलगी मागण्यापेक्षा अमोलीची लहान बहीण मेघा घरी आली.
मेघाला नेहमी खंत वाटायची पण आलोक मनावर घ्यायचा नाही.
आता काय करायचे? रात्रभर आलोक या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता.दोन दिवसात परत जाण्याचा विचार करु लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत होते.
आलोकने तो उद्या परत जाणार असे सांगितले.
आस्था मेघाचा हात पकडून खाली घेऊन आली.ती आलोकजवळ गेली.
आलोक सांगा सगळ्यांना मी काही केले नाही. तुम्हीच अमोली दीदीचा जीव घेतला.
एवढे बोलून ती शांत बसली.
गोविंदराव,जय ऐकून सुन्न झाले.
म्हणजे?आलोकराव…
आलोक पळून जात होता.जयने त्याला पकडले.
मेघा मेंटल हाॕस्पिटलमध्ये आणि आलोक जेलमध्ये गेला…..
…प्रिती…

15 Comments

  1. PRAVIN DANI

    खुपच गुतांगुतीचं परंतु मनाचे थरकाप उडविणारे सुंदर कथानक …प्रितीजींचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!