संपदाला बघून सुखदा खूष झाली.
ताई म्हणत तिच्या मिठीत शिरली.
सुखा हाततोंड धुवून ये.आज मी इथेच राहणार आहे.
संपदाने असे म्हणताच सुखदा पटकन हाततोंड धुवून आली..
विषय संपदानेच काढला,सुखा अग माझ्या चुलतदिराने तुला एकदा माझ्या घरी बघितले.तू आवडली …
संपदाचे वाक्य बोलून होण्याआधीच सुखदा कालच्यासारखीच ओरडली,
ताई तू पण आईबाबांसारखीच बोलायला लागली.मला नाही करायचे सध्या लग्न.
असे म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली.संपदाही तिच्या मागोमाग गेली.
सुखा अग काय झाले.मला तरी सांग नीट.मागे मी विचारले
तेव्हाही तू काही बोलली नाही.तू सांगितल्याशिवायआम्हाला कसे कळणार?
कोणी आवडते का तुला.कुणावर प्रेम वगैरे….
हो ताई आहे एकजण. आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. लग्न करायचे तर एकमेकांशीच नाहीतर नाही. असे ठरले आमचे.
अरे वा.माझी छोटीशी बहीण प्रेमात पडली तर….अग मग त्याचे नाव तरी कळू दे आम्हाला.त्याशिवाय गोष्ट पुढे जाणार कशी?
आणि तू लग्न म्हंटले कि चिडतेस का ग?
अग आईबाबा सतत तुझ्या चुलतदिराचे स्थळ सांगत असतात.त्यांचे कधीच नाव नाही घेत. मग मला खूप राग येतो.
एवढा आवडतो तो तुला?
सुखदा लाजेने चूर झाली.
बरं नाव काय त्याचे?
नाव…उद्या सांगेन मी.
सुखा आजच सांग बाई.उद्यापर्यंत धीर नाही धरवणार मला.
उद्या सकाळी नक्की सांगते ना ताई.
बरं.
संपदाने जास्त आग्रह केला नाही, तिने कोण असेल तो याचा अदाज घ्यायचा प्रयत्न केला पण अंदाज येत नव्हता.सुखदाला आवडला म्हणजे जबरदस्तच असेल. सुखा आवडीनिवडीत एकदम चोखंदळ आहे. ती चुकणार नाही….याच विचारात संपदा झोपली.
सुखदा जागीच होती.संपदामुळे आज मानसशी स्वप्न रंगवायला मिळालेच नव्हते.संपदा झोपल्याबरोबर सुखदाने पर्समधून मानसचा फोटो काढला आणि त्याला न्याहळत स्वप्नात रममाण झाली.
पहाट झाली. घर आज उत्सुकतेने जागे झाले.आज सुखदा तिच्या आयुष्यावर गारुड करणाऱ्याचे नाव सांगणार होती.
संपदा आली म्हणून सुखदाने आज रजा घेतली होती.
चहा,नाश्ता झाला. संपदाने हाॕलमध्येच सर्वांसमोर विषय काढला.पण सुखदा संपदाला तिच्या खोलीत घेऊन गेली.दार बंद केले. संपदाला म्हणाली,
कशी ग ताई तू,सगळ्यांसमोर काहीही विचारतेस.
बरं बाई आता तरी सांग. कोण आहे तो माझ्या बहिणीला वेड लावणारा.?
ते …ते….न प्रसिद्ध चित्रकार आहेत.
अरे वा! तुला आधीपासून चित्रकारीचे वेड होतेच.लहान होतीस तेव्हा सगळं घर रंगवायचीस आपलं. बरे झाले आता मस्त दोघे मिळून चित्रकारी कराल.
अग, पण नाव काय त्याचे?
चित्रकार मानस
चित्रकार मानस? कसे शक्य आहे सुखा.त्यांचे तर लग्न झाले आहे.उगाच काहीही गंमत करु नकोस.
क्रमशः
प्रिती गजभिये.
कथामालिका आवडत असल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.
छान
Khup chan
छान
सुरेख 👌👌
Chhan