रिमझिम पाऊस पडे सारखा
रिमझिम पाऊस पडे सारखा

रिमझिम पाऊस पडे सारखा

१६-स्वप्न तहानलेले

ज्योती रामटेके

आक्काच्या हट्टीपणामुळे आनंदी-कनकचे हळूवार प्रेम कोमेजले.
आराधना आणि कनकचा विवाह व्हावा या आक्काच्या दुराग्रहामुळे आक्का कुठाल्याही थराला जावू शकते या आशंकेपायी आनंदी कनकचे प्रेम बाजूला सारुन लग्नाला तयार होते.आता पुढे …..

१६-रिमझिम पाऊस पडे सारखा पाऊसगाणे

काही दिवसात आंनदीचे लग्न झाले.धवलचा प्रेमळ स्वभाव,त्याचे प्रेम, आपुलकी,काळजी घेणे या गोष्टी आंनदीला सुखावत होत्या.धवलच्या प्रेमात कधी रममाण झाली तिचे तिलाच कळले नाही. तसेही हा लग्नाचा निर्णय तिचा होता.तिला तिच्या जवळच्या लोकांना सुखी बघायचे होते.तिचा सुखाचा संसार सुरु झाला.नंतर मुले झाली.जुन्या आठवणी नको म्हणून माहेरी येणे बंद केले. आंनदी,अग केव्हाचा फोन वाजत आहे तुझा. दीपा ने आवाज दिला.आंनदी भानावर आली.

फोन धवलचा होता. हे काय आंनदी, कधी येणार?जाम वैतागून गेलो मी. घर खायला उठत आहे. ये लवकर.
आठ,दहा दिवस झाले ग. मी येऊ का घ्यायला?
नाही धवल, मी येते दोन दिवसात. खूप वर्षांनी आली नं बरे वाटत आहे माहेरी. दादाने शेतीचा विषय नाही काढला अजून.धवलने फोन ठेवला.आंनदीला कसेही करुन कनकला वाड्यात आणायचे होते. वाड्याला त्याची गरज होती.त्याने उभारलेली शाळा बंद पडून होती.

आराधना कनकला फोन करुन सांग नं मी आली म्हणून.दोन दिवसांनी मला वापस जायचे आहे.एकदा त्याला भेटते ग. वाड्यात थांब म्हणून सांगते त्याला. या वाड्याला गरज आहे त्याची.
आंनदी, आम्ही तर हरलो त्याच्यासमोर, तुझे नक्कीच ऐकेल तो. आईच्या हेकेखोर, महत्वाकांक्षी स्वभावामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.सोबत माझेही.मला सतत अपराधीपणाची सल जाणवत राहते. तो वाड्यात राहायला आला तर वाडा जिवंत होईल. मी आताच फोन करते. तू आली म्हटल्यावर बघ तो कसा धावत येईल. आराधनाचा चेहरा फुलला.

दुसऱ्या दिवशी आंनदी वाड्यात गेली. दारासमोर सुंदर रांगोळी घातलेली होती. आराधनाने वाडा सजवलेला होता.
नक्कीच कनक येणार आज. आंनदी आत गेली.
आराधना, आज कनक येत आहे नं. वाडा छान सजवला.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आंनद दिसत आहे. तू फोन केला होता नं. काय म्हणाला कनक? मी आली म्हटल्यावर खूष झाला असेल तो. आयुष्याच्या एका वळणावर मी त्याला सोडून माझा संसार मांडला, त्याला न भेटताच निघून गेली याचा नक्कीच राग असेल त्याच्या मनात. पण माहीत आहे
त्याने कधी कुणाचा रागच केला नाही. आक्काने त्याचे प्रेम हिरावून घेतले तरी पण तो आक्कावर प्रेमच करायचा.
तो एकदाचा वाड्यात आला कि झाले. सर्वांत आंनद मला होईल.

मी माझ्या संसारात इतकी गुंग झाली कि जगाचा विसर पडला मला. या आधीच मी आली असती तर? मी वेळ केला. मी फक्त माझा विचार करत होती. जुन्या गोष्टींचा
पडसाद मला माझ्या संसारावर नको होता. या सर्व गोष्टींपासून दुर पळायचे होते म्हणून मी स्वतःला एका चौकटीत बंदिस्त केले. तिथे फक्त माझा नवरा आणि मुले होती. दादा, माझी जिवलग मैत्रीण दीपा, यांना सुध्दा दुर ठेवले. माहेर तोडले. या वेळी दादाच्या आग्रहामुळे आली.
बरेच झाले मी आली तर. कनकला वापस वाड्यात बघितल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आंनद माझ्यासाठी अनमोल राहील. वापस जातांना मनावरचे ओझे उतरलेले असणार. कनकचे वापस येणे म्हणजे माझ्यासाठी सुखद ठरेल.

आराधना, कनकच्या आवडीचे पदार्थ मावशीला बनवायला सांगितले नं. त्याला आईच्या हातचे लाडू खूप आवडायचे.
आई गेल्यावर त्याने लाडू खाणे बंद केले. आईने वाड्यातल्या स्वयंपाक सोडला होता पण मध्ये, मध्ये कनकच्या आवडीचे घरात काही बनवले कि ती घेऊन जात असे वाड्यात. आई गेल्यावर कनक दादाला कुठेतरी भेटला होता तेव्हा बोलता.. बोलता त्याने आईच्या हाताच्या लाडूची आठवण काढली. सर्वांच्या प्रती समर्पित होता तो.आश्रमात खरेच त्याचे मन रमत असेल का? आठवणींच्या जाळ्यातून बाहेर निघणे सोपे थोडीच आहे.त्या करता नवीन विश्व निर्माण करावे लागते. कनकने लग्न केले तर..

आराधना कुठे आहेस तू? मी काय बोलली ते ऐकले का?
बघ, बाहेर आभाळात मेघ दाटले आहेत. जोरात पाऊस नक्कीच पडणार. लग्नानंतर माझा वाड्यातील पहिला पाऊस. तेव्हा काय मजा असायची वाड्यात. सर्वत्र हसण्याचा आवाज. आक्का पण भिजायची आमच्यासोबत.
तेव्हा तिच्या मनात काय वादळ सुरु आहे हे कळत नव्हते आम्हाला.

तू मात्र नेहमीच सागरासारखी अबोल.‌ मनातले मनात ठेवणारी. ये लवकर.. आज चिंब भिजायचे मला.

आठवतयं आनंदी सगळे. मी अबोल म्हणून तुमच्या मागे असायची.
तू, कनक आणि दीपा चिंब भिजायचे. गाणे गायचे तुम्ही तिघे

रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे

आराधना खूप गोड आठवणी आहेत पावसाच्या -आनंदी कुजबुजली.

पावसाच्या सरी कनकची आठवण करुन देत होत्या. प्रत्येक थेंबात कनकचा भास होऊ लागला आंनदीला.
आंनदी

कनकचा आवाज आला. तिने वळून बघितले. कनक, हो कनकचाच आवाज… खरेच कि भास.

जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

 

कनक पुढील कडवे गात उभा होता. 

क्रमशः

Previous Part-

https://marathi.shabdaparna.in/१५-भातुकलीच्या

 

Next Part Link

https://marathi.shabdaparna.in/१७-स्वप्न-तहानलेले

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!