मराठी कथा- साडी आठवणींचा पेटारा
मराठी कथा- साडी आठवणींचा पेटारा

मराठी कथा- साडी आठवणींचा पेटारा

मराठी कथा- साडी आठवणींचा पेटारा

निलाबंरी एकटी उदास झुल्यावर बसून शुन्यात बघत आहे. तेवढ्यात बाजूची केतकी बडबड करत आली. किती सुंदर दिसत आहे केतकी साडीवर.गजरा, लाल चुटूक टिकली,हातभर बांगड्या,कानात नाजूक मोत्याचे कानातले.
गळ्यात मोत्यांचा हार.किती लाघवी रुप दिसत होते.
किती सुंदर दिसत आहे ग केतकी.
काय आजी, किती जड साडी, मला तर बाई काही सुचतच नव्हते. बघायला पाहुणे येणार हे आईला कळले तेव्हा पासून तिची कुरकुर सुरू झाली. साडी घालून बघ. पदर घेऊन बघ. आजी तुमचे बरे आहे गाऊन घातला कि झाले.
निलाबंरीला धस्स झाले.केतकी सहज बोलून गेली पण तिला असंख्य यातना झाल्या. अग केतकी या व्हील चेअर वर बसून फक्त शेवटच्या श्वासाची वाट बघणे सुरू आहे. आता फक्त देह झाकने हाच उद्देश उरला आहे. आता कुठे मनाजोगी साडी घालता येणार आहे.
निलाबंरी घाईघाईने घरात आली. कपाट उघडले.साड्यावरून हळूवार हात फिरवला. किती सुंदर साड्या आता फक्त कपाटात बंदीस्त. हिरवा शालू लग्नातला तिला खुणावत होता.किती दुकान बघितले पण मनाजोगा रंग नव्हता मिळत.बाबा तर कंटाळले. हे तर गालातल्या गालात हसत होते.समोर आपली काही धडगत नाही याचा अंदाज त्यांना आला असावा.शांत बसून होते ते.
आई म्हणालीच बघा जावई बापू सवय करा आता.
शेवटी मनाजोगा रंग मिळाला.
लग्नानंतर भरपूर साड्या मिळतील या कल्पनेने सुध्दा मन मोहरुन जायचे. लहानपणी सिनेमात त्या नट्या काय सुंदर साड्या घालायच्या.घरी आल्यावर स्वप्नात त्याच साड्या दिसायच्या. अशा साड्या मला कधी मिळणार असे वाटायचे. आईला काय तीन.. चार साड्या, त्या पण बाबा त्यांच्या आवडीने घेत होते. आई मात्र खूष असायची.तिला कोणता रंग आवडतो याच्याशी कोणाला घेणेदेणे नव्हते. तो काळ तसाच होता.
हाताला हळूवार स्पर्श झाला रेशमाचा. माझ्या डोहाळे जेवणातील साडी, हिरवीकंच.. शेवाळी झाग असलेली.
मातृत्वाचा तो दिमाखदार सोहळा.. रेशमाच्या साडीचा तो उबदार स्पर्श मनात कायम साठून आहे.
बाळंतपणानंतर बाळाच्या बारशाला घेतलेली .. डाळिंबी रंगाची सिल्क साडी.मला तर डाळिंबी रंगाची साडी हवी होती. रंग ऐकून बाबा तर चुप झाले. थोड्या वेळाने आईला विचारत होते.. अग हा डाळिंबी रंग कसा दिसतो?

बाबा हसायला लागले.. कमाल आहे बाबा जावई बापूची.
मी असे करु का, डाळिंबच घेऊन जातो दुकानात.
बरे झाले बाबा बाळ तिच्याशिवाय राहत नाही, त्याला ठेवून
जर जाता आले असते तर या पोरीने तर हैराण केले असते मला. अहो , मला तर कधी विचारले नाही कोणता रंग हवा म्हणून. आता बरे सगळ्या गोष्टी सुचतात तुम्हाला. मी पण बावळट
त्याचा पुरेपूर फायदा घेतला तुम्ही.जे आणले त्यात सुख शोधले.
खरे आहे तुझे बाबा बोलत होते.जाऊ दे आता जुन्या गोष्टी.चल आता तुझ्या मनासारखी साडी घेऊन देतो.
जाऊ द्या हो काय करायचे आता. आता डाळिंबी रंग शोधा तुम्ही. दोघेही खूप वेळ हसत होते.
त्या नंतर आयुष्यात किती साड्या आल्या. सारे रंग कपाटात जमा झाले.मैत्रिणीकडून कौतुक झाले, तर कधी या रंगातून थोडा गडद हवा होता ग असे प्रेमळयुक्त सल्ले मिळाले. दुकानात जायचे म्हटले तरी नवरा सुट्टी काढायचा.
आज आपला पुर्ण दिवस साडीमय होणार याची त्याला शाश्वती राहायची. तो शांत निरागस बाळासारखा बघत राहायचा. त्याची नजर बरेचदा केविलवाणी दिसायची.

आता काय .. साडी झेपत नाही म्हणून साडी नाही नेसायची.‌
ते साडीतले रुप आठवायचे फक्त आता. कधीतरी साड्या बघायच्या , त्यावरुन हात फिरवायचा. असंख्य आठवणींचा पेटारा त्या साड्या मध्ये दडलेला…..

ज्योती रामटेके

प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की  Like,Share करा.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाणmarathi.shabdaparna.in वर पाठवू शकता

email-shabdaparnamarathi@gmail.com

whatsapp-9867408400

आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow  करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

विविध  साहित्य  वाचण्यासाठी खालील लिंक

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!