भाग-१४
तृष्णा
कॕसेट सुरु झाली.
तृष्णा दिसली.चेहऱ्यावर तेज आणि थोडे वजन वाढलेली तृष्णा बघून ती आई झाल्याचे लक्षात आले.
आईपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळाळत होते.
मी आई झाले.सखा आणि मला जोडणारा दूवा म्हणजे आमचे बाळ.दोन महिन्याचे झाले आज. सखा बदलेल बाळामुळे ही आशा फोल ठरली.आईला जी शंका होती ती खरीच होती. सखाच्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे.काल रात्री त्यानेच कबूल केले.
त्याच्या आजारी आईच्या इच्छेखातर त्याने माझ्याशी लग्न केले.दुर्दैव म्हणजे आमचे लग्न जुळल्यानंतर लगेच आई गेली. लग्न दोन दिवसांवर आल्यामुळे सखा लग्न मोडू शकला नाही आणि लग्नानंतर तिला विसरुही शकला नाही.
काल सखा म्हणाला, तो तिच्या शिवाय राहू शकत नाही.
मी कुठे जाऊ आता….बोलता बोलता तृष्णा रडू लागली.
माहेरी आता कोणी नाही. निर्मला घेईल का मला तिच्यात
सामावून?
बाळाच्या रडण्याचा आवाज आला.तृष्णा शुटींग बंद करुन घाईने आत गेली.
अमोललाही धक्का बसला. तृष्णाने जीवाचे काही बरेवाईट केले असेल का?
ती कुठे असेल?निर्मलेत आत्महत्या?
कसे शोधायचे तिला …विचार करुन अमोलचे डोके दुखायला लागले.
विजय आल्या आल्या अमोल त्याला घेऊन पेपरमिल मध्ये गेला.पंचवीस वर्षापूर्वीचा पेपर दाखवायला विनवू लागला.
पेपर मिळाले पण त्यात आत्महत्येची बातमी नव्हती.
तृष्णा असेल…ती असायलाच हवी…तो मनात बोलला.
विजय तृष्णाचा शोध कसा लागेल रे?
साहेब एवढी जुनी गोष्ट नाही कळेल.तेव्हा हे एकच घर होते.शेजारी कोणी नसणार.तृष्णाला ओळखणारे कोणीही भेटत नाही आहेत.सोडून द्या साहेब नाद.
अमोल काहीच बोलला नाही.
कॕसेटमध्ये तिच्या गावाचेही नाव नाही.कसे शोधू मी तिला?
सखा तिचे छोटे बाळ कोणीतरी असेलच पण कुठे?
विजय चल नदीवर फेरी मारुन येवू.
चला साहेब…
विजय,अमोल नदीवर पोहचले.
निर्मला तुला बोलता यायला हवे होते. कित्येक जण तुझ्यात विसावले असतील.तृष्णा शेवटी इथेच आली का?
अमोलचे मन रमत नव्हते.दोघेही घरी आहे.
काय जेवण बनवायचे साहेब? नको आज भूक नाही विजय.
अमोलचा फोन वाजला.
अमोल कधी येतो? आई पलीकडून विचारत होती.
आई अग,इथे एक स्त्री राहत होती आपल्याच घरात.तिचा शोध लागला कि येतो.
अरे ते घर कधीचे बंद आहे.
हो ग.पण तिचे अस्तित्व जाणवत राहते इथे.
बाबांनी कुणाला तरी घर राहायला दिले असणार पण बाबांना आठवत नाही आहे.
तुला कसे कळले हे? आणि तिचे नाव काय होते,
तृष्णा
मधूराने फोन ठेवला.
अमोलचा फोन होता का ग?काय म्हणतात चिरंजीव?
कधी येणार परत?
तृष्णाबद्दल विचारत होता.
तेवढ्यात बाहेर गेलेली अमोली परत आली. मधूराने फोन ठेवला.
अमोलने मुक्ताला फोन लावला.
मुक्ता,खूप डिस्टर्ब आहो मी.तृष्णाचा शोध नाही लागत आहे.
येऊन जा अमोल परत. अमेरिकेत तुझे भविष्य तुला खुणावत आहे.नको दिवस घालवू त्या छोटया गावात.
बघतो.एकदोन दिवस वाट बघतो अजून.
बरं काही गरज लागली तर सांग मला.
हो ग.आज जुने पेपरही शोधले पण काहीच सापडले नाही.
अमोल एकदा पोलीसस्टेशनमध्ये जाऊन बघ.तिथे बाबांच्या ओळखीचे कोणी आहे का विचारुन सांगते तुला.
मुक्ताने फोन ठेवला.
सकाळीच अमोल पोलीसस्टेशनकडे निघाला. मुक्ताने तिच्या वडिलांच्या ओळखीच्या पोलीस इन्सपेक्टरचे नाव पाठवले.
अमोलन त्यांना २३,२४ वर्षापूर्वीच्या आत्महत्येच्या केसेसबद्दल विचारले.
फाईल बघून त्यांनी बरीच नावे सांगितली.नावे सांगता सांगता ते तृष्णेच्या नावापर्यंत पोहचले.
तृष्णा
अमोलने त्यांना थांबवत स्वतःच फाईलमध्ये डोकावला.
तृष्णा अमर जाधव.
अमोल…चक्रावून गेला.तृष्णाचे नाव बाबांसोबत.
तृष्णा आणि बाबा…सखा म्हणजे माझे बाबा आणि
तृष्णा—माझी आई.
विमनस्क अवस्थेत तो खुर्चीवर बसला.
कशी केली होती आत्महत्या?
इथे निर्मला नदी आहे …
अस्वस्थ मनानेच तो घरी निघाला. चालत चालत आपसूक निर्मलेजवळ गेला.
तिच्या सभोवती असलेल्या वाळूवर बसला.
निर्मला…माझ्या आईची आवडती.माझी आई तुझ्यातच सामावली आहे….असे बोलत रडू लागला.तृष्णाबद्दल दाटलेले दुःख निर्मलेपर्यंत पोहचवत होता.
विजयने कसेबसे अमोलला घरी आणले.
दिवसभर तो कुठेतरी एकटक बघत बसला.
मनात शंभर प्रश्न निर्माण झाले.
तृष्णाचा सखा-बाबा,बाबांच्या आयुष्यात असणारी स्त्री मी जिला आई समजत होतो…सगळी नाती विखूरली आता….असंख्य विचारांनी डोक्यात थैमान घातले.
त्याचा फोन वाजला.
मि.जाधवांचा फोन होता.
अमोल येण्याचे ठरले का?
नाही-नाही.मी तिथे कधीच येणार नाही.
मी इथेच राहणार…कायम…माझ्या आईजवळ……
समाप्त
तृष्णा…कथामालिका इथे संपली.वाचकांचा प्रतिसाद,प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
तृष्णा-Part-1
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.





छान कथा मालिका.
तृष्णेच रहस्य अंतिम भागापर्यंत. कायम .