झूला-marathi lekh
काल घरी झुला घेतला ….खूप दिवसांपासून मनात होते.
आपल्या मनात खूप काही आनंदाच्या कल्पना असतात …त्यापैकी सकाळी उठून ..निवांत पणे झुल्यावर बसून चहा घेणे ही पण माझी एक आनंदाची ..कल्पना आहे ..दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा चहाचा कप हातात घेऊन झुल्यावर बसले …आणि काय आश्चर्य झुला जसा मागे जाऊ लागला तशा मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या…
बालपणीच्या सगळ्या सुखकर ..आठवणी …कसलीच चिंता करण्याचे वय नसलेले ते दिवस ..खूप खूप मस्ती करण्याचे आणि घरात एखाद्या वेळेस कुणी रागावले कि पटकन आजी जवळ जाऊन ..तिच्या गोधडीत ..लपण्याचे ते दिवस कधी आयुष्यातून उडून गेले ते कळालेच नाही ….
त्यानंतर झुला जसा पुढे जाऊ लागला तसा …काॕलेज चे ते रंगबेरंगी दिवस आठवायला लागले ..मैत्रिणींसोबत ..केलेली धमाल ..तासनतास मारलेल्या गप्पा …
एकदा तर मी माझ्या मैत्रिणीसोबत ..तिच्या घरासमोर सलग चार तास गप्पा मारत होते ..शेवटी समोरच्या गॕलरीतून आम्हाला बघणाऱ्या आजोबांनीच आम्हाला रागवून घरी पाठवले ..
.त्यानंतरचे ते …नवीन लग्न झालेले दिवस ….मोरपंखी दिवस ..जणूकाही ….दिवस तुझे हे फुलायचे …
झोपाळ्यावाचूनी झुलायचे ..
ह्याचा शब्दशः अनूभव देणारे ..
आता वयाच्या या टप्प्यावर झुला थोडासा स्थिर झाल्यासारखा वाटला …मुले मोठी झाल्यामुळे थोडासा स्वतः साठी वेळ मिळू लागला …आणि आयुष्यात जे काही करायचे होते …ते करण्याचे ठरवले …तोच हे करोना चे संकट आले …आणि… सगळेच …थांबल्यासारखे झाले ..
आपण ..सगळ्यांनीच ..खूप प्रगती केली …सगळ्याच क्षेत्रात ..खूप उंच भरारी घेऊ लागलो …पण …
ह्या करोना ने ..आपल्या सगळ्यांचाच झुला स्थिर केला.
सगळेच काही थांबल्यासारखे झालेय …
पण म्हणतात ना …
माणूस आशेवर जगत असतो ….
आपले सगळ्यांचे ..हे पण दिवस जातील …अन्…आपला झुला ..खूप उंच जाईल …आपल्या मनातील सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्या …..
का कुणास ठाऊक पण मला अचानक, आपले आयुष्य आणि झुला यात साम्य जाणवू लागले.
अगदी छान चालू असलेला जाॅब नेमका करिअर च्या मोक्याच्या क्षणी जाणे,
काटकसरी ने केलेली बचत, आजारपणात संपून जाणे, असे हेलकावे आपल्याला बसतातच. पण जसा खाली येणारा झुला एका क्षणा नंतर ऊंच जातो, तसेच आपले ही होते.
महत्त्वाचे असते ते आपल्या तत्त्वांशी घट्ट बांधलेले असणे….अगदी त्या झुल्या सारखे.
हेलकावे बसले तरी गाठ सुटू द्यायची नाही.
कधी खालची दिशा तर कधी आकाशी भरारी…..जे समोर येईल ते गोड मानून ….आपण छान झोका खेळण्याचा आनंद लुटायचा
झुला काही सांगतो वाटे ..
मना जरी आज.. .वाटे निराशा
होईल आकाश लवकरच मोकळे
घेऊ आपणही ..श्वास खुला …
जाऊ घेऊन निश्चितच ..
आपण आपला ….उंच झुला ..
वैशाली जोशी खोडवे
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











Sundar 🌹🌹🌹
Sunder