२१-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-पियूषला शिक्षा मिळाली
२१-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-पियूषला शिक्षा मिळाली

२१-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-पियूषला शिक्षा मिळाली

२१-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-पियूषला शिक्षा मिळाली

Written by-ज्योती रामटेके

पियूषला शिक्षा मिळाली होती. राधा मुळातच स्वार्थी होती.
तिने त्याला त्याच्या नावावरची शेती विकायला लावली.
पियूष ने तिच्यावर अमाप पैसे खर्च केले. राधाची मुले आता मोठी झाली होती. त्यांचे शिक्षण पियूष ने केले. त्यांची महत्वाची कामे पार पडली होती. आता त्या घरात पियूषची अडगळ वाटायला लागली. वेळ निघून गेल्यावर त्याला कळले. तो आता चंदना कडून प्रेमाची अपेक्षा करु लागला. माफी काय मागायची बायकोला..ती तर माफ करणारच अशी ठाम समजूत होती त्याची.

चंदनाने बाबाची सेवा केली. तिचा उदास चेहरा त्यांच्या लक्षात येत होता पण त्यांना बोलता येत नव्हते. काही दिवसात बाबा चंदनाला सोडून गेले. तिचा कणखर आधार निघून गेला. आई होती सोबतीला. रीनाचा भक्कम आधार होता. नमु चे लग्न होऊन ती सासरी निघून गेली.रोज फोन करून चंदनाला प्रोत्साहन द्यायची. चंदनाला आता फक्त भविष्यात रममाण व्हायचे होते. स्वतःला सिद्ध करायचे होते. आज पुन्हा नवीन प्रतियोगिता. गार्गीने चंदनाचे नाव दिले. बाबा जाऊन जास्त दिवस नव्हते झाले. ती उदास होती. गार्गीने दुबईला जाण्याची व्यवस्था केली. या वेळी चंदना एकटी जाणार होती.दिवस निघाला. चंदना गेली.
तिथे सोबतीला अपर्णा होती. तिने बनवलेल्या जेवणाला पहिला पुरस्कार मिळाला.

तिला तिथल्या हाॅटेलमध्ये बोलावण्यात आले. खूप कौतुक झाले.तिच्यावर बक्षीसांचा वर्षाव झाला. अपर्णा, चंदना बाबांची आठवण काढून रडत होत्या. आज बाबा असते तर किती आनंदी झाले असते. चंदनाला सारखे बाबा आठवत होते. तिला हाॅटेल काढायला जागा देण्यात आली. तिचे स्वप्न सत्यात उतरत होते. काही दिवस थांबून चंदना वापस आली.गार्गी दिल्लीला शिकायला गेली.मुलाला वकील बनायचे होते.तो पण परदेशात शिकायला गेला.
आई थकत चालली होती. आपल्या हातून तिची सेवा घडावी म्हणून ती थांबली. मध्ये.. मध्ये जायची दुबईला. आईची खूप सेवा केली चंदनाने. आई काही दिवस थांब ग माझे कौतुक करायला तू मला हवी आहेस. माझे हाॅटेल तरी बघ.. तुझी मुकी.. अबोल चंदना आता किती बोलकी झाली ते तरी बघ.आई डोळे उघड.. आई मुलीचे कौतुक ऐकत होती. तिने समाधानाने देहत्याग केला. चंदना पोरकी झाली. चंदना एकटी पडली.हाॅटेल बांधून पूर्ण झाले. आता तिला कायमचे दुबईला जायचे होते. सासरे थकले होते. सुमनताईच्या स्वभावामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. सांभाळायला कुणीही तयार नव्हते.

आता त्यांना चंदनाची किंमत कळली होती. माझ्यासोबत चला बाबा, मी तुमचा सांभाळ करेल.चंदनाने आग्रह धरला. मला सोडून जाऊ नको चंदना सासरे रडत होते. बाबा तुम्हाला रीना ताई सोबत ठेवणार आहेत. आणि मला? सुमनताई रडत होत्या. माझ्या पियूषचे कसे होणार चंदना.त्याला माफ कर. त्याला सोबत घेऊन जा. चंदना जोरात ओरडली.. आई कोण हा पियूष?मी ओळखत नाही त्याला. ती तिच्या आॕफिसमध्ये निघून गेली. संध्याकाळी निघायचे होते तिला. एकटीच, उदास बसलेली चंदना भुतकाळ आठवत होती. आई.. वडिलांची लाडकी चंदना ते
पियूषनी नाकारलेली चंदना. किती कठीण होता तो प्रवास.
आता पुन्हा या शहरात येणे होईल कि नाही. तिच्या डोळ्यात पाणी आले.

ताई.. चंदना भानावर आली. बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायचे म्हणत आहे. नौकर आवाज देत होता. तिने खिडकीतून बघितले. पियूष होता तो.केस विस्कटलेले, काळेकुट्ट कपडे. पियूष काळानेच माझा बदला घेतला.
राजासारखा जगत होता.पदरात सारे सुख होते पण तुला ते कळलेच नाही. राधाच्या बेगडी प्रेमात सर्वस्व हरवून बसला. काय मिळाले तुला? अनैतिक संबंधातून काय मिळणार?
तू मात्र माझ्या मुलांना लवकर मोठे केले. समजदार बनवले.मी सावरली आता. मोठी झाली. आणि जगायलाही शिकली.. स्वच्छंदी.. स्वप्न बघायची आशा निर्माण झाली. मी तर स्वतःला तुझ्या प्रेमात हरवून बसले होते.तुला काय आवडते. काय केल्याने तू आंनदी होणार हेच माझ्यासाठी महत्वाचे होते. नाजूक वेली सारखी सदैव तुला बिलगलेली मी, कधी तुझ्यापासून विलग झाली कळले नाही.म्हणजे तसे करायला भाग पाडले तू. खूप यातनामय प्रवास होता तो.

ताई.. काय सांगायचे त्यांना. बोलवायचे का? नाही..
तिने कागदावर दोन अक्षरे लिहिले.
पियूषने घाईत चिठ्ठी उघडली.. वाचुन स्तब्ध झाला.

धन्यवाद… मला सक्षम केल्याबद्दल.

चंदना विमानतळावर निघाली. पियूष तिच्या गाडीच्या मागे धावत होता.चंदना.. चंदना.. म्हणून ओरडत होता. मला माफ कर म्हणून सांगत होता.
गाडी पोहचली. चंदना आता गेली. बाहेर चंदना.. मोठ्याने
पियूष ओरडत होता.
चंदना.. चंदना.

चंदनाच्या विमानाने केव्हाच आकाशात
झेप घेतली…..

समाप्त

कशी वाटली कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!