मैत्री एकांताबरोबर
मराठी लेख
माणसांनी नेहमी एकटेपणा बरोबर मैत्री करावी.म्हणजे त्याला कशाचे दुःख होत नाही.एकटे असताना माणूस अनेकदा स्वतःशीच बोलत असतो.तोच असतो वक्ता आणि तोच असतो श्रोता.तोच असतो परीक्षक आणि तोच असतो परीक्षार्थी.
माणसात किती राहणे आवडले तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळासाठी असो नाही तर कायमचा.प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात.म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतोच असे नाही.
प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणानुसार घडत जाते.जन्मापासून तो अनेक गोष्टीचा सामना करत असतो.त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते.पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते.ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतःलाच माहिती असते.एकटे असताना ते त्याला आवडते.कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वतः समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो.
मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो.पण तोच एकटा असताना ओक्सोबोक्शी रडतो.कोणी मन दुखावले तरी त्याला जाब विचारता येत नाही मग स्वतःच स्वतःला प्रश्न करत राहतो.त्याचे उत्तर स्वतःच शोधतो.
म्हणून एकांत सुद्दा छान मित्रच असतो.
प्रेरणादायी मराठीलेख
मन उदास होते गावी तर निघाले होते.भायखळ्यातून ट्रेन पकडली.खिडकीच्या बाजूचे सीट भेटले .मी जिथे बसले होते तिथून पूर्ण डबा दिसत होता.कसारा ट्रेन नेहमी सारखी गर्दी होती,पण मन उदास म्हणून मी सरळ खिडकी बाहेर बघत होते
.मन उदासअसेल तर कोणाशी बोलावे वाटत नाही.एक एक स्टेशन येत होते .डबा पूर्णभरला होता पण माझ्या बाजूला कोण बसले आहे .समोर कोण आहे.हे सुद्धा मी बघितले नाही.माझ्याच विचारात मी हरवले होते .समोरच्या सीट वरील बाई बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी लक्ष नाही दिले .
काय तुम्ही ६३ वर्षाच्या आहात, माझ्या बाजूची आणि त्या बाईच्या बाजूला बसलेली आणि मी एकदम बोललो .तेव्हा मी तिच्या कडे नीट बघितले.५० च्या आसपास वाटावी अशी छान बाई होती ती,अतिशय देखणी.उंच गोरी सुंदर डोळे
” ही पंचवीस वर्षाची असेल तेव्हा काय सुंदर दिसत असेल असे मनात येवून गेले”
या वयातील तिचा उत्साह बघण्यासारखा होता.मनातील निराशा कुठल्या कुठे गेली.तीचाबरोबर बोलले .तरुण असतानी घरातील आणि नवरा त्रास देतो म्हणून ,घरातून दोन मुलांना घेवून गावाकडून मुंबईत आली.धुणे भांडे केले.रेल्वे पोलीस मध्ये भरती झाली.सगळे ठीक झाले,हि मजेत राहते म्हणून सासरचे लोक तिला घेवून जायला आले.पहिल्या सारखे मारहाण करायला लागले.सरळ कोयता काढला आणि धमकी दिली या समोर एकाएकाचा मूडदा पडते.तिचा आवेश बघून सगळे पळून गेले.मुलांना शिकवले ,स्वतःचे घर घेतले.नवरा आला नंतर तिचाकडे
सुना आल्या जास्त नाटक करायला लागल्या ,सरळ मुलांना सुनांना बाहेरचा रस्ता दाखवला.आयुष्यभर कष्ट केले.
माझी स्वतःची पेन्शन आहे का ऐकू यांचे ….रोखठोक असणारी ती बाई बोलत होती.माझ्या बरोबर बाकी ऐकत होत्या.आसनगाव आले.ती उतरून गेली,
जाता जाता माझ्या मनातील मरगळ घेवून गेली.
माझ्या बाजूची बाई बोलली ,खरच सगळ्याना नाही जमत ना असे ,ते पण तीसपस्तीस वर्ष आधी . .
आशा नवले
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/लेख
एकांताबरोबर मैत्री -सुरेख लेख
खरे
छान..
Chan