सुप्रिया संसाराच्या सुख दुःखात इतकी समरस झाली की पुर्वीच्या उदयोन्मुख लेखिकेचाही तिला विसर पडला. तिच्या मैत्रिणीने जाणीव करून देईपर्यंत.
स्वयंसिद्धा भाग ८
सुख वेचिता वेचिता
नविन वर्षाची सुरुवात झाली की माधवच टेन्शन वाढायचं. औरंगाबाद सुप्रियाला माधवला आवडलं पण तिने माधवला इकडे शांत, समाधानी, रिलॅक्स खूप क्वचित पाहिलं असेल. नेहमी धावपळ, काळजी.
एखाद्या शांत संध्याकाळी मुलींना बघून तो मंदस्मित करे तर लगेच चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटे.
सुप्रियाला म्हणायचा, ‘ मला मुलींना खूप शिकवायचं आहे. त्यांना कणखर बनवायचं आहे, खंबीर होऊन स्वतःच्या पायावर उभं करून त्यांनी सिद्ध करायला हवं’.
नौकरीच्या भाऊ गर्दीत स्वतःला टिकवणे किती अवघड आहे, याचा त्याला पदोपदी अनुभव येत होता. त्यांना जोडीदार कसे मिळतील ? याचाही विचार त्याच्या डोक्यात यायचा कधी कधी . सुप्रिया म्हणे ‘ आत्तापासून नका इतका विचार करू, आधीच बाहेरचा व्याप तुम्हाला पोखरतोय ‘.
माधव मुलींबाबतीत खूप हळवा होता .
मार्च एंड , टार्गेट कम्पलिशन नावाचा वेताळ माधवच्या मानगुटीवर. आधीच माधवचा टेन्शन घ्यायचा स्वभाव , इतकं की झोपेतही कामाचचं बरळायचा. परिणामी रक्तदाब वाढला.
कामामुळे डॉक्टरकडे जाण्यासाठी हयगय करत होता. आज जातो, उद्या जातो म्हणून सुप्रियाला खोटं सांगितलं जाऊन आलो. औषधी पण दिली , हे त्यानी सुप्रियाकडे पाठमोरा होऊन सांगितलं. तिला त्याचं खोटं कळायला वेळ लागला नाही.
पण वाद नको म्हणून चुप बसली.
हिंगोलीला माधवच्या मामेभावाचं लग्न होतं . मुली लहान , उन्हं पण खूप वाढत होतं. म्हणून सुप्रिया मुलींना घेऊन औरंगाबादलाच राहिली .माधवला अनायासे मीटिंग साठी पंजाब मध्ये लुधियानाला जायचे होते. त्याने विचार केला, जाता जाता मामाच्या घरच्या लग्नात हजेरी लाऊनच जावे. बालपणापासून आजोळचा लळा होताच तसा. आणि लुधियानाचे तिकीटही योगायोगाने नांदेडहुनच होते. जास्त विचार न करता तो थेट हिंगोलीत पोहोचला सुद्धा. एव्हाना आई-बाबांही तिथे आलेलेच होते. जाताना तो अगदीच खुष होता, कंपनी चे टार्गेट त्याने पूर्ण केले होते. पाहिजे ती acchivement त्याने जीवाची ओढाताण करून का होईना पण पूर्ण केली होती. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला होता. त्यात लग्नघरी तर सगळी पाहुणे मंडळी आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
माधवला लग्नासाठी थांबता येणार नव्हतं. त्याच दिवशी कंपनीची लुधियानाला मिटिंग होती. लग्नघरी फक्त धावती भेट देऊन निघुन जाणार होता म्हणून एक दिवस आधीच हिंगोलीला गेला होता.
लग्न घाईत, कार्यालयात काय काय सामान आवश्यक आहे , ते एकत्र जमा करण्याची तयारी सुरू होती. बायकांची बॅगा भरण्याची धावपळ, साड्या वरून चर्चा सुरू होत्या, नवरदेव बिचारा, म्हणावा तर खुश, आणि म्हणावा तर जबाबदारीत अडकणार म्हणून चिंतेत होता.
अशातच माधवला अचानक ताप भरला, सर्दी असल्याचे जाणवू लागले. आणि त्वरित त्याने डॉक्टरकडे धाव घेतली, दिलेली औषधे घेतली आणि थोडा आराम केला. घशात थोडी खवखव जाणवत होती. त्या दिवशी त्याची तब्येत ठीक नव्हतीच. प्रकृती ठीक नसल्याने आईवडिलांनीही पुढे मिटिंग साठी जाऊ नको म्हणाले.
त्याच रात्री सगळीकडे निजानीज झाली . माधव मात्र बेचैन होता. त्याला उद्याची सकाळची गाडी पकडायची होती.
कंपनीचं टार्गेट पुर्ण झालं तरी प्रॉडक्ट्स साठी जास्तीत जास्त वितरक तयार करण्याची सगळी जबाबदारी sales manager ची असते.
माधवच्या डोक्यात मीटिंगच चक्र फिरतच होतं .टेन्शनमुळे खूप उशिरा त्याला झोप लागली आणि….
झोपेत काळाने वेळ साधली , सकाळपर्यंत कोणाच्याच लक्षात आलं नाही.
सकाळी जेव्हा माधवचा मुटकुळे झालेला जीव पाहिला तेव्हा मात्र सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
लग्न घरात एक वेगळीच घाई आणि दुःखाची छटा पसरली होती. सारे जण माधवच्या अवती भोवती सकाळीच जमा झाली होती. आणि एकच चर्चा चालू झाली, याला नांदेडच्या हॉस्पिटलला घेऊन चला, ambulance बोलवा, त्याला उभं करा, झोपेतच असं कसं झालं,?
बाबांनी तरी धीर धरला , पण आई तर रडायलाच लागली होती . शेवटी आईचं काळीज तिचं .
क्रमशः
असं काय झालं रात्रीतून माधवसोबत ? वाचूया पुढील भागात.
https://marathi.shabdaparna.
मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Incredible writing miss….
Chan