.. भले बुरे जे घडून गेले..
अशोक सराफ आणि अलका कुबल यांचा चित्रपट तुझ्या वाचून करमेना पाहिला आणि यातील एक गाणं ऐकून मन अतिशय भावूक झाले .
गाण्यातील शब्द न शब्द आपल्या जीवनातील एक एक पैलू उलगडत असल्यागत वाटत होते.
गीतकार सुधीर मोघे नी या गाण्याची रचना करताना जीवनातील खरीखुरी वास्तविकता कागदावर उतरवली असं वाटतं होतं.
गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील कोमलता आणि सोबतीला संगीतकार सुहास चंद्र कुळकर्णी यांनी दिलेल्या मोजक्याच वाद्यांची साथ त्यामुळे ह्या गाण्याची सुंदरता अजून वाढली आहे.
भले बुरे जे घडून गेले..
ऐकताना आपला संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोरून जातो. आपल्या ला आपले आयुष्य खरच मुठीत भरून घेतलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे हळूहळू हातातून निसटून जात असल्यागत जाणीव होऊ लागते…
..
निराश मनाला उभारी देणारे असे हे गाणे..
भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ क्षणभर जरा विसावू या वळणावर…
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
चांगले वाईट घडले ते इथेच सोडून द्या त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करू नका.
आजच्या या घडीचा, क्षणाचा मनसोक्त आनंद लुटा ..
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
कोण कुठले आपण एकत्र आलो आणि बंधनात अडकून पडलो.
कधी हसलो , रुसलो कधी उतावीळ तर कधी भयभीत झालो.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे, कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
आयुष्यातील सुख- दुःख ही
ऊन, सावली प्रमाणे असतात.कधी चांदण्यांच्या प्रकाशा समान थंडावा देणारी भासतात तर कधी अगदीच रेगिस्तानातील वाळूच्या समान गरम
सर्व काही गोड मानून आनंदाने घ्यावी.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर, कसले काहूर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर.
काळानुसार होणारा बदल आपण सहजपणे स्विकारला तर मनातील खळबळ शांत होईल मनाला चुटपुट लागून न राहता नव्याने आयुष्य जगणे सुसह्य होईल.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर,या वळणावर
या वळणावर,या वळणावर..
..सौ.दर्शना भुरे ..