varhadi story-आजीची हुशारी
varhadi story-आजीची हुशारी

varhadi story-आजीची हुशारी

अव आजी….तुयी मुलाकत घ्यासाठी खामगाववरून लोक येउन रायले आमास नव लुगड घालजो.
बापा.. कालच त माया पोलीस ठेसनात सतकार झाला.
अव आजी तुन ते सल्लु गॕगं पकडुन दिली न म्हणून तुयी मुलाकत हाये.
अरे गोल्या तु दुध आनुन ठेव.. अन त्या जनाकडुन अद्रकचा तुकडा आन.. जराशी ईलायची त्या पारूच्या घरून आन.
आजी तुले उसन मांगाची लय सवय हाये.काल ते पारू आजी जना आजीले म्हने कशी…गंगा बुढी काइ नेते त लवकर आनुन देत नाई बीचारे.
बाप्पा.. बाप्पा त्या जनीकड माये चार कांदे हायेत दोन महीने झाले द्याच नाव नाई काढत.
जाय तु पयत घेऊन ये.
अव आजी ते लोक च्या नाई पीत त्यायला कुठ टाईम हाये एवढा.
अरे आनुन त ठेव ..बर दिसन का ते बीन च्याचे जातीन त
अव आजी आले ते लोक..
या…या.. बसा
मी जरासा च्या करून आनतो.
आजी ..बसा तुम्ही आम्ही चहा घेत नाही
.बर बापा इचारा
आजी त्या सल्लु गॕगं ची माहिती सांगा.
बर..बापा.दोन मइने झाले त्या गोष्टीले. मायी नात आर्ची भलकशी साजरी हाये.. तिच्या लग्नाची गोठ सुरू होती.
एक दिवस भला साजरा पोरगा गावात आला .. माया घरी च्या पानी झाल.. माया दुरच्या नात्यात होत पोरग.. दहीफळले माई चुलत काकु रायते तिची मावस बहिन रायते साहुरले ..तिच्या नंनदेची जाउ रायते सुरतले तीच पोरग होत ते. म्या त्याले ईचारल त मने बंबईले सलमानचा बाडी गारड आहो मने.
.म्या म्हटल त्याच नाव त शेरा आहे न ….
बापा आजी तुले त लय माईती आहे व
मले अजीबात ते पोरग पटल नव्हत.
अरे बाबू सलमानचा बाडी गार्ड तो शेरा हाये न.
बापा आजी तुले त लय माईत हाये व.मी त्या शेराच्या मांग उभा रायतो… आता समोर पायजो बातम्या मी दिसन तवा तुले.
बातम्यात दिसला होता बापा शेरा
लगन झाल्यावर सलमान मले बंगला गाडी देनार हाये. लय दिलदार हाये तो.
मले सांग बाबु तो सलमान कावुन लगन नाइ करत.त्या बंबईत लय साजऱ्या पोरी आहेत.त्याले एकबी पंसत नाई येत.त्याले खेड्यातली पाईजे काय…माया घराच्या बाजुची कानी लय साजरी हाये.. गोठ काढुन पावु काय.
बर बाबु तुय नाव काय हाये.
वीकी आहे मायवाल नाव.
बापा … हे काय नाव होय काय?
बर तुया मायले फोन लावुन दे जरासा
तुया बाप जाऊन त दोन वरीस झाले.
अव आजी माई माय गेली ना त्या करोनान.तुले माईत नाई काय.
माय बाई…मले त माईत नाई बयना.
अरे बाबु आता जुने लोक चालले.मायी नंनद बी गेली.ते मले इकयच्या ..तिकयच्या बातम्या सांगे.
बर बाबु तु बंबईले रायत पण खेड्यातली भाषा मस्त बोलत तु.
अव आजी तिकड हिंदी …इग्रजी बोलतो मी. जिकडे गेलो तिकड तस बोलतो.
आजी मोठी हुशार.तिले विकीच समद खोट वाटे पन कोणी तिच्या कडे ध्यान नव्हत देत. सादी चौकशी कराले बी कोनी तयार नव्हत.
विकी बाबू आमासा सलमानले फोन लाव बर ..बोलतो जराशी.
अव आजी तो लय साधा मानुस हाये…बोलते तो… घे लागला फोन.
अरे बाबु सल्लु तुये सबन सिनेमे पायतो मी. लय आवडत तु मले.
हो काय आजी.हे पाय लगन झाल की तु बी बंबईले येजो.आर्चीले बी सिनेमात काम देतो मी.जमल त हिरोईन बनवतो तिले.
बाबु हे विकी पोरग किती कमावते मईन्याले.
अव आजी ..मी हावोना तु कायले कायजी करत. लगन झाल की त्यायला बंगला …गाडी देनार हावो मी.मी तरी पैशाच काय करू.मी लय पैसा वाटत रायतो.
बाबु तु लगन करून घे. मंग कसा तु पैसा वाटत ते समजन तुले.मतारा झाला तरी लग्नाच नाव नाई काढत.

काय करू माय हे विकी पोरग जरास बी खर वाटत नाई.
आर्ची निरा पागल झाली. तिचे माय बाप बी चौकशी करून नाई रायले.सोन्यासारख्या पोरीचे हाल होतीन त्याच्या दिखाव्याले भुलले हे समदे लोक.मलेच आता काई करा लागन. पोलीसाच्या कानावर टाकतो.

दुसऱ्या दिसी आजी बारकाईन ध्यान देउन हुती.
आजी आमी दोघ फुटू काढाले चाललो वावरात. आमच्या संग मायावाल्या मैतरनी हायेत.
अव आर्चे मी बी येतो.
सांग आता तु कायले येत.विकी काय म्हनन?
बर चाल..पन मुकाटयान बसजो.
आर्चे भाकर घेऊ काय जराशी.
आजी तु आपलच नको लावु बर
अव आजी विकी बिरयानी आननार हाये आपल्यासाठी.
समदे गेले वावरात समद्यान बिरयानी खाल्ली.पोरी बेशुध झाल्या.गाड्या तयार हुत्या.तीघ हुते ते.पोरीले गाडीत कोंबल.गाडी नींगाली.पोलीस लपून हुते.सरवायला पकडले.
पोरीले फसवुन बंबईले विकत हुते.आजीच्या हुशारीन सल्लु गॕंंगं पकडली गेली.समदे पोर कनारखेडचे हुते.हातमजुरी कराचे. पैशाच्या लोभापाई अन शानशौकासाठी त्यायच्या डोक्यात हे भुत घुसल.चांगल खा प्याले भेटे अन वरवर बी होत जाये.
आर्चीच सिनेमाच भुत ऊतरल हुत.

आजीची हुशारी या गमतीदार वऱ्हाडी कथेचे सरिता बायस्कर यांनी केलेले सादरीकरण YOU TUBE  चॅनेल वर बघा

https://youtu.be/OFXEy-ZU08w

ज्योती रामटेके

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!