११आभास हा छळतो मला
११आभास हा छळतो मला

११आभास हा छळतो मला

११आभास हा छळतो मला

मध्येमध्ये मानसच्या चित्रांचे प्रदर्शन असले तर सुखदा  ते बघायला जायची. प्रदर्शनात मानसला तिची नजर भिरभिर  शोधत राहायची. घरी आता सर्वांचा संयम सुटत चालला होता. घराला  अनोळखी असलेल्या मानसने त्या हसत्याखेळत्या घराचे घरपण संपवले होते.
संपदा नेहमीप्रमाणे सुखदाला भेटायला खोलीत गेली.  सुखदा यायची होती घरी.तिच्या टेबलवर एक पेपर पडून होता. मानसचे नाव दिसले म्हणून  संपदाने वाचला.
मानसला लिहिलेले पत्र होते ते.
 मानस, आपले प्रेम नाही समजून घेत आहे रे कोणी.
तू माझ्यावर इतके  प्रेम  करतो.पण हे लोकं विश्वास ठेवतील तर नं. आपण रोज भेटतो,तुम्ही माझी चित्रे काढता,तुमच्या   मनपटलावर कायम मीच असते,मी हाक मारली की  तुम्ही धावत येता….हे काहीही यांना खरे वाटत नाही.आता कालचेच नाही का मी भेटू म्हंटले तर सगळी कामे सोडून लगेच आलात,आपण हातात हात घालून फिरलो, तो तुमचा स्पर्श , तुमच्या   सहवासाची अनुभूती हे सगळे यांना खोटेच वाटणार.


 पत्र वाचता वाचता संपदाच्या डोळ्यातून झरझर आसवे वाहायला लागली.
संपदाला आता सुखदाची काळजी वाटायला लागली.आणि  भीतीही.
 घरी  आल्यावर शाश्वतला संपदाने सुखदाच्या वेडेपणाबद्दल सांगितले आणि रडायला लागली.
शाश्वत आणि संपदाने सुखदाला मानसोपचारतज्ञाकडे न्यायचे ठरविले. दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळीच  सुखदाला भेटायला आले तिला  सांगितले
आपल्याला डाॕक्टरकडे जायचे आहे.
सुखदाने डाॕक्टरकडे यायला साफ नकार दिला.
उलट तीच संपदाला म्हणाली,
ताई तुलाच गरज आहे मानसोपचाराची. मी कित्येक दिवसांपासून जीव तोडून सांगत आहे माझे आणि  मानसचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पण तुम्ही कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.तुम्हालाच  सगळ्यांना वेड लागलयं. आणि  मला वेडी ठरवायला निघाले.
ताई,मी थकले ग आता तुमच्या प्रश्नांना.
फक्त मानससाठी मी जगते आहे.मला काही झाले तर मानसमधला चित्रकार संपून जाईल.
एवढे बोलून सुखदाने सगळ्यांपुढे हात जोडले आणि हमसाहमशी रडायला लागली.
 सुखदाला खूप समजावूनही ती  मानसोपचारतज्ञाकडे यायला तयार झाली नाही म्हणून संपदा आणि शाश्वत दोघेच गेले.  त्यांना  सगळे सांगितले. सुखदाला Erotomania ह्या  मानसिक बिमारीचे लक्षणे दिसत असल्याचे मानसोपचारतज्ञाने सांगितले.
पण सुखदा आल्याशिवाय उपचार सुरु करता नाही येणार असे  सांगितले.
सुखदाला समजवण्याचे घरी सगळ्यांचे प्रयत्न चालले होते
पण ती विषय काढला तरी आकांडतांडव करायची.

 

सगळेच सुखदामुळे हतबल झाले होते.
वसुधाताई आता एकच वाक्य म्हणत राहायच्या.
आपल्या  ‘सुखाला’ नजरच लागली कुणाचीतरी.
एकदा संध्याकाळी मनोहरराव आणि वसुधाताई संध्याकाळी सुखदाची वाट बघत बसून होते. आज जरा जास्तच उशीर झाला होता सुखदाला. संध्याकाळ जास्तच उदास होत चालली होती. तसेही ह्या घराची पहाटही उदासच राहत होती. हसत्याखेळत्या घराला ग्रहण लागले होते.
दोघे खिन्न मनाने बसून जुन्या आठवणी उगाळत होते.
वसुधाताई- तुम्हाला आठवते का सुखदा बाजूच्या घरी खेळायला जायची.  असेच एकदा आपण बसू होतो.सुखा घाईघाईने आपल्याजवळ आली आणि विचारायला लागली,
आईबाबा दुःख म्हणजे काय हो?
तुम्ही विचारले,
सुखा तुला ग कशाला हवे उत्तर?
 ती माझी मैत्रीण आहे ना जाई तिची आई सारखी म्हणत असते, देवा अजून तू आम्हाला किती दुःख देणार?आता दुःख  पचवण्याची ताकद नाही आमच्यात.
 तुम्ही तेव्हा तिला उत्तर दिले होते,
 अरे हट् आपल्या घराकडे दुःख कसे फिरकणार?सुखा आणि संपदा आहेत आमच्याजवळ.
क्रमशः
पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/१२आभास

प्रिती गजभिये

3 Comments

  1. Aparna1234

    सुखदा सारख्या अनेक जणी समाजात आढळतात अशा मानसिक रुग्णांसाठी मानसोपचार हाच एक उपाय असतो सुखदा च्या घरची परिस्थिती खूप छान वर्णन केली आहे संपदा च प्रेम वाखाणण्याजोगं आहे छान रंगते आहे कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!