काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
भाग-१६
मी लिहू का पुढचे पान?
असा विचार करत आनंद झोपला.
सकाळी बाबांच्या आवाजाने जागा झाला.
दवाखान्यात जाऊन आई,शलाकाला घरी पोहचवून तो काॕलेजमध्ये गेला.
रात्री शलाकाने आनंदला डायरी दाखवली. त्याने वरवर बघितल्यासारखे केले आणि परत दिली.
तू बंद का केले डायरी लिहिणे.
अरे नंतर काही घडलेच नाही विशेष?
क माझ्याशी लग्न ही विशेष बाब नाही? आणि मुक्ता?
आहे ना.पण तो प्रसंग घडला आणि मग आतापर्यंत त्याच्याच सावलीत राहले मी.
तू आयुष्यात विशेष नाही आहेस आनंद.आयुष्यच आहेस माझे. आणि मुक्ता राहू दे मी यापूढे बोलू नाही शकणार.
तिने डायरी परत आत ठेवली. डायरी आत ठेवतांना डायरीवर तिला चहाचा डाग दिसला.ती डायरी नेहमी सांभाळून ठेवायची.तिच्याशिवाय तिच्या डायरीला आजपर्यंत कोणीही हात लावला नव्हता.
नेहमीसारखी सकाळ झाली.
बाबांनी आनंदला विचारले.दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर चला आनंदीकडे जाऊन येवू.मुक्तालाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यात.
मुक्ता हे ऐकूनच आनंदली.हो आजोबा मला जायचे आहे आत्याकडे.
आनंदशलाकाही तयार झाले. सुमतीताई नेहमीप्रमाणे तयार नव्हत्या पण मुक्ताने हट्ट करुन आजीला तयार केले.
दोन दिवस धमाल केली सगळ्यांनी.
आनंदीचे पती डाॕक्टर यश सतत बिझी पण तरीही पाहूण्यांसाठी वेळ काढला.
आईबाबांना आनंदीने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतले. मुक्ताही थांबली आजी आजोबांसोबत.
आनंद,शलाका परत आले.
शलाका केसेसमध्ये आणि आनंद काॕलेजच्या परिक्षांमध्ये बिझी झाला.
शलाकाने माहेरचे घर डागडूजी करुन राहायला येणाऱ्या मुलींसाठी तयार केले. बाग सांभाळायला माळी ठेवला.
बाबांनी कुठून कुठून झाडे आणून हौसेने तयार केलेली बाग सांभाळायला हवी होती.
झाडे सजीव आहे असे म्हणतात पण आईबाबानंतरही ती तशीच टवटवीत,फुललेली आहेत.
त्यांना माणसं गेल्याचे दुःख नाही कि जे आहे ते स्वीकारुन पुढे जाण्याची उर्मी आहे. कोणी कोणासाठी थांबत नाही हेच खरे.
आता शलाकाला जसे प्रश्न पडतात तसे लहानपणीही पडायचे पण तेव्हा प्रश्नांची उत्तरे द्यायला बाबा होते.
ती विचारायची बाबा झाडांना जीव असतो तर आईबाबाही असणार त्यांना. आणि एकाच जागी राहून राहून किती कंटाळत असतील. शाळेत न जाता,अभ्यास न करता ती शहाणी कशी बनतात?
ती सगळी प्रश्ने आठवून आताही तिला हसू आले.
किती निरागस असतो आपण लहानपणी. आता मुक्ता आहे तशी. तिचाही प्रवास असाच होईल निरागसतेतून समंजसपणाकडे…..
घरी दोघांनाच राहण्याची मुळीच सवय नव्हती. आईबाबा आणि मुक्ता घरात कायम सोबत असायचे.
पण दोघांमध्ये आता जास्त गप्पा होऊ लागल्या.
आनंद ही मधली घरे नव्हती तेव्हा ह्या बेडरुममधून माझी
बेडरुम दिसायची नं.
हो.आपले लग्न झाले तेव्हाही दिसायची.
ही मध्ये घरे बांधली तेव्हापासून नाही दिसत.
आनंद काॕलेजमध्ये आला.
आज जास्त कामे नव्हती काॕलेजमध्ये.लवकर घरी गेला.शलाका यायची होती घरी.बेडरुममधून शलाकाचे घर बघण्याचा प्रयत्न करु लागला.नाही दिसत आता असे म्हणून बेडवर बसला.
ती रात्र आहेत भूतकाळ डोक्यासमोर सरकायला लागला.
माझ्या आवडत्या काॕलेजमध्ये प्राध्यापक बनलो.जिथे शिकलो तिथे आता शिकवणार होतो.
सरांची मुलगी शलाका, काॕलेजमध्ये पहिल्यांदा बघितले आणि अक्षरशः प्रेमात पडलो तिच्या.त्याआधी तिला कधी बघितले नव्हते.सरांकडे दोन तीनदा मी गेलो होतो पण कधी नजरेस पडली नाही ती.
सौंदर्य कशाला म्हणतात हे तिला बघितल्यावर समजले.
पण तिला सांगण्याचे धाडस होत नव्हते.सरांचाही धाक होता. मनात,स्वप्नात सतत तीच राहत होती.झोपच उडवली शलाकाने. ती खूप आवडली.आपसुकच तिच्याबद्दल प्रेम आणि देहाबद्दल आकर्षण निर्माण झाले. प्रेमाची हळूवार भावना होतीच पण आसक्ती वाढत गेली.
नंतर एकदा सरांकडेही गेलो.दिसली ती.नुकतीच न्हालेली ओलेती. तिच्या खोलीत चालली होती.केस धुतले होते.ते पाठीवर रुळत होते. केसांच्या बटांमधून गालावर पाण्याचे थेंब टपकत होते. पानावर दवबिंदु चमकतात तसे ते थेंब चमकत होते.
तिच्या ओझरत्या दिसण्यातही मी कितीतरी गोष्टी टिपल्या होत्या.
सरांना भेटून घरी आलो.
काॕलेजमध्ये तिच्या वर्गाला मराठी शिकवण्याचे काम माझ्या कडे होते.
तिच्यावरुन नजर हटवून शिकवणे फार कठीण जायचे मला.
असाच काॕलेजमधून येतांना सर आणि शलाकाची आई बाहेर जातांना दिसले. मी घरी आलो.घरी मी आणि आई दोघेच राहत होतो.आनंदीताईचे लग्न झाले होते आणि बाबा प्रमोशन झाल्यामुळे खूप बिझी असायचे.घरी आठवड्यातून एखाद्या दिवशीच यायचे.आई तिच्या कामात बिझी असायची.त्यामुळे माझा जास्त वेळ वर असलेल्या माझ्या बेडरुममध्ये जायचा. मी माझे लिखाणही सुरु केले होते.
मी बेडरुममध्ये गेलो.
बेडरुमच्या खिडकीत ऊभा राहिलो.तिथून शलाकाच्या रुमची खिडकी दिसायची.हे पण एवढ्यातच लक्षात आले माझ्या.
खूपदा बंदच असायची. त्यादिवशी बहूतेक चुकून उघडी राहली.
शलाका दिसली बेडरुममध्ये. फ्रेश होऊन आली होती.खिडकीतून फक्त तिचा सुंदर चेहरा दिसत होता. घरी एकटीच होती.थोड्या वेळापूर्वीच तिचे आईबाबा बाहेर जातांना दिसले होते.
मला काय झाले माहित नाही. मी ताडकन खाली आलो.आई घरी नव्हती.चप्पल पायात चढवली आणि शलाकाच्या घरी गेलो.घराचे दार फक्त ढकलले होते.ते सहज उघडल्या गेले.
मी दारातून आत गेलो आणि लाईट गेली.शलाकाच्या तोंडून घाबरुन आवाज निघाला.
आई.
मी त्या दिशेने गेलो.खिडकीतून खूप मंद चंद्रप्रकाश आत येत होता.शलाका पाठमोरी उभी होती.घरी ती एकटीच असल्यामुळे बेडरुमचे दार उघडे ठेवून कपडे बदलत असावी.फार कमी कपडे तिच्या अंगावर होते. मी घरुन फक्त शलाकाला बघायला आलो होतो.एकांतात माझ्या मनातले तिला सांगता येईल हा विचार करुन मी घरुन निघालो होतो.शलाकाने वेड लावले होते मला.
पण तिला तसे बघून माझ्या शरीराने आईवडिलांनी केलेल्या संस्कारावर मात केली. मी शलाकाला माझ्याजवळ ओढले.एका हाताने खिडकीवर पडदा सरकवला.जो मंद प्रकाश आत येत होता.तोही मी संपवला.माझ्या काळोखातील कृत्याला मला कोणीही साक्षीदार नको होते.खोलीत संपूर्ण काळोख दाटला होता.दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसणे शक्य नव्हते.माझ्या हातून घडू नये ते घडले.शलाकाने ओरडण्याचा प्रयत्न केला.पण मी तिचे तोंड हात ठेवून बंद केले होते. शरीराने झटापट केली तिच्या पण तिची ताकद कमी पडली.मी काय करतोय हे समजण्या इतपत होश नव्हता मला. होश आला तेव्हा उशीर झाला होता. माझ्या कृत्याची जाणीव झाल्यावर मी अंधारात चाचपडतच घरी आलो.आई देवाजवळ दिवा लावत होती.
क्रमशः
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
गुढ उकलले
छान कथा