कल्पनेची भरारी-marathi inspirational story
कल्पनेची भरारी-marathi inspirational story

कल्पनेची भरारी-marathi inspirational story

कल्पनेची भरारी-marathi inspirational story

“आपल्या उत्पादन प्रक्रियेत अशी सुधारणा हवी आहे, आणि गेले काही आठवडे हे pending असताना, अवधूत तुमच्या कडून काहीच हलचाल का नाही.”

डायरेक्टर साहेब जरा चिडूनच म्हणाले.

“मी माझी संकल्पना केंव्हाच दिली आहे, पण त्यावर काहीच चर्चा अथवा संमती नाही. जर योग्य असेल तर मी एका आठवड्यात अंमलबजावणी करतो”

” पण अशी कल्पना कोणत्याच कंपनीत वापरलेली पाहीली नाही”

” कल्पना नवीन आहे पण मी जवाबदारी घेतो”

“आपण नंतर बोलू,पण शक्यतो common. Method च वापरा”

झाले….त्याची आणखी एक नावीन्यपूर्ण कल्पना दुर्लक्षित झाली..

अवधूत देशपांडे, एक कूशल engineer, 20 – 22 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यात कामाचा अनुभव असलेला, नवीन संकल्पना राबवणे,एखाद्या प्रश्नाच्या मूळापर्यन्त जाणे, अभ्यास करणे ही खरेतर त्याची जमेची बाजू, पण कोणतीही तडजोड न करणे, चुकीच्या गोष्टीला ठामपणे विरोध करणे, कोणाची री न ओढणे, ही तोट्याची बाजू होती.

मुळातच कंपनीत त्याचे जे काम होते,त्यात वेगवेगळ्या संकल्पना राबवणे हे अंर्तभूत होते,पण ह्याच्या कल्पना काही वेळेस किंबहुना बऱ्याच वेळेस प्रचलीत पध्दतीना छेद देणाऱ्या असत.
ऊदाहरण द्यायचे तर, उत्पादनाच्या ठिकाणी कंपनीच्या. स्टोअरमधून जे raw material, वाहून न्यावे लागायचे,ह्यावर त्याने ज्यावेळी काम केले, त्यावेळेस,(1) श्रम (2) खर्च (3) वाहन क्षमता ह्या बाबी विचारात घेउन, बेकरी प्राॅडक्ट जवळपास वितरितसाठी वापरतात तशी सायकल ट्राॅली सुचवली, कारण त्या स्वस्त होत्या, त्यांची वाहन क्षमता ही योग्य होती, आणि चालण्यापेक्षा सायकल चालवायला कमी श्रम लागतात, हे gym expert चे मत त्याने आजमावले होते.

कल्पना नवीन,पण एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत अशी सायकल ट्राॅली वापरणे व्यवस्थापनाच्या गळी काही उतरले नाही.आणि खुप नाराजी ने त्याला, नेहमीचाच, महागडा पर्याय, बॅटरीवर चालणारी गाडी… वापरावा लागला.

असे नेहमीच होऊ लागले. तो नहमी म्हणायचा,

माझी कल्पना थोडी तीरपागडी असली तरी ती वापरण्यात कोणत्याही अडचण येणार नाही.

पण त्याच्या पदरात नेहमी निराशाच पडत होती.
त्याला सारखे असे वाटायचे की कधीतरी मला माझ्या कल्पना राबवण्याची संधी मिळायला हवी..अगदी मनापासून काम करून मी कंपनीचा खूप फायदा करून देईन.

अशातच त्याला, एका competition ची mail आली.त्याला वाटले की ईथे प्रयत्न करून पहावा. त्यासाठी त्याने competition मधे भाग घेण्यासाठी व्यवस्थापनाकडे आग्रह धरला, पण तो काही मान्य झाला नाही. एरवी तो हे नेहमीचेच आहे, असे समजून गप्प राहिला असता, पण का कुणास ठाऊक ह्या वेळेस त्याला त्याची आंतरिक उर्मी शांत राहू देत नव्हती.
त्याने आयोजकांशी संर्पक साधला, आणि व्यक्तीगत स्वरूपात सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली. खूप प्रयासाने आयोजकांनी विनंती मान्य केली. पण आता खर्चाचा सगळा भार त्याच्यावर पडणार होता.

त्याने मग घरी चर्चा केली, पण बायको आदिती ,आणि मित्रा चे मत पडले की…खर्चाचा भार आपल्यावरच पडणार असेल तर मग काय उपयोग….जर कंपनीला पटत नसेल तर, सोडून दे. तुझ्या पगारावर तर फरक पडत नाही ना मग कशाला हे उद्योग……

तो एकच म्हणाला…ज्याप्रमाणे…कट्यार….नाटकात, सदाशिव ची एकच ईच्छा असते….

एकदा उस्तादां च्या उस्तादांनी…पाठीवर हात ठेऊन म्हणावे….
जीते रहो….गाते रहो…..
त्याप्रमाणे मला माझ्या संकल्पना चूक आहेत की बरोबर…हे तज्ञांसमोर नीट मांडून…चर्चा करून तपासून बघू दे…

त्याची तळमळ पाहून मग ती ही तयार झाली…म्हणाली…

ठिक तर मग लाग कामाला…बघू जे व्हायचे ते होईल…

मग काय, त्याने 15 दिवसाची सुट्टीच टाकली…आणि झटून कामाला लागला, 3 कल्पना व्यवस्थित तयार केल्या, त्याचे माॅडेल तयार केले,त्या बाबत लागणारा.सर्व अभ्यास, वेगवेगळ्या संर्दभासह presentation. च्या स्वरूपात तयार केला.त्या दिवसात त्याने अगदी तहान भूक हरपून कष्ट केले. आदिती ही त्याला खूप मदत करत होती. तीने ही त्या दिवसात सुट्टी घेतली होती.
अखेर तो दिवस उजाडला.

दोघेही तयार झाले. आदिती ने यादी प्रमाणे सर्व गोष्टी घेतल्या असल्याची खात्री केली.देवाला नमस्कार करून ते निघाले.

तिथे वेळेत पोहचले. सुरूवातीचे सर्व सोपस्कार पार पडले आणि presentation सूरू झाले.
परिक्षक म्हणून औद्योगिक क्षेत्रातले एक मोठे व्यक्तीमत्त्व होते. ते एका मोठ्या उद्योगसमूहाचे चेअरमन होते. ईतर 2 परिक्षकही अशाच जाणत्या आणि अनुभवी व्यक्ति होत्या.
ह्याचा नंबर मागे होता. तोपर्यंत तो ईतर presentationमधे रस घेत होता, प्रश्न विचारत होता, मधेच आदिती ला काही मुद्दे सांगत होता.
अखेर ह्याचा नंबर आला. मोठ्या आत्मविश्वासाने तो आणि आदिती स्टेजवर आले.सुरूवातीलाच, व्यक्तीगतरीत्या भाग घेण्याचे कारण स्पष्ट करून, त्याने presentation सूरू केले.
तयार केलेल्या माॅडेल च्या आधारे तो हिरिरीने त्याचे मुद्दे …..तांत्रिक, आर्थिक, बाबी मांडत होता….योग्य त्याठिकाणी आदिती ही बोलत होती. मधेच येणाऱ्या परिक्षक,प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता.त्याच्या presentationमधे आकडेवारी आणि विविध तांत्रिक संदर्भ यांचा मूबलक वापर होता.ते 20 मिनिटे तो फक्त एक कूशल engineer होता. ना कौणाचा employee होग ना कुणाचा boss.

आपला 22 वर्षांचा जो अनुभव,अभ्यास, होता तो सर्व त्याने त्या 20 मिनिटात ओतला होता. अखेर त्याचे presentation. संपले… Thank you ची slide समोर आली. तो थोडा शांत झाला. त्याचा थकवा ओळखून आदिती ने पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला….तो पाणी पिणारच होता…….पण हे काय….काहीच response नाही….सगळे कसे शांत….परिक्षकही….दीर्घ श्वास घेत होते……आता मात्र त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले….ग्लास तसाच टेबलवर ठेवला…..आणि त्याने पराभूत नजरेने त्याने..आदितीकडे पाहीले……तीला ही काही कळेनासे झाले…….

ईतक्यात,मुख्य परिक्षक स्टेजकडे येऊ लागले….आदितीने त्याला खूण केली……..पूढे काय वाढून ठेवले असेल याची त्याला भिती वाटत होती….
ते आले..त्यांनी माईक हातात घेतला………..
“अवधूत या क्षणा पासून मी तूम्हाला…आमच्या समूहात….तूम्ही म्हणाल त्या package वर, technical director ह्या पदाची ऑफर देत आहे………”

फक्त अट एकच…..अशाच नाविन्यपूर्ण कल्पना देत रहा……नाविन्यपूर्ण कल्पना देत रहा……….”

एकाच वाक्यात त्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते…….
आज मै ऊपर ..आँसमा निचे
आज मैं आगे …जमाना है पिछे
अशीच त्याची अवस्था झाली होती ..
मोरपिसा सारखे …अक्षरशः आनंदाच्या लहरींमध्ये तो तरंगत होता

खूप दिवसांपासून मनात जपून ठेवलेले मोरपीस …आज साकारले होते …

वैशाली जोशी खोडवे

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!