भाग 14-हरवून गेल्या जाणिवा-marathi katha
भाग 14-हरवून गेल्या जाणिवा-marathi katha

भाग 14-हरवून गेल्या जाणिवा-marathi katha

14-हरवून गेल्या जाणिवा-marathi katha

सौ. दर्शना भुरे.,

कांताप्रसाद अंथरुणाला खिळून होते. त्यांना सारखी खोकल्याची उबळ येत होती. शेजारी बसलेल्या वसंताला वडीलांची ही अवस्था पाहवत नव्हती. त्यांच्या डोळ्यातील आर्त भाव..त्यांच्या हाताची थरथर त्याला कासावीस करत होती.

कधीही वडिलांच्या म्हणण्याबाहेर न गेलेला वसंता आज हतबल होता.

मधुकरराव च्या होकारावर आज वडिलांची अंतिम इच्छा अवलंबून होती..

एवढा कसला विचार करतो रे वसंता…
कांताप्रसाद त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाले,
तेव्हा काही नाही दादासाहेब.. तुम्ही आराम करा मी आलोच असे म्हणत त्यांच्या अंगावरील पांघरूण नीट करून तो खोलीतून बाहेर पडला ..
बाहेर मंडपात पाहुणे मंडळी गोळा होऊ लागली.पण वसंता वडिलांच्या खोलीतून सारखा आत बाहेर करत होता.. वसंतराव ची तगमग मधुकरराव पाहत होते.
बाहेर एकीकडे हळदीची तयारी सुरु होती. तर दुसरीकडे प्रमिलाच्या चुडाभरणाचा कार्यक्रम सुरू होता.. नवरी नंतर एक एक सवाष्णींना चुडा भरण्यासाठी उठविले जाऊ लागले..
वैकुंठा नवरीच्या हातातील हातभर हिरवागार भरलेला चुडा पाहून स्वतः ला भरण्यासाठी उत्सुकतेने पाटावर जाऊन बसली.
वैकुंठाला नवरीचा हातभर हिरवा चुडा भरा.. असा एकदम मधुकरराव चा आवाज विमलच्या कानावर पडला तसे तिने चमकून त्यांच्या कडे पाहिले तर ते परत म्हणाले,
वैकुंठा ला नवरीचा चुडा भरा..

वैकुंठा ला नवरीचा हातभार चुडा..अहो हे काय बोलताय वैकुंचे आबा तुम्ही..
विमल मधुकरराव जवळ जात कुजबुजत म्हणाली,
तू ऐकले तेच बोलतो आहे.. आज या मंडपात च वैकुंठा विनायक चे लावून देण्याचा शब्द दिला आहे मी पाहुण्यांना..

विमल–पण का? असे एकदमच तडकाफडकी.. मला मान्य नाही..

वैकुंठाची आई तुम्हाला मान्य करावे लागेल.. दादासाहेबांची तब्येत अतिशय नाजूक अवस्थेत आहे.. त्यांची अंतिम इच्छा आहे.. नातवाचे लग्न पाहण्याची..
अहो पण..
आता पण बिण काही नाही.. लागा तयारीला..सध्या आपण फक्त वैकुचे लग्न च लावून देत आहे.. तिच्या पाठवणीला अजून भरपूर अवकाश आहे..
आप्पासाहेब आता आपले होणारे व्याही आहेत.. त्यांच्या शब्दाचा मान ठेवा आणि
वेळ न दवडता वैकुंठाला बाशिंग बांधण्याच्या तयारीला लागा..विमल हे ऐकून सुन्न झाली.
आता वैकुंठा ला तयार करण्याशिवाय दुसरा पर्याय तिला नव्हता..
वैकुंठाचे घरातील पहिलेच लग्न म्हणून किती हौस होती सर्वांना पण ते स्वप्न अधुरेच राहिले..
मंडपात लग्नविधी सुरू झाले..
वयस्कर बाया लग्नगीत गाऊ लागल्या..तरुणी नटूनथटून मिरवत होत्या. लग्न घरा उत्साहाने भरले होते.
भटजीने नवरीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन येण्यासाठी सांगितले..
प्रमिला च्या मंगलाष्टकानंतर दहा मिनिटांनी वैकु.. विनायक चा मुहूर्त काढला होता..

आईने नेसवून दिलेल्या भरजरी पातळातील कोवळ्या वैकुंठाला मामा हात धरून लग्न मंडपाकडे घेऊन जात होता. ठुशी, बोरमाळ, एकदाणी असे गळाभर दागिने घातलेली वैकुंठा गोजिरवाणी दिसत होती.. नाकात घातलेली मोत्याची नथ, अंबाड्यावर माळलेली मोगऱ्याची फुले तिचे सौदर्य अजून खुलवित होते.. विमल तिच्या लेकीकडे भारावल्यागत पाहत होती. आजपासून वैकुंठा च्या आयुष्याला वेगळे वळण लागणार होते. अल्लड, कोवळ्या वयातील भातुकलीत रमणारी वैकुंठा आज पासून भोसले घराण्यातील सदस्य म्हणून ओळखल्या जाणार होती..
कुर्यात् सदा मंगलम्.
भटजीने मंगलाष्टकाला सुरुवात केली.. तसे मधुकररावला गलबलून आले.. ते अश्रूभरल्या
डोळ्याने लेकीवर अक्षता टाकू लागले..
. शेवटचे मंगलाष्टक संपले..
वाजंत्री वाजायला लागली
तसे उभयता लेकीच्या कन्यादानासाठी
व भावी जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी जागेवरून उठून स्टेजकडे निघाले..

क्रमशः

Previous Link

https://marathi.shabdaparna.in/13-हरवून

NEXT PART LINK

https://marathi.shabdaparna.in/१५-हरवून

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!